Author: अनंत पांगारकर

बुधवार, दि.१ मे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमलेल्या भरारी पथकाच्या हाती निवडणुकीआधीच मंगळवारी मोठ घबाड लागलं आहे. मुंबईत भरारी पथकाने केलेल्या दोन मोठ्या कारवाया केल्या आहे. सायनमध्ये केलेल्या कारवाईत एका कारमधून कोट्यावधी रुपये जप्त केले. तर आदल्या दिवशी सोमवारी दुपारी दादरपूर्व भागात शिंदेवाडी परिसरातून लाखो रुपयांची रोकड ताब्यात घेण्यात आली आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. राजकीय नेते मंडळी प्रचारसभा, रॅलीत व्यस्त आहेत. अशातच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. ३० एप्रिल) निवडणूक भरारी पथकाला सायन परिसरातील एका कारमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाने कारवाई करत कारमधून तब्बल १ कोटी ८७…

Read More

अहमदनगर – बुधवार, दि.१ मे निवडणूक शाखेच्या भरारी पथकाने सोमवारी सायंकाळी अहमदनगरमधील एका हॉटेलमधून साठ हजार रुपयांची रोकड ताब्यात घेतली. या संदर्भात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथकाने पकडलेल्या आरोपींमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या समर्थकासह अन्य दोघांचा समावेश असल्याचे बोलले जाते. निवडणूक शाखेचे भरारी पथक अधिकारी शहानवाज तडवी यांना काही लोक निवडणुकीच्या संबंधाने हॉटेल यश ग्रँड मध्ये पैसे वाटप करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये जात रूम क्रमांक ४०२ मध्ये ही कारवाई केली. दरम्यान भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत प्रत्येकी २० हजार रुपयांची तीन पाकिटे आणि दोन मोकळी पाकीट जप्त केली. या पैशाचा हिशोब देता…

Read More

मंगळवार, दि.३० एप्रिल  अवघ्या तेरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा धुराळा सुरू झाला आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची त्रेधा तिरपीट उडताना दिसत आहे. त्यामुळे उमेदवार, त्यांचे समर्थक पदाधिकारी मिळेल तिथे बोलण्याची संधी सोडत नाहीत, याच पार्श्वभूमीवर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना यात्रेत बोलण्यास विरोध झाल्याने त्यांना तेथून निघून जावे लागले. शिर्डी लोकसभा मतदार संघात निवडणूक रंगात येण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीतील प्रमुख उमेदवार प्रचारात दंग असले तरी कार्यकर्त्यांची मात्र त्यांना अद्यापही म्हणावी अशी फारशी साथ मिळत नसल्याचे दिसते. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उमेदवाराकडून पूर्ण होत नसल्याने सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवाराबाबत हे चित्र मतदार संघात दिसत आहे. त्यामुळे शेवटच्या तेरा दिवसात सर्वप्रमुख उमेदवारांची…

Read More

वंचितला मतदान म्हणजे भाजपला मदत… मंगळवार, दि.३० एप्रिल देशभरात सुरू असलेला ईडी, सीबीआयसह केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, न्याय व्यवस्थेमधील दबाव, वाढलेली महागाई, बेरोजगारी, राज्या-राज्यात झालेले फोडाफोडीचे राजकारण जनतेला आवडलेले नाही, देशभरात निर्माण झालेली अस्थिरता यामुळे देशात भाजप विरोधात मोठी लाट निर्माण झाले असून येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला २०० जागाही मिळू शकणार नाही. याचबरोबर राज्यातील महायुतीचे सरकार जनतेला मान्य नसून महाविकास आघाडीला मोठा पाठिंबा मिळत असल्याने या निवडणुकीत महाविकास आघाडी ४० पेक्षा अधिक जागा मिळवेल असा विश्वास काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. सोमवारी सायंकाळी संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार शुभारंभावेळी थोरात बोलत होते.…

Read More

मंगळवार, दि.३० एप्रिल तब्बल गेली १५ वर्षे ट्रक चालवणारी भारताची ही पहिली महिला ट्रक ड्रायव्हर, सध्या ३० टनांचा १४ चाकांचा अजस्त्र ट्रक घेऊन भोपाळ ते केरळ मधल्या पलक्कड पर्यंत रोज सतत पुरुष ट्रक ड्रायव्हर्सना अचंबित करेल अश्या ट्रिप्स करतेय… स्वतःचा ट्रक्सचा व्यवसाय सांभाळून. या सर्वाची सुरुवात झाली २००३ साली भोपाळ इथे… योगिता आणि तीचे पती, राजबहादूर रघुवंशी, त्यावेळी महाराष्ट्रात राहणाऱ्या योगिता यांचा विवाह होऊन त्या भोपाळ इथे गेल्या. स्वतः वकिल म्हणून या वकिल माणसाशी लग्न केले पण लग्नावेळी वकील म्हणून सांगितलेल्या रघुवंशी यांचा ट्रकचा छोटासा व्यवसाय असल्याचे धक्कादायक वास्तव योगिता यांना भोपाळला गेल्यावर कळले. तरीही कॉमर्स तसेच वकिलीचे शिक्षण झालेल्या आणि साधेसेच…

Read More

अनंत पांगारकर | सोमवार, दि.२९ एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शिर्डी आणि अहमदनगरमधील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या दोन्ही मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा सामना करावा लागणार आहे. वंचितच्या उमेदवारांमुळे या मतदारसंघातील लढती चर्चेत आल्या आहे. शिर्डीमध्ये दोघांनी तर अहमदनगरमध्ये तब्बल अकरा जणांनी माघार घेतल्याने शिर्डीत २० तर अहमदनगरमध्ये २५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात एकमेकांसमोर उतरले आहे. दोन्ही मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढविली आहे. दोघात तिसरा आल्याने या मतदार संघातील राजकीय गणित बदलण्याची चिन्हे निर्माण झाली असल्याने प्रतिस्पर्धी उमेदवारांनी याचा धसका घेतला आहे. शिर्डीत वंचित बहुजन आघाडीच्या…

Read More

शिर्डी, सोमवार, दि.२९ एप्रिल श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे निवडणूक भरारी पथकाने १ लाख १९ हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. रविवारी दुपारी पावणेतीन वाजता ही कारवाई करण्यात आली. शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी दिनकर सचिन सुरेश यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत पथकाने ही कारवाई केली आहे. नियमित तपासणी करत असताना नेवासा-श्रीरामपूर रोडवर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या गाड्यांची तपासणी करत असतांना एका चारचाकी गाडीतून ही रक्कम हस्तगत करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ५० हजार रुपयांच्या वरील रकमेचा हिशोब संबंधितास व्यवस्थित न देता आल्यास सदर रक्कम जमा करण्यात येत असते. शिर्डी लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी…

Read More

सोमवार, दि.२९ एप्रिल राज्यात दोन टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता पुढच्या टप्प्यातील प्रचाराने वेग घेतला आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात सभांचा धडाका लावला असताना सोमवारची पुण्यातील त्यांची सभा एका सुशिक्षित बेरोजगार तरुणामुळे चर्चेत आली आहे. पुणे शिरूर बारामती आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महा विजय संकल्प सभेचे पुण्यातील वानवडी येथील रेस कोर्स मैदानावर आज (सोमवारी) संध्याकाळी साडेपाच वाजता आयोजन करण्यात आले आहे. सभेसाठी जवळपास दोन लाखावर लोकांची उपस्थिती राहील, या दृष्टीने सभेची जय्यत तयारी आठवडाभरापासून सुरू होती. यातच आता एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाने या परिसरात लावलेले फ्लेक्स चर्चेत आले…

Read More

भाग – ४ | प्रवीण पुरो एखाद्या व्यक्तीने किती खोटं बोलावं याला काही मर्यादा असतात. महत्वाच्या पदावर असणार्‍या व्यक्तीचा प्रत्येक शब्द ताऊन सुलाखून व्यक्त झाला पाहिजे. वाह्यात बोलणं संकटात टाकू शकतं. बेरक्या माणसाला त्याचं काही वाटत नसलं तरी अशा व्यक्तीमुळे पदाची आणि देशाचीही गरीमा खालावते. देशाच्या प्रधान मंत्र्याने वा राष्ट्राध्यक्षाने तर अशावेळी कमालीची सजगता राखली पाहिजे. सरकारचा प्रमुख म्हणून तर त्याच्या सहकार्‍यांचंही माप अशा जबाबदार व्यक्तीकडे असतं. दुर्देवाने आपल्या देशाच्या पंतप्रधानाने या सार्‍या गोष्टीला फाटा देत देशाचं नाव जगभरात काळवंडलं आहे. स्वत:ला देशाचा चौकीदार म्हणवून घेणार्‍या पंतप्रधान मोदींनी केलेल्या थापेबाजीची दखल आंतरराष्ट्रीय जगताने घेतली आहे. इंटरनेटच्या मायाजाळात आपल्या या चौकीदाराची…

Read More

शनिवार, दि.२७ एप्रिल  सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचा माहोल आहे. एकीकडे उन्हाचा पारा उच्चांकाकडे सरकत असताना दुसरीकडे लोकसभा निवडणुक प्रचार देखील तापू लागला आहे. अशा स्थितीत संगमनेर करांना दिलासा देणारी बातमी समोर आली असून संगमनेरची अमृतवाहिनी असलेली प्रवरा नदी महिनाभर वाहती राहणार आहे. त्यामुळे उन्हाच्या आणि निवडणुकीच्या गर्मीमध्ये पाण्याचा थंडावा मिळणार आहे. उन्हाळी हंगामातील पिण्यासाठी व शेतीच्या सिंचनासाठी निळवंडे धरणातून शनिवारी सायंकाळी प्रवरा नदीपात्रात १३५० क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे. या आवर्तनामुळे शेती पिकांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. महिनाभरासाठी हे आवर्तन असल्याने प्रवरा नदी वाहती राहणार आहे. ऐन उन्हाची लाही-लाही त्यातच लोकसभा निवडणुकीचा चढलेला ज्वर यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वातावरण…

Read More