Author: अनंत पांगारकर

असंख्य अटी घातल्या, ज्यांच्याबरोबर आघाडी करायची त्यांना शहाणपणा शिकवला, त्यांच्यावर टीका-टिपण्ण्या केल्या, दुषणांची बरसात केली आणि अखेर आघाडीला दूर करत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली मूळ भूमिका पुन्हा वठवली. आंबेडकर हे भाजपचे प्यादे आहेत, असा जो आरोप व्हायचा त्याला पुरक अशी भूमिका घेत भाजप विरोधकांची मतं फोडण्याचं पाप आंबेडकर हे करत आहेत. भाजप विरोधात आघाडी करायची म्हणून ज्या आघाडीला आंबेडकरांनी झुलवत ठेवलं. त्याच आघाडीतून बाहेर पडत आंबेडकर यांनी सार्‍या महाराष्ट्राचं दुषण घेतलं आहे. आघाडीची शक्यता वर्तवायची आणि हव्या तशा अटी टाकायचा हा खेळ आंबेडकरांनाच जमू शकतो, हे पुन्हा एकदा सिध्द झालं. देशात निर्माण झालेल्या विचित्र राजकीय परिस्थितीपासून महाराष्ट्राला वाचवण्याची…

Read More

शनिवार दि. ३० मार्च राज्यातील १८ लोकांना निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. त्यामुळे या १८ जणांना राज्यात कोठेही लोकसभेची निवडणूक लढवता येणार नाही. देशात लोकसभा निवडणुकीचे वारं वाहत असताना आयोगाने निवडणुकीतील खर्चाचे तपशील सादर न केल्यामुळे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविलेल्या लोकांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे या लोकांना लोकसभा निवडणूक लढविता येणार नाही. अपात्र ठरवण्यात आलेल्या उमेदवारांची यादी… मोहम्मद मेहमूद सय्यद शाह : मुंबई उत्तर- मध्य विधानसभा मतदारसंघ  गायकवाड दिनकर धारोजी : जिंतूर विधानसभा मतदारसंघ परभणी  अमर शालिकराम पांढरे : आमगाव विधानसभा मतदारसंघ गोंदिया उमेशकुमार मुलचंद सरोटे : आमगाव विधानसभा मतदारसंघ गोंदिया दीपक चंद्रभान गाडे : अंबरनाथ…

Read More

शनिवार दि.३० मार्च शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीने आजी-माजी खासदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे या आजी-माजी खासदारात लढत निश्चित झाले असतानाच आता वंचितच्या रूपाने तिसरा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्य व काँग्रेस नेत्या उत्कर्षा रूपवते यांनी मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतल्याने त्यांच्या उमेदवारीच्या चर्चा मतदारसंघात सुरू झाल्या आहे. २०२४ च्या निवडणुकीत बौद्ध उमेदवार हवा असा मतप्रवाह गेल्या काही दिवसापासून सुरू होता. त्यादृष्टीने रूपवते यांनी या मतदारसंघात भेटीगाठी घेत मोर्चेबांधणी करण्याचा प्रयत्न देखील केला. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे मातब्बर नेते माजी मंत्री आमदार…

Read More

शनिवार दि. ३० मार्च राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने शनिवारी लोकसभेसाठीची आपली पहिली यादी जाहीर केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या नगर दक्षिणमधून शुक्रवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेल्या निलेश लंके या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शिलेदाराला शरद पवारांनी संधी दिली आहे. राज्यातील महत्त्वपूर्ण लढतीमध्ये या नगर दक्षिणच्या लढतीचा समावेश आहे. पहिल्याच यादीत लंके यांचे नाव जाहीर झाल्याने नगरचा सामना देखील आता ठरला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभेसाठीची पहिली यादी जाहीर केली. अहमदनगरमधून निलेश लंके, बारामतीतून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, शिरूरमधून खासदार डॉ. अमोल कोल्हे, वर्ध्यातून अमर काळे तर दिंडोरीतून भास्कर भगरे…

Read More

शुक्रवार दि. २९ मार्च पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. कार्यकर्त्यांसमोर भूमिका स्पष्ट करताना लंके यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले यावेळी ते भावुक झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आमदार निलेश लंके नगर दक्षिणमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र सत्तेत सहभागी असलेल्या पवारांच्या गटाला हे जागा मिळाली नाही. भाजपने विद्यमान आमदार डॉ. सुजय विखे पाटील यांना या जागेवर संधी दिली. त्यामुळे लंके यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांची बैठक घेत या बैठकीत सविस्तर भूमिका स्पष्ट केली. दिल्लीत लोकसभेत शेतकऱ्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आपण जायला हवं. त्यामुळे मी आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतोय. मी माझा राजीनामा विधानसभा…

Read More

शुक्रवार दि. २८ मार्च, संगमनेर तिथीनुसार पारंपारिक शिवजयंती उत्सव मोठा जल्लोषात संगमनेरकर साजरा करत असतात. शिवजयंती उत्सव समिती, शहर शिवसेना प्रणित बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळ, रंगारगल्ली शिवसेना शाखेसह शहर व उपनगरात मोठा उत्साहात दिवसभर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी संगमनेरमध्ये घडलेल्या तणावपूर्ण घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या मदतीने शिस्तीचे पालन करत शिवजयंती उत्सव साजरा केल्याबद्दल शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी सर्वांचे आभार मानले आहे. प्रशासनाने अत्यंत काटेकोरपणे केलेले नियोजन आणि संवेदनशील असलेले वातावरण पाहता शिवजयंती उत्सव समितीच्या बाईक रॅलीस आणि अमर कतारी संस्थापक अध्यक्ष असलेल्या हिंदूहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळाच्या पारंपरिक मिरवणुकीला अधिकृतपणे पोलीस प्रशासनाने परवानगी दिली होती. परवानगी…

Read More

शुक्रवार दि. २९ मार्च, संगमनेर गुटक्याच्या अनुषंगाने प्रकाशित झालेल्या बातम्यांवर समाज माध्यमातून कमेंट करणाऱ्या शिवसेनेच्या दीपक साळुंखे यांना बंदी असलेल्या गुटख्याची सर्रासपणे शहरात विक्री करणाऱ्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला. या संदर्भात विजय भागवत याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक दैनिकात गुटखा तस्करांकडून संगमनेरात राजरोसपणे गुटख्याची विक्री केली जाते. बंदी असलेला गुटखा संगमनेरात कोणत्याही पानटपरीवर सर्रासपणे मिळतो. पोलीस देखील अशा किरकोळ विक्रेत्यांवर वारंवार कारवाई करतात मात्र या सर्व प्रकारांमधील प्रमुख गुटका किंग असलेले विक्रेते पोलिसांना सापडत नाही किंवा जाणीवपूर्वक त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. या गुटक्यावर नियंत्रण ठेवणारे अन्न औषध प्रशासन नावाचे खाते…

Read More

गुरुवार दि. २८ मार्च, मुंबई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपल्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आठ जागांपैकी रामटेकचा अपवाद वगळता उर्वरित सातही ठिकाणी विद्यमान खासदारांना संधी देण्यात आली असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डीत आता ठाकरेंच्या शिवसेनेचे वाकचौरे व शिंदे यांच्या शिवसेनेचे लोखंडे यांच्यात लढत स्पष्ट झाली आहे. शिर्डीत आजी-माजी खासदारांमध्ये लढत होणार असली तरी मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने या मतदारसंघातून इच्छुक असलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची संधी हुकली आहे. त्यांचे समर्थक व काँग्रेसकडून इच्छुक…

Read More

गुरुवार दि. २८ मार्च न्यूमोनिया झालेल्या दोन रुग्णांना चुकीच्या रक्तगटाचे रक्त चढविणाऱ्या दोन परिचारिकांचे निलंबन करण्यात आले आहे. पुण्याच्या औंध रुग्णालयात कार्यरत असलेल्या प्रिती ठोकळ आणि शांता मकलूर अशी तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या दोन्ही परिचारिकांची नावे आहेत. दत्तू सोनाजी सोनवणे आणि दगडू कांबळे यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणी अगदी त्यांना न्यूमोनीया असल्याचे आढळून आले. त्यांच्या हिमोग्लोबिनची पातळी सामान्य पातळीपेक्षा कमी असल्याने, दोघांनाही त्वरित रक्तसंक्रमण आवश्यक असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण खलाटे यांनी काढला होता. त्यानंतर त्यांनी नर्सिंग स्टाफला दोन्ही रुग्णांना रक्त देण्याचे निर्देश दिले. संबंधित परिचारिकांनी निष्काळजीपणा करत दत्तू सोनवणे…

Read More

गुरुवार दि. २८ मार्च देशातील ६०० वकिलांनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहीत धक्कादायक गोष्ट समोर आणली आहे. काही विशिष्ट लोकांचा समूह न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा, न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा आणि विचित्र तर्क आणि राजकीय अजेंड्याच्या आधारावर न्यायालयांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करत त्यांनी चिंता व्यक्त केली. वकिलांनी असा आरोप केल्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहिणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे, पिंकी आनंद, हितेश जैन, मनन कुमार मिश्रा, आदिश अग्रवाल, चेतन मित्तल, उज्वला पवार, उदय होल्ला आणि स्वरुपमा चतुर्वैदी आदींचा समावेश आहे. काय म्हटले आहे पत्रात… विशेष करून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर…

Read More