Author: अनंत पांगारकर
संगमनेर – अहोरात्र काबाडकष्ट करणारी आई, जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा शेतकरी बाप आणि आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे शिक्षक हेच आपल्या जीवनातील आदर्श असावे. त्यांना आदर्शस्थानी ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील ध्येय व स्वप्न साकार करावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते व रोटरी आय केअर ट्रस्टचे विश्वस्त सुनील कडलग यांनी केले. श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात कडलग बोलत होते. स्कूल कमिटीचे चेअरमन शिवाजीराव खुळे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य श्रीकांत माघाडे, अशोकराव दिघे, बाबासाहेब वामन, बबन दिघे, विजय वामन, रंगनाथ खुळे, राम दिघे, चांगदेव वामन, खुळे सर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कडलग यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींना पारितोषिके…
पुणे – भाजपाच्या विचारांच्या विरोधात कोणी भूमिका घेत असेल तर सत्तेचा दुरुपयोग करून कारवाई केली जात आहे. यापूर्वी लोकांना फारसा माहिती नसलेला ईडी हा शब्द आता भाजप सरकारच्या काळात देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. गेल्या काही वर्षात ईडीने ६ हजार गुन्ह्यांची नोंद केली चौकशीअंती यात सत्यावर आधारित केवळ २५ खटले निघाले. त्यापैकी अवघ्या दोघांना शिक्षा झाली. या गुन्ह्यांच्या तपासासाठी ईडीने ४०४ कोटी रुपये खर्च केले. याशिवाय जे आज पक्ष सोडून विकासासाठी भाजपसोबत गेले असे सांगत आहेत, त्यात तथ्य नसून काही नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू होती. ती चौकशी सत्तेत गेल्यानंतर बंद झाली. त्यामुळे विकासासाठी पक्ष सोडला, असं म्हणणं चूक असल्याचं सांगत…
रविवार विशेष | प्रवीण पुरो भारतीय जनता पक्षाला अपेक्षित होतं ते झालं. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या ताब्यात गेली. पवारांसमोरची राजकीय स्पर्धा संपली, असं भाजपच्या नेत्यांना वाटलं असेल. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची त्या पक्षाची आणि पक्षाच्या नेत्यांची तयारी आहे. महाराष्ट्र त्यासाठी सुपिक क्षेत्र. ईडी आणि सीबीआयच्या धाकाने कोणालाही वाकवता येतं हे अमित शहांना ठावूक आहे. त्यात देवेंद्र फडणवीसांसारखा नेता असेल तर ते अधिक जलद घडवता येऊ शकतं, याची खात्री असल्याने अशा काळ्या राजकीय खेळासाठी भाजपने महाराष्ट्राची निवड केली. दिली जबाबदारी फडणवीसांनी यथोचित पार पाडली. शिवसेनेची दोन शकलं झाली. बापाची मालकी गेली. राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले. काकांच्या मालकीचा पक्ष पुतण्याने…
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकारण्यांमध्ये गोळीबाराच्या घटना सर्रास घडू लागल्या आहेत. त्यामुळे राज्यातील घटनाबाह्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केल्यानंतर आता हीच मागणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडूनही करण्यात आली आहे. ठाकरे यांनी मातोश्रीवर पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेद्वारे त्यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. ठाकरे म्हणाले,…
महायुती सरकारने निळवंडे पाणी वाटपाचा प्रस्ताव मार्गी लावला नाही तर आगामी काळात आमचे महाविकास आघाडीचे सरकार मार्गी लावेलच! नगर : आठमाही धरण असलेल्या निळवंडे प्रकल्पाचे पाणीवाटप कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत असला तरी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक प्रस्ताव पाठवला आहे. सरकारने त्याचा अभ्यास करावा व निर्णय घ्यावा, शेवटचा शेतकरी पाण्यापासून वंचित राहू नये, याची काळजी घ्यावी. एका नव्या मॉडेलचा प्रयोग सरकारने यशस्वी करून दाखवावा असे आवाहन त्यांनी केले आहे. सध्याच्या महायुती सरकारने निळवंडे पाणी वाटपाचा प्रस्ताव मार्गी लावला नाही तर आगामी काळात आमचे महाविकास आघाडीचे सरकार मार्गी…
पुणे – ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर शनिवारी पुण्यात हल्ला करण्यात आला होता. तसेच भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन देखील करण्यात आले याप्रकरणी पुणे पोलिसांनी भाजपचे शहाराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह ४३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पत्रकार निखील वागळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, वकील असीम सरोदे यांचा ‘निर्भय बनो’ कार्यक्रम पुण्यातील राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयात शनिवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला जात असताना निखील वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. तसेच त्यांच्या गाडीवर शाईफेक करण्यात आली. निखील वागळे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी निखील…
पुणे : ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला करण्यात आला. ही घटना शनिवारी (९ फेब्रुवारी) सायंकाळी घडली. हल्ला झाल्यानंतर राष्ट्रसेवा दलाच्या कार्यक्रम स्थळी निर्भय बनो सभेत पोहोचलेल्या पत्रकार निखिल वागळे यांनी जोरदार भाषण केले. या भाषणात नेमकं काय म्हणाले वागळे त्याचा हा संपूर्ण भाषणाचा व्हिडिओ ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’च्या वाचकांसाठी देत आहोत… https://youtu.be/cN6tg80_qj4?si=OhOT3pCcCl__j21o पुण्यात निर्भय बनो कार्यक्रमाचे साने गुरुजी हॉलमधे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाआधी पत्रकार निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी पुणे भाजपने गुन्हा दाखल केला होता. तसेच हा कार्यक्रम उधळून लाऊ असाही इशारा दिला होता. मात्र भाजपने कार्यक्रमास विरोध केल्यास आपण या कार्यक्रमास…
संगमनेर – सून आणि नातवासह शाळेचे स्नेहसंमेलन पाहण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मनी मंगळसूत्र धूम स्टाईलने दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना शुक्रवारी समोर आली. यासंदर्भात भारती मधुकर वनम (वय ५८ वर्ष, रा. लवअंकुश कॉलनी, मालदाड रोड, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती वनम शुक्रवारी सायंकाळी शहरातील पोदार इंग्लिश मीडियम येथे शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी गेल्या असताना शाळेच्या जवळील कॉर्नरला भरधाव वेगात आलेल्या अज्ञात दोघा दुचाकीस्वारानी त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावत तेथून पोबारा केला. पोलीस पुढील तपास करत आहे.
संगमनेर – अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपदी जयंत रामनाथ वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते वाघ यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. वाघ यांना शुभेच्छा देताना थोरात म्हणाले, ‘काळ संघर्षाचा आहे मात्र भविष्य काँग्रेस पक्षाचे आहे, त्यामुळे झोकून देऊन काम करा. आपण जिल्ह्यात काँग्रेस बळकटीने उभी करू.‘ काँग्रेसच्या अध्यक्षपदी वाघ यांच्या नियुक्तीचा आदेश प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या सहीने निर्गमित करण्यात आला. वाघ हे नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे विश्वस्त आहेत. यशवंतराव चव्हाण व्यासपीठचे उपाध्यक्ष, कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष असून विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांवर ते सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहेत.…
नवी दिल्ली – देशाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या माजी पंतप्रधान नरसिंहराव व चौधरी चरण सिंह यांच्यासह कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या वैज्ञानिक एम. एस. स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची मोठी घोषणा आज शुक्रवारी ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) केली आहे. ‘एक्स’वर पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या विषयी म्हटले आहे की, आमच्या सरकारला देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचे सौभाग्य मिळाल आहे. चौधरी चरणसिंह यांनी शेतकऱ्यांच्या अधिकारासाठी आणि कल्याणासाठी काम केलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री ते पंतप्रधान म्हणून त्यांनी काम केलं. आणीबाणीचा देखील त्यांनी विरोध केल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं…
