Author: अनंत पांगारकर
अहमदनगर दि. २६ एप्रिल अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी २७ उमेदवारांनी ३२ नामनिर्देशन पत्र दाखल केले असून आतापर्यंत या मतदारसंघात ४३ उमेदवारांनी ५५ नाम निर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती देण्यात आली. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी गोरख दशरथ आळेकर (अपक्ष), डॉ. योगिता प्रविण चोळके (अपक्ष), उमाशंकर श्यानमबाबु यादव (बहुजन समाजपार्टी), सुर्यभान दत्तात्रय लांबे (अपक्ष), जहीर युसुफ जकाते (अपक्ष), प्रा. सुनिलराव मोहनराव पाखरे (अपक्ष व भारतीय जनता पार्टी), शिवाजीराव वामन डमाळे (सैनिक समाज पार्टी), कलीराम बहिरु पोपळघट (भारतीय नवजवान सेना पक्ष), शितोळे सुदर्शन लक्ष्मण (अपक्ष व हिंदू एकता आंदोलन पार्टी), शेकटकर अनिल गणपत (अपक्ष), मुक्ता…
गुरुवार, दि.२५ एप्रिल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसने आमदार वर्षा गायकवाड यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. त्यांच्या विरोधातील महायुतीचा विशेषतः भाजपाचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वाट्याला मुंबईतून अपेक्षित जागा मिळू न शकल्याने गायकवाड नाराज होत्या. मात्र आता ऐनवेळी काँग्रेसने त्यांना उमेदवारी जाहीर करत त्यांची नाराजी देखील दूर केल्याचे बोलले जाते. वर्षा गायकवाड या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष असून शालेय शिक्षण मंत्री देखील राहिल्या आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघात चर्चेतील लढत होणार आहे. आता महायुतीकडून त्यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी दिली जाते याकडे लक्ष लागले आहे.
अहमदनगर, बुधवार दि.२४ एप्रिल अहमदनगर लोकसभा मतदारसंघात बुधवारी सात उमेदवारांनी ११ नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार प्राजक्त तनपुरे यांचा देखील समावेश आहे. याशिवाय अकरा इच्छुकांनी अठरा नामनिर्देशन पत्र नेल्याची माहिती देण्यात आली आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये मदन कानिफनाथ सोनवणे (राईट टु रिकॉल पार्टी), रवींद्र लिलाचंद कोठारी (अपक्ष), अमोल विलास पाचुंदकर (अपक्ष), प्राजक्त प्रसादराव तनपुरे (नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), महेंद्र दादासाहेब शिंदे (वंचित बहुजन आघाडी व अपक्ष), मच्छिंद्र राधाकिसन गावडे (अपक्ष) व छगन भिकाजी पानसरे (अपक्ष) यांचा समावेश आहे. निवडणुकीतील दोन प्रमुख उमेदवार महायुतीचे डॉ. सुजय विखे व महाविकास आघाडीचे निलेश लंके यांनी…
शिर्डी, बुधवार दि.२४ एप्रिल शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस उरला आहे. तत्पूर्वी या मतदारसंघातून महाविकास आघाडी, महायुतीच्या उमेदवारांपाठोपाठ बुधवारी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघातील तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. रूपवते यांच्यासह बुधवारी या मतदारसंघात नऊ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. तर अन्य सात जणांनी आणखी चौदा नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने या मतदारसंघात नेमके किती अर्ज दाखल होत आहे स्पष्ट होईल. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये उत्कर्षा प्रेमानंद रूपवते (वंचित…
मंगळवार, दि.२२ एप्रिल गेल्या आठवड्यात अहमदनगर एलसीबीच्या पथकाने संगमनेरात कत्तलखान्यावर टाकलेल्या छाप्यात गोमांसासह सुमारे २१ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. त्या पाठोपाठ सोमवारी रात्री अकरा वाजता संगमनेरच्या पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाने पुन्हा येथील बेकायदेशीर कत्तलखान्यावर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी जिवंत गोवंश जनावरांच्या केलेल्या कत्तलीचे सुमारे पाच लाख रुपये किमतीचे अडीच हजार किलो गोमांस बाजारात विक्रीला जाण्यापूर्वीच पकडले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत सलीम जान मोहम्मद कुरेशी (वय १९ वर्ष, सुभाष नगर, कोपरगाव हल्ली रा. मदिना नगर, संगमनेर) व कैश अशपाक कुरेशी (वय २२ वर्ष, रा. मदिना नगर, संगमनेर) दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना संगमनेरच्या न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली.…
मंगळवार, दि.२२ एप्रिल मंगळवारी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यासह पाच उमेदवारांनी सहा उमेदवारी अर्ज दाखल केले. तर १३ इच्छुकांना १५ नामनिर्देशन पत्रांचे वाटप केल्याची माहिती देण्यात आली. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. सोमवारपासून या मतदारसंघात उमेदवारांनी आपल्या अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) यांनी दोन, भाऊसाहेब बापूराव वाबळे (भारतीय जवान किसान पार्टी) यांनी एक नामनिर्देशनपत्र, नवशाद मुन्सीलाल शेख (अपक्ष) एक नामनिर्देशनपत्र, दत्तात्रय आप्पा वाघमोडे ( राष्ट्रीय जनक्रांती पार्टी) एक नामनिर्देशनपत्र व गिरीश तुकाराम जाधव (अपक्ष) यांचा समावेश आहे.…
मंगळवार, दि.२३ एप्रिल शिर्डी लोकसभा मतदारसंघात सोमवार पर्यंत चार उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर मंगळवारी त्यात आणखी दोघांची भर पडली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संख्या सहावर गेली. तर आणखी ११ जणांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नामनिर्देशन पत्र नेले असल्याची माहिती देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी, महायुतीकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे या दोन प्रमुख उमेदवारांशिवाय चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष) व अभिजित अशोकराव पोटे (अपक्ष) यांनी देखील अर्ज दाखल केले होते. तर मंगळवारी भारत संभाजी भोसले (समता पार्टी) व नितीन दादाहरी पोळ (बहुजन भारत पार्टी) या २ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा…
शिर्डी, मंगळवार दि.२३ एप्रिल शिर्डी लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात संबंधित मुद्रक, प्रिंटर्सनी प्रचार साहित्य तसेच इतर छपाई बाबत विशेष काळजी घेऊन आचारसंहितेचे पालन करावे. प्रचार साहित्यावर मुद्रक व प्रकाशकांचे नाव छापणे बंधनकारक असल्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले आहे. काय सांगतो कायदा… लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या ‘कलम १२७ अ’ द्वारे निवडणूक पत्रकांच्या छपाईवर आणि प्रसिद्धीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याकडे सर्व राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार आणि मुद्रणालयांच्या चालक व मालकांचे लक्ष वेधण्यात येत आहे. हाताने नक्कल काढण्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रक्रियेने छापण्यात किंवा अनेक…
मंगळवार, दि.२३ एप्रिल नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी संगमनेर मधील कर्जदार आरोपी उद्योजक अमित पंडित यांच्या न्यायालयीन कोठडीत सोमवारी ३ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तर पंडित याची पत्नी सपना, मुलगा सात्विक आणि भागीदार सत्येन्द्र कुमार रावत यांना मात्र तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. नगर अर्बन २९१ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील बडा ३३ कोटी रुपयांचा कर्जदार म्हणून आरोपी पंडित याच्यासह त्याच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. पंडित गेल्या काही दिवसांपासून अटकेत असून न्यायालयीन कोठडीत आहे. तर पंडितची पत्नी सपना, मुलगा सात्विक आणि भागीदार रावत आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर होते. मात्र आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अद्यापपर्यंत अटक केली नव्हती. दरम्यानच्या कालावधीत या…
सोमवार, दि.२२ एप्रिल अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात महायुतीचे सुजय विखे यांच्यासह चार उमेदवारांनी सोमवारी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केले. सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. विखे यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले असून विखे यांच्यासह महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने डॉ. कैलाश निवृत्ती जाधव, समता पार्टीच्या वतीने भागवत धोंडीबा गायकवाड यांनी तर ॲड. महंमद जमीर शेख यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय सोमवारी पाच इच्छुकांनी बारा नामनिर्देशन पत्र नेले आहेत. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. शुक्रवारी…
