Author: अनंत पांगारकर

गुरुवार दि. ४ एप्रिल लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची दुसरी यादी जाहीर करण्यात आले यात आणखी दोन उमेदवारांचा समावेश आहे. बीड मधून पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळण्याचे चिन्ह होती. मात्र जाहीर करण्यात आलेल्या यादीत बीडमधून मेटे यांच्या ऐवजी बजरंग सोनवणे यांना तर भिवंडीमधून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बीडमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या ज्योती मेटे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात बीडमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेटे उमेदवार असतील अशी शक्यता होती. मात्र पवार यांच्या भेटीनंतर लगेचच…

Read More

गुरुवार दि. ४ एप्रिल दूधगंगा पतसंस्था अपहार प्रकरणातील आरोपी असलेल्या चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्या पत्नी मुले आणि सुनांचा जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा न्यायालयापाठोपाठ आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबादच्या खंडपीठाने देखील नाकारला आहे. त्यामुळे शकुंतला कुटेसह अन्य आरोपींच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. संगमनेरच्या प्रतिष्ठित दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेतील चेअरमन भाऊसाहेब कुटेसह सतरा आरोपींचा ८१ कोटी रुपयांचा अपहार समोर आला आहे. मुख्य आरोपी असलेल्या भाऊसाहेब कुटेने आपल्या घरातील कुटुंबीयांचा नातेवाईकांच्या मदतीने हा आर्थिक घोटाळा केल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल आहे. मुख्य आरोपी असलेला कुटे आपल्या कुटुंबीयांसह गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून त्याच्यासह कुटुंबातील सदस्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा व…

Read More

गुरूवार दि. ४ एप्रिल भ्रष्टाचारी नेते भाजपच्या वाशिंग मशीनमध्ये स्वच्छ होत असतात. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्या विरोधातील सर्व चौकशा बंद पडतात. भाजप सरकारच्या कार्यकाळात गेल्या दहा वर्षात भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोप करण्यात आलेल्या २५ नेत्यांनी भाजप प्रवेश केला आहे. यातील तिघांना तर पूर्णतः क्लीन चिट मिळाली तर २० जणांच्या चौकशा थांबल्या आहेत. पार्टी विथ डिफरन्स, न खाऊंगा न खाणे दूंगा! या भाजपाच्या भूमिकेचा बुरखा यामुळे फाटला आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ने भाजप प्रवेशानंतर स्वच्छ झालेल्या नेत्यांसंदर्भातील सविस्तर वृत्त दिले आहे. २०१४ मध्ये केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर देशभरातील विरोधी पक्षातील विविध नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अनेक जण तुरुंगात देखील गेले. यातील महत्त्वाच्या ठरणाऱ्या विरोधी…

Read More

मंगळवार दि. २ एप्रिल संगमनेर शहराच्या मध्यवस्तीत असणाऱ्या शिवाजीनगर येथे छापा टाकून अहमदनगर गुन्हे शाखा आणि संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने गांजा आणि गर्द (हेरॉईन) विक्री करणाऱ्या अटक केली आहे. नुकतीच पुणे पोलिसांनी संगमनेरमध्ये येऊन मोठी कारवाई करीत लाखो रुपयांचे बनावट ताडी करण्याचे साहित्य (केमिकल) छापा टाकून पकडले होते. त्यानंतर लगेचच अमली पदार्थांची ही दुसरी कारवाई संगमनेरात झाली आहे. सातत्याने होणाऱ्या या कारवायांमुळे संगमनेर तालुक्यात सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे पितळ उघडे पडले असून नगर जिल्ह्यात अवैध धंद्यांचे प्रमुख केंद्र संगमनेर झाले असल्याचे दिसून येत आहे. अंबादास शांताराम शिंदे, (रा. शिवाजीनगर, ता. संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून…

Read More

मंगळवार दि. २ एप्रिल संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दैनंदिन भाजीपाला लिलावासोबत टोमॅटोचे देखील सोमवारपासून (१ एप्रिल) लिलाव सुरू करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर व सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली आहे. पहिल्याच दिवशी या लिलावास शेतमाल निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. लिलावामुळे व्यापाऱ्यांमध्ये शेतीमाल खरेदी करण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शेतकऱ्याच्या मालाला देखील चांगला भाव मिळत आहे. सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारामध्ये टोमॅटोचे लिलाव सुरू आहेत. प्रतवारी करून आपला शेतमाल विक्रीसाठी आणण्याचे आवाहन केल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. शेतकऱ्यांनी माल विक्री केल्यानंतर बाजार समितीकडून तात्काळ पक्की…

Read More

सोमवार दि. १ एप्रिल निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून महायुती व महाविकास आघाडीसह अन्य पक्षीयांच्यावतीने उमेदवारांची यादी जाहीर जाहीर केली जात असली तरी देखील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील काही जागांचा तिढा अद्यापही काही केल्या संपताना दिसत नाही. महायुतीच ९ तर मविआच १३ जागांवर अडलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ४८ जागांवर उमेदवार देण्याचे प्रक्रिया सर्वच पक्षांकडून सुरू आहे. यासाठी जागा वाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित असला तरी काही जागांवर मात्र अद्यापही उमेदवार निश्चित होत नाहीये. त्यासाठी बैठकांचे सत्र सुरूच असून महायुतीचे अजूनही ९ जागांवरचे उमेदवार ठरलेले नाहीत. तर महाविकास आघाडीचे १३ जागांवरचे उमेदवार निश्चित होताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सोबत युतीची…

Read More

रविवार दि. ३१ मार्च राज्यातील कोणत्याही ठिकाणच्या कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेची किमान किंमत राज्य शासनाद्वारे ठरविली जाते, याला रेडी रेकनर दर म्हणतात. उद्या १ एप्रिल २०२४ पासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात या रेडी रेकनरच्या दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्कात कोणताही बदल होणार नाही. सरकारकडून दरवर्षी त्या-त्या भागातील म्हणजेच औद्योगिक, शेती, रहिवासी भागातील संबंधित बाबीच्या संशोधनावरून राज्य शासन हे दर निश्चित करत असते. गेल्या तीन वर्षात या दरात कोणताही बदल करण्यात न आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाकडून या दरात कोणती वाढ करण्यात न आल्याने सर्वसामान्य माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत…

Read More

रविवार दि. ३१ मार्च नगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी उमेदवारी मिळताच मध्यरात्री संगमनेर गाठीत काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. दीड तासाच्या या भेटीत लंके यांनी थोरात यांच्याशी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून विजयाचा कानमंत्र घेत ते मतदार संघात परतले. राज्यातील महत्त्वाच्या लढतीमध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला गेली आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटातील आमदार निलेश लंके यांना येथून उमेदवारी दिली. त्यासाठी दोनच दिवसांपूर्वी डंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. निलेश…

Read More

रविवार दि. ३१ मार्च विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तनासाठी शिक्षण दिशादर्शक ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शाळा भौतिक व शैक्षणिकदृष्ट्या विकसित व्हायला हव्या, त्याकरिता शाळेला गावाचा आधार आणि गावाला शाळेचा अभिमान वाटला पाहिजे. धांदरफळच्या देशमुख मळा शाळेने उपक्रमशील शिक्षकांच्या उपक्रमांमधून आणि लोकसहभागातून केलेली प्रगती ही शिक्षण क्षेत्रात राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन संगमनेर डाएटचे अधिव्याख्याता अरुण भांगरे यांनी केले. “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या उपक्रमात द्वितीय क्रमांकाद्वारे दोन लाखाचे बक्षीस पटकावणाऱ्या जिल्हा परिषदेच्या देशमुख मळा येथील शाळेत उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना ३२ डिजिटल पाट्या वितरित केल्या, त्याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. डिजिटल पाट्या मिळाल्याने विद्यार्थ्यांचे चेहरे हरखून…

Read More

रविवार दि. ३१ मार्च  ईडी, सीबीआय, आयकर विभागाचा ससेमिरा मागे लागलेल्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला किंवा एनडीएत सहभागी झाले की त्यांच्या मागच्या सगळ्या चौकशा बंद होतात. हे नेते भाजपच्या ‘वाशिंग मशीन’मधून स्वच्छ होऊन निघतात. महाराष्ट्रासह देशभरात भाजपचे हे ‘वाशिंग मशीन’ जोरात सुरू असल्याचे दिसते. एकेकाळी ज्या नेत्यांवर भाजपने कोट्यवधींच्या घोटाळ्याचे आरोप केले आता तेच नेते त्यांच्यासोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसत आहेत. यावरून विरोधी पक्ष सातत्याने भाजपवर हल्ला चढवत आहेत. विरोधकांकडून होणाऱ्या या आरोपांवर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी एका कार्यक्रमात उत्तर दिले. मात्र त्यांच्या उत्तरामुळे पक्षाची गोची झाली आहे. ‘निवडणुकीच्या तोंडावर दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्यात आले. विरोधी पक्षांच्या…

Read More