Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, नाशिक: उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या शेजाऱ्यांवर काळाने घाला घातल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना कश्यपी धरणावर घडली आहे. या भीषण दुर्घटनेत एकाच परिसरातील चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, यामुळे संपूर्ण परिसरात आणि मूळ गावी तीव्र शोककळा पसरली आहे. दरम्यान, एका धाडसी महिलेच्या सतर्कतेमुळे दोन वर्षांची चिमुरडी सुदैवाने बचावली असली, तरी तिच्या डोक्यावरचे आई-वडिलांचे छत्र कायमचे हरवले आहे. मूळचे संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील रहिवासी असलेले सचिन कैलास ठोंबरे हे सध्या नाशिकच्या मखमलाबाद भागात वास्तव्यास होते. सुटी साजरी करण्यासाठी सचिन ठोंबरे, त्यांची पत्नी रोहिणी, दोन वर्षांची मुलगी आणि त्यांच्या शेजारी राहणारी दोन मुले…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील, ज्या तुम्ही आत्मविश्वासाने पूर्ण कराल. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेताना घाईगडबड करू नका. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील आणि संध्याकाळी त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवता येईल. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवय कडे लक्ष द्या. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची खंबीर साथ मिळणार आहे. बऱ्याच दिवसांपासून रेंगाळलेली कामे आज पूर्ण झाल्याने मनाला मोठी शांतता लाभेल. व्यवसायात धनलाभाचे उत्तम योग जुळून येत आहेत. घरामध्ये एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन होऊ शकते, ज्यामुळे कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढेल. जुन्या मित्रांची भेट…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख हे सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या विकासाला प्राधान्य देणारे अत्यंत लोकप्रिय व कर्तबगार नेते होते, असे गौरवउद्गार जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले. स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर येथील ‘यशोधन’ जनसंपर्क कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना डॉ. सुधीर तांबे यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख आणि माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यातील दृढ संबंधांना उजाळा दिला. विलासरावजींचे बाळासाहेब थोरात यांच्यावर भावासारखे प्रेम होते. त्यांनी मुख्यमंत्री असताना थोरात यांच्याकडे लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली होती. या दोन्ही नेत्यांची जनमानसाप्रती असलेली तळमळ आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील राष्ट्रपती भवनात ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान संपूर्ण संगमनेर तालुक्यासाठी आणि महाराष्ट्रातील तमाशा रसिकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य तमाशा फड मालक संघटनेचे अध्यक्ष आणि संगमनेरचे सुपुत्र असलेल्या रघुवीर खेडकर यांनी आपल्या असामान्य कलागुणांच्या जोरावर पारंपरिक लोककलेचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर फडकवला. अनेक वर्षांच्या संघर्षानंतरही त्यांच्या कार्याची योग्य दखल घेतली जात नसल्याची त्यांची भावना होती. मात्र, संगमनेरमधील राजकीय परिवर्तनानंतर आमदार अमोल खताळ यांनी शासन स्तरावर यासाठी विशेष पाठपुरावा केला. कांताबाई सातारकर पुरस्कार सोहळ्यादरम्यान संगमनेर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, नाशिक/चांदवड: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ‘महाविकास आघाडी’च्या वतीने चांदवड येथे सुरू असलेल्या आंदोलनाला आता डावे पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभेने सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासन आणि शासनाकडून आंदोलकांवर करण्यात आलेल्या बळाच्या वापराचा किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. आतापर्यंत हे आंदोलन केवळ महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली सुरू होते. मात्र, आंदोलकांची गळचेपी करण्यासाठी शासनाने ज्या प्रकारे बळाचा वापर केला आहे, ते पाहता आता डावे पक्ष आणि शेतकरी संघटना या आंदोलनात पूर्ण ताकदीने उतरल्या आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि इतर डाव्या आघाडीच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने’ला प्रशासकीय अनास्थेचे ग्रहण लागले आहे. ऑनलाइन पारदर्शकतेचा दावा केला जात असला तरी, गेल्या वर्षभरात जिल्ह्यात तब्बल १३४ मदत प्रकरणे प्रलंबित राहिली असून, अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबे २ कोटी ६५ लाख रुपयांच्या हक्काच्या अनुदानापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या सलग दोन वर्षांत एकही प्रस्ताव प्रलंबित नसताना, यंदा मात्र निधीअभावी लाभार्थींना ताटकळत राहावे लागत आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, सन २०२५-२६ या चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातून एकूण ३९० प्रस्ताव दाखल झाले होते. यामध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: गेल्या एका वर्षात म्हणजेच १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत जिल्हा बाल संरक्षण कक्षाला अहिल्या नगर जिल्ह्यात तब्बल ५५ बालविवाह रोखण्यात मोठे यश आले आहे. या कारवाईदरम्यान बालविवाहाचे उल्लंघन करणाऱ्या १५ कुटुंबांविरोधात एफआयआर (गुन्हे) दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम यांनी दिली आहे. जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंध कायद्याची अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात असून, महिला व बाल विकास विभागाच्या वतीने “बालविवाह मुक्त भारत” अभियान मोठ्या जोमाने राबविले जात आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत समाजात व्यापक जनजागृती निर्माण करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. तुमच्या मातोश्रींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाल्यामुळे मनातील चिंता दूर होईल. आर्थिक बाबींमध्ये आजचा दिवस लाभदायक ठरेल आणि अचानक धनलाभाचे योग येतील. जुन्या मित्रांशी किंवा ओळखीच्या व्यक्तींशी अनपेक्षित भेट झाल्यामुळे मन आनंदी होईल. आज तुम्ही तुमच्या कामाचे योग्य नियोजन केल्यास तुम्हाला कामात हमखास यश मिळेल. वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि उत्साहाचा असेल. एखादी चांगली किंवा गोड बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाचे योग्य नियोजन करूनही मनात थोडी धाकधूक किंवा चिंता राहील, पण तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. उत्पन्नाचे मार्ग मोकळे होतील, परंतु त्यासोबतच खर्चाचे प्रमाणही वाढू शकते. महत्त्वाचे निर्णय घेताना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: अहिल्यानगर जिल्हा हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. पक्षाने अनेकांना मंत्रिपदे आणि विरोधी पक्षनेते पदे देऊन मोठे केले, मात्र त्यांनीच कठीण काळात पक्षांतर करून सत्ताधारी पक्षाचा रस्ता धरला. संगमनेरचे नवीन लोकप्रतिनिधी स्वतः चार पक्ष बदलून आलेले आहेत, त्यामुळे त्यांनी पक्षनिष्ठेवर बोलण्यापूर्वी स्वतः कोणत्या पक्षात आहेत हे जाहीर करावे. आपली राजकीय उंची किती आणि आपण कोणावर बोलतोय याचे भान त्यांनी ठेवावे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकताच संगमनेर दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या एकनिष्ठेचे आणि नेतृत्वाचे कौतुक केले होते. या पार्श्वभूमीवर तालुकाध्यक्ष…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर तालुका महसूल स्थळ सीमा हद्दीत तब्बल १९ जणांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, या संदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी श्रीरामपूर विभागाचे विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. हा प्रवेशबंदीचा आदेश शनिवारपासूनच (दिनांक २३ मे) लागू झाला असून, तो दिनांक २९ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत कार्यान्वित राहणार आहे. या कालावधीत संबंधित व्यक्तींना संगमनेर तालुक्याच्या हद्दीत प्रवेश करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात…
