Author: अनंत पांगारकर
दि. १६ मार्च, मुंबई लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यासाठी काही तासांचा कालावधी असताना राज्य सरकारने शनिवारी निर्णयांचा धडाका लावत १७ महत्वपूर्ण निर्णय घेतले. प्रशासकीय निर्णयाबरोबर आदेश काढण्याचा धडाका सुरू आहे. शुक्रवारी तब्बल २०५ शासन निर्णयाची घोषणा राज्य शासनाच्या संकेतस्थळावर करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या बैठकीत झालेले निर्णय पुढीलप्रमाणे… राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीसाठी शुल्क माफी (उद्योग विभाग). तात्पुरत्या स्वरूपातील ६४ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार (वैद्यकीय शिक्षण विभाग) मालमत्ता विद्रुपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास, दंड सुद्धा वाढविला (गृह विभाग) १३८ जलद गती न्यायालयाच्या वाढीव खर्चाला मान्यता (विधी व न्याय विभाग) संस्कृत, तेलगू, बंगाली…
दि. १६ मार्च, पुणे – संगमनेर पतीच्या १ कोटीच्या टर्म इन्शुरन्ससाठी पत्नीने तिच्या सैन्य दलातील प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह तिघांना अटक केली असून अटकेत संगमनेरमधील आरोपींचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चिंबळी येथे ही दुर्दैवी घटना घडली. राहुल सुदाम गाडेकर असं हत्या झालेल्या ३६ वर्षीय तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने पत्नी सुप्रिया राहुल गाडेकर, भारतीय सैन्य दलातील तिचा प्रियकर सुरेश मोटाभाऊ पाटोळे तसेच त्याचा सहकारी रोहिदास नामदेव सोनवणे अशा तीन जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत राहुल गाडेकर याची पत्नी…
हिंदुस्थानच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधान मोदींचा हात सीबीआय, ईडी, आयकर विभागाकडून दबाव टाकून कार्पोरेट्सकडून वसुली भिवंडी, दि. १५ मार्च पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय अर्थकारण साफ करण्याची भाषा करून इलेक्टोरल बाँड पद्धत आणली पण या बाँडची खरी बाजू आज देशाला समजली आहे. इलोक्टोरोल बाँड हे जगातील सर्वात मोठे हप्ता वसुली रॅकेट आहे. सीबीआय, ईडी, आयकर विभागाला यासाठी गुंतवून वसुली केली आहे. हिंदुस्थानच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधान मोदींचा हात आहे, असा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान संध्याकाळी भिवंडी येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना गांधी यांनी या घोटाळ्यावरून भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र…
दि. १६ मार्च संगमनेर विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी कट्टा आणि काडतुसे कब्जात बाळगणाऱ्या संशयित आरोपीला घारगाव पोलिसांनी अटक केली आहे. अशोक दगडू खेमनर (वय २५ वर्ष, रा. हिरेवाडी, साकुर, ता. संगमनेर) असे पोलिसांनी अटक केलेले आरोपीचे नाव आहे. खेमनर हा आपल्या कब्जात विनापरवाना गावठी कट्टा बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घारगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने मांडवे बुद्रुक गावच्या शिवारात असलेल्या अनिल शांताराम कढणे यांच्या शेतातील विहिरीजवळ असलेल्या कोपीमध्ये छापा टाकला. यावेळी पोलिसांना संशयित आरोपी अशोक दगडू खेमनर याने विनापरवाना स्वतःच्या कब्ज्यात गावठी कट्टा आणि पाच जिवंत काडतुसे बाळगले असल्याचे आढळून आले. पोलिसांनी खेमनर याला अटक केली असून त्याच्या विरोधात घारगाव…
दि. १४ मार्च, संगमनेर राज्य शासनाच्यावतीने राबविल्या जात असलेल्या यशवंत पंचायत राज विकास अभियानात संगमनेर पंचायत समितीने बाजी मारली असून तिसऱ्या क्रमांकाचा सहा लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला आहे. याशिवाय पंचायत समितीचे सहाय्यक लेखाधिकारी प्रदीप वर्पे यांनाही गुणवंत अधिकारी पुरस्कार देण्यात आला. महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर यावेळी उपस्थित होते. संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. योजनांची अंमलबजावणी करून राज्याच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे. शाश्वत विकासाचे ध्येय समोर ठेवून पंचायत राज्य संस्थेच्या कामगिरीनुसार त्यांना प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता राज्यात…
दि. १४ मार्च, संगमनेर शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी केली जाते. यासाठी दरवर्षी शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून निवडल्या जाणाऱ्या कार्यकारी यांच्या अध्यक्षपदी सागर बागे याची तर उपाध्यक्षपदी सौरभ उमरजी यांचे निवड करण्यात आली आहे. ग्रामदैवत असलेल्या चंद्रशेखर चौकातील मारुती मंदिरात उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी केलेल्या प्रास्ताविकानंतर कार्यकारिणीची निवड सर्वांनुमते करण्यात आली. यावर्षी उत्सव समितीच्या माध्यमातून साजरा केला जाणारा कार्यक्रमांची माहिती पत्रकार मंगेश सालपे यांनी दिली. उत्सव समितीची कार्यकारणी पुढील प्रमाणे… सागर बागे (अध्यक्ष), सौरभ उमरजी (कार्याध्यक्ष), मयूर जाधव व सागर पगारे (उपाध्यक्ष), किरण…
दि. १४ मार्च, संगमनेर सहकाराच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरीब माणसांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आदर्श तत्व आणि विचार घेऊन सहकार चळवळीत मोठे योगदान दिले. तालुक्याच्या विकासाची रचनात्मक पायाभरणी करताना त्यांनी समाज विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले असून त्यांचे जीवन कार्य पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या अध्यक्ष कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे अमृत उद्योग समूहाच्यावतीने आयोजित १४ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, लक्ष्मणराव कुटे, सुधाकर जोशी,…
दि. १३ मार्च, नवी दिल्ली २०२४ च्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ७२ उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी जाहीर केली. या यादीत राज्यातील २० उमेदवारांचा समावेश असून बहुतांश उमेदवारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूर मधून उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्यासह पंकजा मुंडे बीडच्या उमेदवार असतील. तर अहमदनगर दक्षिण मधून उमेदवार बदलाची चर्चा सुरू असतानाच भाजपाने विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. भाजप उमेदवारांच्या यादीत डॉ. हिना विजयकुमार गावित (नंदुरबार), डॉ. सुभाष भामरे (धुळे), श्रीमती स्मिता वाघ (जळगाव), रक्षा खडसे (रावेर), अनुप धोत्रे (अकोला), रामदास तडस (वर्धा), सुधीर मुनगंटीवार…
दि. १३ मार्च, संगमनेर संगमनेरच्या शांततेला गालबोट लावणारे जोर्वेनाका येथील प्रकरण न्यायप्रविष्ट होत नाही तोच आता पुन्हा एकदा कोल्हेवाडी-दिल्ली नाका रस्त्यावर जमावाकडून चिमुकल्या लेकींसमोर पित्यासह तिघांना मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे शहरातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात दंगल नियंत्रक पथकाची कुमक देखील मागविण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर रात्री उशिरा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांचा मोठा जमाव जमला होता. घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत असून दरम्यान या प्रकरणी शहर पोलिसांनी काय कारवाई केली याबाबत दुपारपर्यंत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. राहुल सोपान गुंजाळ (वय ३८ वर्ष, रा. कोल्हेवाडी, ता.…
दि. १२ मार्च, नवी दिल्ली २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने ४३ उमेदवारांची आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नसून तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. आसाम मध्य प्रदेश आणि राजस्थान मधील उमेदवारांचा या यादीत समावेश आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणूक समितीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा येथून सध्याचे खासदार नकुलनाथ यांना काँग्रेसने पुन्हा तिकीट दिले आहे. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत, २००१-२०१६ पर्यंत आसामचे मुख्यमंत्री राहिलेले तरूण गोगई यांचे सुपुत्र गौरव गोगोई यांनाही काँग्रेसने आपल्या दुसऱ्या यादीत स्थान…
