Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राष्ट्राच्या उभारणीत ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचे मोठे योगदान आहे. म्हणूनच सामर्थ्य संपन्न राष्ट्र निर्मिती करणाऱ्या शिक्षकांना राष्ट्र बांधणीचे शिल्पकार पुरस्काराने सन्मानित करण्याचे इनरव्हीलचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखरपाटील यांनी केले. येथील इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरतर्फे जिल्ह्यातील ४२ शिक्षकांना इनरव्हील राष्ट्रबांधणीचे शिल्पकार पुरस्काराने व पाच शाळांना पर्यावरण पूरक, उपक्रमशिल व आनंदी शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या प्रसंगी शेखर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, इनरव्हील जिल्हा ३१३ च्या प्रेसिडेंट रचना मालपाणी, ज्ञानेश्वर काजळे, गणेश काजळे, गटशिक्षणाधिकारी सुवर्णा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क घारगाव : संगमनेर तालुक्यातील बोटा येथे महाशिवरात्रीनिमित्त कच नदीच्याकाठी श्री कचेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे. मात्र यंदा गावातील मुस्लीम बांधवांनी सामाजिक सलोखा जपत हरिनाम सप्ताहामध्ये उभारण्यात आलेल्या मंडप खर्चाची जबाबदारी घेतली आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे गावात हिंदू-मुस्लिम ऐक्याची वीण घट्ट असल्याचे ग्रामस्थांनी दाखवून दिले. दरवर्षीप्रमाणे यंदाही बोटा येथे महाशिवरात्रीनिमित्त कच नदीच्याकाठी श्री कचेश्वर मंदिरात रविवार दि. १२ ते रविवार दि.१९ फेब्रुवारीपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताह काळात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच रोज सायंकाळी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर यांच्या मार्फत अहमदनगर जिल्ह्यातील ७०२ विद्यार्थ्यांना खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या हस्ते मोफत टॅबचे रविवारी वितरण करण्यात आले. यावेळी इतर मागासवर्ग बहूजन कल्याण विभागाचे नाशिक विभाग उपसंचालक डॉ. भगवान वीर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील पठारे, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, समाजकल्याण सहायक आयुक्त राधाकिसन देवढे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. महाज्योती या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास-प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी या हेतूने पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण, जीईई, नीट, एमएचटी-सीईटी, एमपीएससी, युपीएससी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर स्वर्गीय उद्योगपती माधवलालजी मालपाणी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या सफायर मॅरेथॉन स्पर्धेला धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेतील पाच गटांतील विजेतेपदे अनुक्रमे अजय राठोड, आर्या अंत्रे, खुशी हासे, सचिन भारद्वाज आणि संदीप चौधरी यांनी पटकावले. मालपाणी उद्योग समूहाचे स्व. उद्योगपती माधवलाल मालपाणी यांच्या स्मरणार्थ मागील १० वर्षांपासून लायन्स क्लब संगमनेर सफायरद्वारे सहा किलोमीटर अंतराची ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येते. रविवारी सकाळी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मालपाणी लॉन्सपासून स्पर्धेला शुभारंभ झाला. लायन्स क्लबचे प्रांतपाल राजेश कोठावदे यांच्या हस्ते स्पर्धेला झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी कोठावदे यांच्यासह मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, स्वदेश उद्योग समूहाचे चेअरमन…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुंबई महापुरुषांवरील सातत्याने केलेली टीका आणि विरोधकांच्या कायमच निशाण्यावर राहिलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला असून महाराष्ट्राला आता रमेश बैस यांच्या रूपाने नवे राज्यपाल लाभले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करताना बैस यांच्यासह देशभरात तेरा राज्यात राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. बैस यांनी यापूर्वी झारखंडचे राज्यपाल म्हणून काम बघितले आहे. ते महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल असतील. राज्यपाल कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात त्यांच्याविरोधात मोठं रान उठलं होतं. राज्यपालांना तातडीने पदावरून दूर करा, अशी मागणी विरोधकांनी लावून…
लेखक दैनिक आपलं महानगर चे माजी निवासी संपादक आहेत रविवार विशेष | प्रवीण पुरो गौतम अदानींच्या संपत्तीचा मामला आता प्रत्येकाचं घर घेरणारा ठरू लागला आहे. मी बुडेन पण तुम्हाला घेऊनच, या तयारीने अदानींच्या साम्राज्याला हादरे बसू लागले आहेत. जितक्या जलद वर जावं तितक्याच जलद गतीने खाली येण्याची क्रिया ही नैसर्गिक आहे. म्हणूनच अशियात श्रीमंती गाठण्यासाठी धिरुभाई अंबानींना 60 वर्षांचा काळ कामी घालावा लागला. 2014 मध्ये ज्या व्यक्तीची श्रीमंती जगात 120 क्रमांकावर होती ते मोदी सत्तेच्या आठ वर्षात दुसर्या क्रमांकावर पोहोचत असेल तर संशयाला बाधा उत्पन्न होणारच. अदानींच्या या श्रीमंतीचं राज काय, असा प्रश्न कोणी विचारला आणि पंतप्रधान तोंडाचा चंबू करून…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पारनेर अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, जी एस महानगर बँकेचे अध्यक्ष एडिशनल उदय गुलाबराव शेळके (वय ४५ वर्ष) यांचे मुंबईत अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. शेळके यांच्या रूपाने सहकार क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व हरपले आहे. शेळके यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यातच त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याने शेळके यांच्यावर मुंबईचा लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या पाच महिन्यापासून ते बेशुद्ध अवस्थेत होते. शनिवारी रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पारनेर तालुक्यातील जलसेन पिंपरी येथील रहिवासी असलेले शेळके सहकारातील दिग्गज नेते म्हणून ओळखले…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर श्रीमंतीपेक्षा दातृत्वाचा ठेवा सर्वाधिक महत्त्वाचा असून या दातृत्वाने कडलग परिवाराने नावलौकिक प्राप्त केला आहे, असे प्रतिपादन पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुवर्णाताई फटांगरे यांनी केले. इनरव्हील क्लबच्या संकल्पनेतून सुनील कडलग व वृषाली कडलग यांनी आपल्या मातोश्री स्व. शकुंतला किसनराव कडलग यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी या शाळेला दिलेल्या डिजिटल सॉफ्टवेअर उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना चित्रकला वही, रंगपेटी व गोष्टींची पुस्तके बक्षीस म्हणून देण्यात आली. फटांगरे म्हणाल्या, या डिजिटल सॉफ्टवेअरमुळे रामवाडीच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणार आहेत. दुर्गम शाळेतील विद्यार्थी डिजिटल सॉफ्टवेअरमुळे आपल्या अभ्यासात नक्कीच प्रगती करतील. कडलग परिवार व इनरव्हील क्लब…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर संगमनेर शहर व तालुका परिसरात सुरू असलेले अवैध धंदे बंद करावेत, या मागणी संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने संगमनेरच्या पोलीस उपाधीक्षकांना निवेदन देण्यात आले. संगमनेर शहर व तालुका परिसरात अवैध धंदे, जुगार, मटका, वाळू तस्करी व अवैध गुटखा, बनावट दारू विक्री असे सर्वच प्रकारचे विविध अवैध व्यवसाय सर्रासपणे दिवसा-ढवळ्या सुरू आहे. सदर अवैध व्यवसायांमुळे अनेक गोरगरिबांची घरे उध्वस्त झालेली आहेत. तरी हे व्यवसाय २० फेब्रुवारीपर्यंत पूर्णपणे बंद न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्याही वेळी रस्त्यावर उतरून लोकहितासाठी आंदोलन करील असा इशारा निवेदनाद्वारे मनसे शहर उपाध्यक्ष अभिजीत घाडगे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क प्रतिनिधी संगमनेर तालुका मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने राजापूरचे (कोकण) पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तहसीलदारांच्या वतीने नायब तहसीलदारांनी पत्रकारांचे निवेदन स्वीकारले. राज्यभरात पत्रकारांवर सुरू असणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, मयत शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात यावी व हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा अन्यथा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर व सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली यापुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी अध्यक्ष शेखर पानसरे तसेच आनंद गायकवाड, गोरक्ष नेहे, संदीप इटप, श्याम तिवारी, निलिमा घाडगे, गोरक्ष मदने, सचिन जंत्रे, अमोल मतकर,…
