Author: अनंत पांगारकर
दि. १३ मार्च, नवी दिल्ली २०२४ च्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ७२ उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी जाहीर केली. या यादीत राज्यातील २० उमेदवारांचा समावेश असून बहुतांश उमेदवारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूर मधून उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्यासह पंकजा मुंडे बीडच्या उमेदवार असतील. तर अहमदनगर दक्षिण मधून उमेदवार बदलाची चर्चा सुरू असतानाच भाजपाने विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. भाजप उमेदवारांच्या यादीत डॉ. हिना विजयकुमार गावित (नंदुरबार), डॉ. सुभाष भामरे (धुळे), श्रीमती स्मिता वाघ (जळगाव), रक्षा खडसे (रावेर), अनुप धोत्रे (अकोला), रामदास तडस (वर्धा), सुधीर मुनगंटीवार…
दि. १३ मार्च, संगमनेर संगमनेरच्या शांततेला गालबोट लावणारे जोर्वेनाका येथील प्रकरण न्यायप्रविष्ट होत नाही तोच आता पुन्हा एकदा कोल्हेवाडी-दिल्ली नाका रस्त्यावर जमावाकडून चिमुकल्या लेकींसमोर पित्यासह तिघांना मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शहरातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात दंगल नियंत्रक पथकाची कुमक देखील मागविण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर रात्री उशिरा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांचा मोठा जमाव जमला होता. घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत असून दरम्यान या प्रकरणी शहर पोलिसांनी काय कारवाई केली याबाबत दुपारपर्यंत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. राहुल सोपान गुंजाळ (वय ३८ वर्ष, रा. कोल्हेवाडी, ता.…
दि. १२ मार्च, नवी दिल्ली २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने ४३ उमेदवारांची आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नसून तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. आसाम मध्य प्रदेश आणि राजस्थान मधील उमेदवारांचा या यादीत समावेश आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणूक समितीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथून सध्याचे खासदार नकुलनाथ यांना काँग्रेसने पुन्हा तिकीट दिले आहे. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत, २००१-२०१६ पर्यंत आसामचे मुख्यमंत्री राहिलेले तरूण गोगई यांचे सुपुत्र गौरव गोगोई यांनाही काँग्रेसने आपल्या दुसऱ्या यादीत स्थान…
दि. १२ मार्च, संगमनेर शहरालगत असलेल्या लक्ष्मी नगरमध्ये मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास जमावाने दोन जणांना शस्त्रांसह बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी जखमीच्या जबाबावरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. जमावाच्या मारहाणीत हुसेन बाबामियां शेख (रा. मालदाड रोड, तिरंगा चौक, संगमनेर) हा गंभीर जखमी झाला आहे. या संदर्भात मिळाली माहिती अशी, मित्राला होत असलेली मारहाण पाहून त्याला वाचवण्यासाठी हुसेन शेख मदतीला गेला आणि भांडणांमध्ये मध्यस्थी करू लागल्याने जमलेल्या तरुणांच्या जमावाने त्यालाही मारण्यास सुरुवात केली. तसेच या बेदम मारहाणीत त्याच्यावर कोयत्याने वार करीत…
दि. १२ मार्च, संगमनेर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ३ कोटी १५ लाख ८ हजार १०० रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ यांनी दिली. सरकारच्या माध्यमातून सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वर्गासाठी विविध योजना राबविल्या जातात. यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना अशा योजनांचा समावेश आहे. जानेवारी व फेब्रुवारी २०२४ चे संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत सर्वसाधारण ५२४८ लाभार्थ्याना १ कोटी ५५…
दि. ११ मार्च, मुंबई नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक घटना व तत्सम बाबींची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे. या समितीने तीन महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या विरोधात केलेल्या विधानांचे पडसाद उमटले होते. भाजपाचे आमदार आशीष शेलार यांनी विधानसभेत अंतरवली सराटी प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य केली होती. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या हिंसक घटनांची चौकशी…
दि. ११ मार्च, मुंबई खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. दुपारी दोन वाजता यात्रा नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्यानंतर १३ मार्चला धुळे, मालेगाव, १४ मार्चला नाशिक, १५ मार्चला पालघर, ठाणे असा प्रवास करत ही यात्रा १६ मार्चला मुंबईत दाखल होणार आहे. १७ मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप शिवाजी पार्कवर होत असून याचवेळी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात १५ जानेवारीला मणिपूरमधून करण्यात आली असून यात्रेची सांगता मुंबईत होत आहे. ही यात्रा १५ राज्ये, १०० जिल्हे, ११० लोकसभा मतदारसंघातून ६७ दिवसांत ६७०० किमीचा प्रवास करत आहे.…
दि. ११ मार्च, संगमनेर राज्यभर निर्भय बनो आंदोलनाच्यावतीने सभांचा धडाका सुरू आहे. या सभांना मोठा प्रतिसाद मिळत असून संगमनेर मध्ये बुधवारी १३ मार्चला या सभेचे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी या सभेला मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. जनतेला निर्भयपणे आपले म्हणणे मांडता यावे यासाठी वातावरण निर्मिती करणे, हा या सभेचा मुख्य उद्देश आहे. निर्भय बनो अंतर्गत सुरू असलेल्या ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, वकील असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्या सभांना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अकोले बायपास रस्त्यावरील स्वयंवर मंगल कार्यालयात बुधवारी (१३ मार्च) दुपारी तीन वाजता निर्भय संगमनेरकर आयोजित प्रबोधन सभा…
भोजापूर पूरचारीच्या २ कोटी १२ लाख रुपयांच्या निधीतून सोळा किलोमीटर लांबीच्या दुरुस्ती कामाचे भूमिपूजन ७७ कोटी रुपयांचा निधी मिळवला, मात्र सत्ता बदल होताच नव्या सरकारने या निधीला स्टे लावला दि. १० मार्च, संगमनेर तळेगाव भागातील दुष्काळी गावांना पाणी मिळावे, या हेतूने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून भोजापूर पूरचारी करण्यात आली. दरवर्षी कारखाना या चारीची दुरुस्ती करत असतो. यामुळे परिसरातील गावांना पाणी मिळते. मात्र या चारीच्या कामात ज्या लोकांचे योगदान नाही, ज्यांचा हेतू चांगला नाही, असे लोक या परिसरात येऊन आपसात मनभेद निर्माण करत आहे. अशा प्रकारच्या लोकांना थारा देऊ नका, असे स्पष्ट करत नव्याने सोनेवाडी ते तिगाव…
जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसा प्रचारातील रंग वाढत जाणार. प्रचार म्हटला की नेत्यांच्या तोंडाला आवर घालणं अवघड. त्यात भारतीय निवडणूक आयोग सत्ताधारी भाजपला विकला गेल्याने सत्ताधार्यांवर त्याचा काहीही अंकुश नाही. यामुळे भाजपसाठी वक्र प्रचाराची संधीच संधी आहे. वायफळ टीका टिपण्णी करणार्या सत्ताधारी भाजप नेत्यांना हात न लावणारा हा आयोग विरोधकांसाठी मात्र गले की हड्डी बनला आहे. आयोगाच्या आंधळेपणामुळे निवडणूक जाहीर होण्याआधीच भाजपच्या नेत्यांनी ओकार्या करायला सुरुवात केली आहे. अबकी बार ४०० पारचा नारा लावणार्या भाजपसाठी महाराष्ट्रातली परिस्थिती अनुकूल नाही. मतांची आणि उमेदवारांची विस्कटलेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी राज्याच्या दौर्यावर आलेले अमित शहा हे भाजपचे तारणहार, देशाचे गृहमंत्री. विरोधी पक्षांना अडकवण्यासाठीच्या सर्वोत्तम…
