Author: अनंत पांगारकर

बुधवार, दि. ८ मे बिअर शॉपीचा परवाना मंजूर करून देण्यासाठी वर्ग एक ते तीनच्या तिघा अधिकाऱ्यांनी दीड लाख रुपयांची मागणी केली. प्रत्यक्षात एक लाख रुपयांची लाख स्वीकारताना दोघा जणांना लाच लूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तिघांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील (वय ५४ वर्ष), दुय्यम निरीक्षक चेतन माधवराव खारोडे (वय ३४ वर्ष) आणि कार्यालय अधीक्षक अभय बबनराव खताळ वय ५३ वर्ष) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघा लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहे. चंद्रपूरमध्ये लाचखोरीचा हा प्रकार समोर आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस येथील तक्रारदाराने या संदर्भात चंद्रपूरच्या लाच लुचपत विभागाकडे तक्रार…

Read More

मंगळवार दि. ८ मे देशात आज तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. भाजप, एनडीए देशभरात चांगला प्रतिसाद मिळत असून ४ जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर येथील सभेत केले. मंगळवारी दुपारी अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान काँग्रेसवर टीका करत म्हणाले, काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुस्लिम लीगचा जाहीरनामा आहे. ओबीसी, एससी एसटी आदींचे आरक्षण काढून ते मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. ज्या गोष्टीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विरोध केला होता तीच गोष्ट आता ही लोक…

Read More

मंगळवार, दि. ७ मे  शुक्रवारी (दिनांक १० मे) सायंकाळी सहा वाजता अहमदनगरच्या झोपडी कॅन्टीन जवळील माऊली सभागृहात “निर्भय बनो, नागरिकांशी संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निर्भय बनो, सकल भारतीय समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सभेत ॲड. असीम सरोदे, ॲड. निशा शिवूरकर, डॉ. विश्वंभर चौधरी अहमदनगरकर नागरिकांशी संवाद साधणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘जागे व्हा, धोक्याची घंटा वाजली आहे’ या टॅगलाईन खाली होत असलेल्या या सभेसाठी अहमदनगरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Read More

मंगळवार, दि. ७ मे संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येत असलेल्या वडगाव पान येथील उप बाजारामध्ये मंगळवार गुरुवार आणि शुक्रवारी कांदा लिलाव सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील तसेच परिसरातील शेतकऱ्यांसाठी यामुळे कांदा विक्रीची मोठी सोय झाली आहे. राज्याचे माजी कृषिमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडगाव पान उपबाजारात मंगळवारी कांदा लिलावास प्रारंभ झाला. यावेळी सभापती शंकर खेमनर, सहकार महर्षी थोरात कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, उपसभापती गीताराम गायकवाड, संचालक कैलास पानसरे, मनीष गोपाळे, सुरेश कान्होरे, सतीश खताळ, विजय सातपुते, रुक्मिणी साकुरे, दिपाली वर्पे, सुधाकर ताजणे, अनिल…

Read More

मंगळवार, दि. ७ मे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या वाहनावर सोमवारी रात्री दगडफेक करत रुपवते यांच्यावर हल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोले तालुक्यातील चितळवेढे गावात ही घटना घडली. या हल्ल्यात रूपवते सुदैवाने बचावल्या आहेत. राज्यात मंगळवारी तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू असताना हा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान रूपवते यांनी आपण हल्ल्यातून बचावला असून सुरक्षित असल्याचे सांगितले आहे मिळालेल्या माहितीनुसार उत्कर्षा रुपवते अकोले तालुक्यातील प्रचार दौरा आटोपून सोमवारी रात्री परतत होत्या. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्या प्रचार सभा आटोपून अकोले तालुक्यातील चितळवेढे गावाजवळ आले असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक करत रुपवते यांच्यावर हल्ल्याचा…

Read More

सोमवार, दि. ६ मे नगर अर्बन बँकेसंदर्भातील एका महत्त्वाच्या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाने सोमवारी निर्णय दिला. हा निर्णय येताच बँक बचाव समिती व ठेवीदारांनी जल्लोष केला आहे. नगर अर्बन बँकेसंदर्भात माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीनुसार दाखल झालेला गुन्हा कायम राहील तसेच या गुन्ह्यात लावलेले महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण (एमपीआयडी) कायद्याचे कलमही कायम असेल, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने सोमवारी दिला. खंडपीठाच्या या निकालाने नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या संचालकांना दणका बसला असून बसला असून त्यांना आता पोलिसांसमोर शरणागती पत्करल्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे सांगितले जाते. दरम्यान नगर अर्बन बँकेचे ठेवेदार व बँक बचाव समितीचे समर्थक…

Read More

सोमवार, दि. ६ मे  नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी माघारी संदर्भात चांगलेच महानाट्य रंगले होते. शेवटच्या मिनिटाला अर्ज मागे घेण्यासाठी एका उमेदवाराची चांगलीच धावपळ उडाली होती. या दरम्यान बहुचर्चित ठरलेल्या शांतिगिरी महाराज यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेकडून भरलेला उमेदवारी अर्ज छाननी बाद झाल्यानंतर त्यांचा अपक्षाच्या रूपाने दुसरा अर्ज निवडणुकीत कायम होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ते आपली उमेदवारी मागे घेतील असा अनेकांचा कयास होता. मात्र निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर महाराज ठाम राहिले. यामुळे त्यांच्या उमेदवारीचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसणार असल्याचे बोलले जात आहे. नासिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात…

Read More

सोमवार, दि. ६ मे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाकलेल्या छाप्यात झारखंड सरकारमधील एका मंत्राच्या खासगी सचिवाच्या नोकराच्या घरी अधिकाऱ्यांना नोटांचे घबाड सापडले आहे. कारवाईत कोट्यावधीची रोकड जप्त करण्यात आले असून पैसे मोजण्यासाठी मशीन्स मागविण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणूक सुरु असतानाच ईडीने केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे झारखंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. झारखंडमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तब्बल ९ ठिकाणी छापे टाकले आहेत. झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरी तसेच काही अभियंत्यांच्या घरीही ईडीने छापेमारी केली असल्याची माहिती समोर येत आहे. झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरी तब्बल…

Read More

सोमवार, दि. ६ मे नासिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक असलेले शिवसेनेचे विजय करंजकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पाठोपाठ शिंदे यांनी त्यांच्यावर उपनेते आणि नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असल्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर उबाठा शिवसेना गटाला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यभर दौरे करत असताना नासिक लोकसभा मतदारसंघात रविवारी मोठ्या घडामोडी घडल्या. रविवारी विजय करंजकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मुंबईमध्ये शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. नासिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले…

Read More

अहमदनगर दि. ५ मे  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशांनुसार अहमदनगर व शिर्डी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी जिल्हा मतदार दूत डॉ. अमोल बागुल यांच्या संकल्पनेतून मतदानाला जाण्याअगोदरच मतदान केंद्राच्या आतील रचना व मतदान प्रक्रियेचा क्रम समजण्यास सुलभ व्हावा म्हणून व्ही आर बॉक्स डोळ्याला लावत घरी बसून मतदान केंद्रामध्ये फिरता येणार आहे. अहमदनगर जिल्हा स्वीप समितीच्या मतदान प्रक्रियेत व्हर्चुअल रियालिटी म्हणजे आभासी वास्तविकता तंत्रज्ञानाच्या प्रयोगाचे राज्य व देश पातळीवर कौतुक होत आहे. मतदान केंद्राचा एक मिनिटाचा थ्रीडी व्हिडिओ गुगल मायक्रोसॉफ्ट व ॲपल टीचर डॉ. बागुल यांनी तयार केला असून तो मोबाईलमध्ये लावून व्ही आर बॉक्स व…

Read More