Author: अनंत पांगारकर

प्रवीण पुरो “न खाऊंगा, ना खाने दुंगा” या टॅगलाईनवर देशाला आणि देशातल्या जनतेला खोट्यात पाडणार्‍या देशाच्या पंतप्रधानांच्या साथीदारांनी, त्यांच्या पक्ष प्रमुखांनी आणि शिलेदारांनी इलेक्ट्रोल बॉण्डच्या माध्यमातून जमवलेल्या मायेचा थोडासा जरी हिशोब दिला तरी मोदी हे देशातल्या भ्रष्टाचाराचे खरे कर्दनकाळ आहेत, असं मानायला हरकत नाही. आजवर त्यांच्यावर, त्यांच्या सरकारवर आणि त्यांच्या पक्षावर झालेल्या आरोपाला साधं उत्तर देण्याचं दायित्व जी व्यक्ती पार पाडत नाही, तिला इतरांना उपदेश देण्याचा अधिकार नाही. स्वतंत्र भारताच्या इतिहासात आजवर झाला नाही इतका मोठा भ्रष्ट कारभार भाजपच्या सरकारने आणि त्या पक्षाने केला. इलेक्ट्रोल बॉण्ड म्हणजे निवडणूक रोख्यांच्या रुपात कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवणारे त्याचा जेव्हा हिशोब नाकारतात तेव्हा त्यात…

Read More

शनिवार, दि. १३ एप्रिल  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईसत्र पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. गेल्या दोन दिवसात २५ जणांवर हद्दपारची कारवाई केल्यानंतर शनिवारी पुन्हा आणखी एका गुन्हेगारावर हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. सिद्धार्थ उर्फ सिद्धांत दीपक मावस (रा. चत्तर हॉस्पिटलजवळ, संगमनेर खुर्द, संगमनेर) असे हद्दपार करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मावस याला नगर जिल्ह्यासह लगतच्या सिन्नर व जुन्नर तालुक्यातून देखील हद्दपार करण्यात आले असल्याचे आदेश संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी दिले असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. मावस याच्या विरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चोरीसह शरीरा विरुद्ध व माला विरुद्ध गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे…

Read More

शनिवार, दि. १३ एप्रिल अवैधरित्या वाळु वाहतुक करण्यासाठी, कारवाई न करण्यासाठी ३५ हजाराची लाच स्वीकारताना सिंदखेडराजाचे तहसीलदार सचिन शंकरलाल जैस्वाल, शिपाई पंजाब ताठे, चालक मंगेश कुलथे यांना ३५ हजारांची लाच स्वीकारताना शुक्रवारी पकडण्यात आले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी लाचखोर तहसीलदार जैस्वाल याच्या घराची झडती घेतली असता घरातील नोटांचे ढीग बघून अधिकारीही चक्रावले. जैस्वालच्या बंगला आणि निवासस्थानामध्ये घेतलेल्या झडतीत तब्बल ४७ लाखांची रोकड सापडल्याचे खळबळजनक वृत्त आहे. ३५ हजाराची लाच घेताना तहसीलदाराला पकडल्यानंतर बुलढाणा लाच लुचपत विभागाच्या पथकाने वेगाने कारवाई करत जैस्वाल यांच्या सिंदखेडराजा स्थित शासकीय निवासस्थानाची झाडाझडती घेतली. तिथे नोटांचे ढीगच पथकाच्या हाती लागले. त्याठिकाणी तब्बल ३७ लाख ५२ हजार रुपयांची रक्कम…

Read More

शनिवार, दि. १३ एप्रिल तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केली होती. त्या पाठोपाठ आज शनिवारी त्यांनी एका पत्रकार परिषदेत मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याची माहिती दिली आहे. ठाकरे यांनी मुंबईत आज एमआयजी क्लबमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महायुतीला प्रचारात सहकार्य करायचे की नाही, यासंदर्भातील बैठक घेतली. या बैठकीत महायुतीच्या उमेदवारांना प्रचारात सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. एका बाजूला कडबोळे आणि एका बाजूला खंबीर नेतृत्व अशावेळी पुन्हा त्यांना एकदा संधी देणे आवश्यक आहे वाटले. म्हणून…

Read More

शनिवार, दि. १३ एप्रिल  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया सुरू केल्या आहेत. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशावरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राबविलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवर असलेल्या आरोपीकडे पोलिसांना लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन राऊंड आढळले. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (१२ एप्रिल) पोलिसांनी राबविलेल्या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान आकाश उर्फ पप्पू बाबासाहेब गडाख (रा. पारेगाव बुद्रुक ता. संगमनेर) याच्या घर झडतीत पोलिसांना हे पिस्तूल आणि दोन राऊंड आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी आकाश गडाख याला ताब्यात घेत त्याच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३, ५,…

Read More

शुक्रवार, दि. १२ एप्रिल  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस रेकॉर्डवर असलेल्या संगमनेरमधील दोघा गुन्हेगारांना नगर जिल्ह्यासह लगतच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी काढले आहेत. कासिम असद कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) व इस्माईल निसार पठाण (रा. नाईकवाडपुरा, संगमनेर) अशी हद्दपार करण्यात आलेल्या दोघांची नावे असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी महाराष्ट्र संवाद न्यूजला दिली. कासिम कुरेशी याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात घातक शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जबर दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, जीवे मारण्याची धमकी देणे, अल्पवयीन मुलीस पालकांच्या कायदेशीर रखवालीतून पळून नेणे, प्राण्यांना निर्दयतेने वागविणे, त्यांची कत्तल करणे…

Read More

विश्लेषण | अनंत पांगारकर शुक्रवार, दि. १२ एप्रिल  अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात मी आणि माझा पक्ष योग्य हे सांगताना समोरचा उमेदवार आणि त्याचा पक्ष किती वाईट यावर प्रचारातून टीकास्त्र सोडण्याचे काम सुरू आहे. मात्र वास्तवता या दोन्ही मतदारसंघात एकमेकांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आपल्या विरोधातील पक्षावर आणि पक्ष नेतृत्वावर टीका करण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. ज्या पक्षावर आणि पक्ष नेतृत्वावर आपण टीका करतो त्याच घरात काही काळ आपण देखील सत्तेचा उपयोग घेतला, हे या मतदारसंघातील प्रमुख उमेदवार विसरले आहेत. नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सद्यस्थितीतील प्रमुख चारही उमेदवारांना पक्ष बदलाचा दांडगा अनुभव आहे. ज्या पक्षातून आपण आता सत्तेसाठी दुसऱ्या…

Read More

गुरुवार, दि. ११ एप्रिल  माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि कडवट शिवसैनिकांमधील वाद सध्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. त्यातच वाकचौरे यांनी पुन्हा मातोश्रीची दारे ठोठावत शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवारी मिळविण्यात यश मिळविले. मात्र या न्यायालयीन लढ्यामुळे शिवसैनिक वाकचौरे यांच्या प्रचारापासून चार हात दूर होते. संगमनेरमध्ये पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात या संदर्भातील खदखद समोर आल्यानंतर या सर्वांमध्ये मनोमिलन घडविण्यात यश आले आहे. शिवसेनेसोबत गद्दारी करत २०१४ मध्ये काँग्रेस कडून लोकसभेसाठी उमेदवारी करणाऱ्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना तत्कालीन शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, भाऊसाहेब हासे यांच्यासह काही शिवसैनिकांनी त्यांना भर रस्त्यात जाब विचारण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे हा प्रकार पोलीस…

Read More

गुरुवार, दि. ११ एप्रिल  सद्यस्थितीत सुरू असलेली लोकसभा निवडणूक प्रक्रिया, त्या अनुषंगाने लागू असलेली आचारसंहिता, या दरम्यान येणारे विविध सण उत्सव शांततेत पार पडावेत, आचार संहिता उल्लंगणाच्या दृष्टीने कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी संगमनेर उपविभागात असलेल्या संगमनेर-अकोले तालुक्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २३ लोकांना संगमनेर अकोले तालुक्याच्या स्थळ सीमा हद्दीमध्ये प्रवेशास बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. संगमनेर शहर पोलीस ठाणे, संगमनेर तालुका पोलीस ठाणे, आश्वी पोलीस ठाणे, घारगाव पोलीस ठाणे, राजुर पोलीस ठाणे व अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्या व्यक्तींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, त्याचप्रमाणे सामाजिक शांतता भंग करण्यासंबंधाने गुन्हे ज्या…

Read More

बुधवार, दि. १० एप्रिल अहमदनगर जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याच्या वाहनातून ५१ लाख १६ हजाराची रक्कम नाकाबंदी दरम्यान पथकाने ताब्यात घेतली आहे. चौकशीनंतर या रकमे संदर्भात उलगडा होणार आहे. स्टीलचा व्यवसाय असलेल्या नगर जिल्ह्यातील व्यापाऱ्यावर पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये ही कारवाई करण्यात आली. बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान नगर-पुणे मार्गावर शिरूर मध्ये नाकाबंदी सुरू होती. पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे आणि त्यांच्या पथकाने या व्यापाऱ्याचे वाहन नाकाबंदी दरम्यान थांबवत वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पथकाला ५१ लाख १६ हजाराची रोकड आढळून आली. पथकाने वाहनात आढळलेली रोख रक्कम ताब्यात घेत याची माहिती निवडणूक आयोग आणि आयकर विभागाला दिली. त्यानंतर ही सर्व रक्कम आयकर विभागाच्या ताब्यात…

Read More