Author: अनंत पांगारकर
बुधवार, दि. ८ मे पती-पत्नीच्या वादाचा अंत अखेर पत्नीने दोन्ही मुलींचा गळफास देत खून करत स्वतः इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्यात झाला. पत्नीने स्वतः चिमुकलीचा आत्महत्या पूर्व व्हिडिओ नातलगांना पाठवत आत्महत्या केल्याची ही दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली आहे. अश्विनी स्वप्निल निकुंभ (वय ३०), आराध्या स्वप्निल निकुंभ (वय ८) आणि अगस्त्या स्वप्निल निकुंभ (वय २) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. बुधवारी सकाळी सात वाजता आडगाव मधील जत्रा हॉटेल जवळील इच्छामणी नगरमध्ये असलेल्या हरीवंदन सोसायटीत ही दुर्दैवी घटना घडली. मृत अश्विनी हिने आत्महत्येपूर्वी पती स्वप्निल निकुंभ देत असलेल्या त्रासाच्या माहितीचा आराध्या आणि स्वत:चा व्हिडीओ नातलगांना पाठविला. तसेच पती स्वप्निल आणि…
बुधवार, दि. ८ मे ७ जुलै २०२४ रोजी विधान परिषदेच्या चार सदस्यांचा कार्यकाल संपत आहे. शिक्षक मतदार संघातील दोन आणि पदवीधर मतदारसंघातून दोन जागांचा यात समावेश आहे. निवडणूक आयोगाकडून या चार जागांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून त्यासाठी १० जूनला मतदान होणार आहे. मंगळवारी राज्यातील तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले. त्या पाठोपाठ निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणुकीची ही मोठी घोषणा केली आहे. विधान परिषदेतील मुंबई पदवीधर विधान परिषद मतदार संघाचे आमदार विलास विनायक पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघाचे निरंजन वसंत डावखरे, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे किशोर भिकाजी दराडे आणि मुंबई विभाग शिक्षक मतदारसंघातील कपिल हरिश्चंद्र पाटील यांचा कार्यकाल संपणाऱ्यामध्ये समावेश आहे.…
बुधवार, दि. ८ मे बिअर शॉपीचा परवाना मंजूर करून देण्यासाठी वर्ग एक ते तीनच्या तिघा अधिकाऱ्यांनी दीड लाख रुपयांची मागणी केली. प्रत्यक्षात एक लाख रुपयांची लाख स्वीकारताना दोघा जणांना लाच लूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तिघांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील (वय ५४ वर्ष), दुय्यम निरीक्षक चेतन माधवराव खारोडे (वय ३४ वर्ष) आणि कार्यालय अधीक्षक अभय बबनराव खताळ वय ५३ वर्ष) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघा लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहे. चंद्रपूरमध्ये लाचखोरीचा हा प्रकार समोर आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस येथील तक्रारदाराने या संदर्भात चंद्रपूरच्या लाच लुचपत विभागाकडे तक्रार…
मंगळवार दि. ८ मे देशात आज तिसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. भाजप, एनडीए देशभरात चांगला प्रतिसाद मिळत असून ४ जून ही इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर येथील सभेत केले. मंगळवारी दुपारी अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान काँग्रेसवर टीका करत म्हणाले, काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुस्लिम लीगचा जाहीरनामा आहे. ओबीसी, एससी एसटी आदींचे आरक्षण काढून ते मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. ज्या गोष्टीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विरोध केला होता तीच गोष्ट आता ही लोक…
मंगळवार, दि. ७ मे शुक्रवारी (दिनांक १० मे) सायंकाळी सहा वाजता अहमदनगरच्या झोपडी कॅन्टीन जवळील माऊली सभागृहात “निर्भय बनो, नागरिकांशी संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निर्भय बनो, सकल भारतीय समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सभेत ॲड. असीम सरोदे, ॲड. निशा शिवूरकर, डॉ. विश्वंभर चौधरी अहमदनगरकर नागरिकांशी संवाद साधणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘जागे व्हा, धोक्याची घंटा वाजली आहे’ या टॅगलाईन खाली होत असलेल्या या सभेसाठी अहमदनगरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
मंगळवार, दि. ७ मे संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येत असलेल्या वडगाव पान येथील उप बाजारामध्ये मंगळवार गुरुवार आणि शुक्रवारी कांदा लिलाव सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील तसेच परिसरातील शेतकऱ्यांसाठी यामुळे कांदा विक्रीची मोठी सोय झाली आहे. राज्याचे माजी कृषिमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडगाव पान उपबाजारात मंगळवारी कांदा लिलावास प्रारंभ झाला. यावेळी सभापती शंकर खेमनर, सहकार महर्षी थोरात कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, उपसभापती गीताराम गायकवाड, संचालक कैलास पानसरे, मनीष गोपाळे, सुरेश कान्होरे, सतीश खताळ, विजय सातपुते, रुक्मिणी साकुरे, दिपाली वर्पे, सुधाकर ताजणे, अनिल…
मंगळवार, दि. ७ मे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या वाहनावर सोमवारी रात्री दगडफेक करत रुपवते यांच्यावर हल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोले तालुक्यातील चितळवेढे गावात ही घटना घडली. या हल्ल्यात रूपवते सुदैवाने बचावल्या आहेत. राज्यात मंगळवारी तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू असताना हा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान रूपवते यांनी आपण हल्ल्यातून बचावला असून सुरक्षित असल्याचे सांगितले आहे मिळालेल्या माहितीनुसार उत्कर्षा रुपवते अकोले तालुक्यातील प्रचार दौरा आटोपून सोमवारी रात्री परतत होत्या. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्या प्रचार सभा आटोपून अकोले तालुक्यातील चितळवेढे गावाजवळ आले असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक करत रुपवते यांच्यावर हल्ल्याचा…
सोमवार, दि. ६ मे नगर अर्बन बँकेसंदर्भातील एका महत्त्वाच्या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाने सोमवारी निर्णय दिला. हा निर्णय येताच बँक बचाव समिती व ठेवीदारांनी जल्लोष केला आहे. नगर अर्बन बँकेसंदर्भात माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीनुसार दाखल झालेला गुन्हा कायम राहील तसेच या गुन्ह्यात लावलेले महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण (एमपीआयडी) कायद्याचे कलमही कायम असेल, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने सोमवारी दिला. खंडपीठाच्या या निकालाने नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या संचालकांना दणका बसला असून बसला असून त्यांना आता पोलिसांसमोर शरणागती पत्करल्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे सांगितले जाते. दरम्यान नगर अर्बन बँकेचे ठेवेदार व बँक बचाव समितीचे समर्थक…
सोमवार, दि. ६ मे नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी माघारी संदर्भात चांगलेच महानाट्य रंगले होते. शेवटच्या मिनिटाला अर्ज मागे घेण्यासाठी एका उमेदवाराची चांगलीच धावपळ उडाली होती. या दरम्यान बहुचर्चित ठरलेल्या शांतिगिरी महाराज यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेकडून भरलेला उमेदवारी अर्ज छाननी बाद झाल्यानंतर त्यांचा अपक्षाच्या रूपाने दुसरा अर्ज निवडणुकीत कायम होता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ते आपली उमेदवारी मागे घेतील असा अनेकांचा कयास होता. मात्र निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर महाराज ठाम राहिले. यामुळे त्यांच्या उमेदवारीचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसणार असल्याचे बोलले जात आहे. नासिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात…
सोमवार, दि. ६ मे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाकलेल्या छाप्यात झारखंड सरकारमधील एका मंत्राच्या खासगी सचिवाच्या नोकराच्या घरी अधिकाऱ्यांना नोटांचे घबाड सापडले आहे. कारवाईत कोट्यावधीची रोकड जप्त करण्यात आले असून पैसे मोजण्यासाठी मशीन्स मागविण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणूक सुरु असतानाच ईडीने केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे झारखंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. झारखंडमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तब्बल ९ ठिकाणी छापे टाकले आहेत. झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरी तसेच काही अभियंत्यांच्या घरीही ईडीने छापेमारी केली असल्याची माहिती समोर येत आहे. झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरी तब्बल…
