Author: अनंत पांगारकर
सोमवार, दि.२२ एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत अखेर बिघाडी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये संघर्ष सुरू होता. त्यातच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगत त्यांना पाठिंबा दर्शविला होता. महाविकास आघाडीतील जागा वाटपापूर्वीच सांगलीच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. यामुळे काँग्रेसमध्ये संतापाचे वातावरण होते. शेवटच्या क्षणापर्यंत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला यावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र यात काँग्रेस नेत्यांना अपयश आले. विशाल पाटील यांनी या…
सोमवार, दि.२२ एप्रिल मला दहा लाख रुपये दे, नाहीतर मी तुला या बांधकाम साइटवरील एकही फ्लॅट विकू देणार नाही, तुझे ही साईट बंद करून टाकेल. असा बिल्डरला दम दिल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. याप्रकरणी खंडणी मागणाऱ्या विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रमोद बाळकृष्ण गोरे (वय ५५ वर्ष, रा. प्रकाश नगर, शिखरेवाडी, नाशिक रोड, नासिक) यांनी यासंदर्भात नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी (दि.२१ एप्रिल) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गोरे हे मालधक्का रोडवरील नुरी मज्जिद नाशिक रोड येथे सुरू असलेल्या इमारत बांधकामाच्या साइटवरील ऑफिसमध्ये बसलेले असताना त्यांच्या ओळखीच्या…
सोमवार, दि.२२ एप्रिल सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाची सांगता आज होत आहे. या हंगामात कारखान्याने १० लाख ८५ हजार मेट्रिक टनाचे उच्चांकी ऊस गाळप केले असून यापुढील काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकरी उत्पादन वाढविण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२०२४ च्या ऊस गळीत हंगामाची सांगता थोरात यांच्या उपस्थितीत झाली, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते. समवेत व्यासपीठावर कांचनताई थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, शंकरराव खेमनर, हिरालाल पगडाल, इंद्रजीत थोरात, रामहरी कातोरे, गणेश…
सोमवार, दि.२२ एप्रिल पंतप्रधानांचे कार्यालय हे मानवतेचे कार्यालय राहिले नसून ते आत्ता वसुलीचे कार्यालय झाले आहे. मोदी सगळ्यात मोठे हप्ता बहादूर आहेत. मोदींनी ईडी लावली. सीबीआय लावली. आयबी मागे लावली. इन्कम टॅक्स विभाग मागे लावला. यंत्रणा येत होत्या. नोटीस दिल्या, रेड केल्या. पण एकाला आतमध्ये घातले का? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांकडून उपस्थित करण्यात आला आहे. राज्यात महाविकास आघाडीसोबतची चर्चा फिस्कटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून २० पेक्षा अधिक ठिकाणी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहेत. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे स्वतः अकोला लोकसभेतून निवडणूक लढवत असून यासाठी या मतदारसंघात त्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. रविवारी (ता. २१ एप्रिल)…
रविवार, दि.२१ एप्रिल गेले ४० वर्षे राजकारणात सक्रिय असलेले माजी आमदार, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे माजी अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे राजकीय वारसदार जावई मुश्ताक अंतुले सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. यामुळे कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढण्यास मदत होणार असून काँग्रेससाठी हा धक्का असेल. सोमवारी (दि.२२ एप्रिल) मुंबईत सकाळी ११ वाजता एमसीए लाउंज, वानखेडे स्टेडियम येथे हा प्रवेश सोहळा होणार आहे. तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नेतृत्वाखाली सर्वांना सोबत येत राज्य विकासाच्या वाटेवर नेले जात असल्याने अनेक नेते…
रविवार, दि.२१ एप्रिल कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील तरुण व तरुणींना स्पर्धा परीक्षेसाठी मोफत अद्यावत लायब्ररी सुरू करण्यात आली असून या लायब्ररीमुळे तालुक्यातील तरुणांना मोठी संधी उपलब्ध झाली असल्याचे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात एकविरा फाउंडेशनच्यावतीने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लायब्ररीचा शुभारंभ आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. जयश्रीताई थोरात, प्रा. डॉ. वृषाली साबळे, श्रीराम कुऱ्हे, सुरभी मोरे, सुरभी असोपा, प्रा. बाबा खरात, नामदेव कहांडळ, विजय वाकचौरे आदी उपस्थित होते. यशोधन कार्यालयात या लायब्ररीचा स्वतंत्र कक्ष असून सोमवार ते…
रविवार, दि.२१ एप्रिल नांदूर शिंगोटे – लोणी रस्त्यावर संगमनेर तालुक्यातील निमोण गावात झालेल्या कंटेनर व दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. अपघातातील मृत नाशिक जिल्ह्यातील नांदूर शिंगोटे गावचे असून जखमी अकोले तालुक्यातील गर्दनी गावचा आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. कुंडलिक पंढरीनाथ मेंगाळ (वय ३० वर्ष) व युवराज धोंडीबा मेंगाळ (वय २९ वर्ष, दोघेही रा. नांदूर शिंगोटे, नाशिक) अशी दोघा मृत तरुणांची नावे असून संदीप संतोष आगिवले (रा. गर्दनी, ता. अकोले, जि. अहमदनगर) हा गंभीर जखमी झाला असून त्याला सिन्नरच्या दोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल…
भाग तिसरा | प्रवीण पुरो कोणत्या संकटाचा फायदा कसा उपटावा याचा चौकीदार कंपनीला जणू पूर्वानुभवच असावा. पुलवामाच्या संकटाला निवडणुकीचं निमित्त करत सैनिकांच्या नावाने स्वैराचार करणारे कशाचीही परवा करण्याची शक्यताच नव्हती. रफेलचा घोटाळ्यात हात मारणारे आणि इलेक्टोल बॉण्डच्या माध्यमातून कोट्यवधींची धुळधाण करणारे मृतांच्या टाळूवरील लोणी ओरपायलाही कमी करत नाहीत, असा घृणास्पद अनुभव सारा देश घेत आहे. जगात कोरोनाच्या महामारीने डोकं वर काढल्यावर याचा फायदा चौकीदाराचं सरकार घेईल, असं यत्किंचितही वाटत नव्हतं. अनेक देशांत लाखोंच्या संख्येने लोकं मृत्यूमुखी पडत होते. प्रचंड लोकसंख्येच्या भारत देशात याची झळ पोहोचणार हे स्पष्टच होतं. सरकार म्हणून कशाकशाला तोंड देणार, असा प्रश्न सर्वसामान्यांनाही पडत होता. लोकांच्या असल्या…
अहमदनगर, शनिवार दि.२० एप्रिल अहमदनगर जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत ३० एप्रिल पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७(१) व ३७(३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे. जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, ध्वनीवर्धक…
शनिवार, दि.२० एप्रिल अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अद्याप एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नसून आज ९ इच्छुक उमेदवारांनी २२ उमेदवारी अर्ज नेले असण्याची माहिती देण्यात आली आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून शुक्रवार पर्यंत २० इच्छुकांनी ४३ उमेदवारी अर्ज नेले होते. त्यात आणखी नऊ जणांची भर पडली आहे. इच्छुकांची संख्या वाढत असली तरी गेल्या तीन दिवसात एकही उमेदवारी अर्ज या मतदारसंघात दाखल झाला नाही. सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस वगळता गुरुवारपर्यंत (दि.२५ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे शेवटच्या दोन-तीन दिवसात प्रमुख उमेदवारांसह अन्य इच्छुकांचे मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात…
