Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या नाट्य जागर उपक्रमांतर्गत झालेल्या जिल्हा नाट्यछटा स्पर्धेत संगमनेरच्या स्पर्धकांनी बाजी मारली. स्पर्धा गाजविणाऱ्या चारही स्पर्धकांची उपांत्य फेरीसाठी निवड झाल्याची माहिती देण्यात आली. अहमदनगर केंद्राच्या स्पर्धा संगमनेरमधील दिगंबर गणेश सराफ महाविद्यालयात पार पडल्या. या स्पर्धेत श्रुती प्रमोद मैड हिने प्रथम, नमिता मंगेश सांगळे हिने द्वितीय, राजसी प्रसाद भणगे हिने तृतीय तर प्रज्ञा सनातन तायडे हिने चतुर्थ क्रमांक मिळविला. या स्पर्धकांची उपांत्य फेरीसाठी निवड झाली. याशिवाय सर्वज्ञा अविनाश कराळे, मनस्वी प्रकाश लगड, पुष्कर पंडित दशरथ, ईशीता ऊगले व दीशिता नेहुलकर यांनी देखील गुणवत्ता प्रमाणपत्र मिळविली.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पहिल्याच दिवशी तब्बल पन्नास हजारावर नागरिकांची उपस्थिती आणि नागरिकांच्या गर्दीने फुललेल्या जाणता राजा मैदानावर संभाजी महाराजांचा ज्वलंत इतिहासाचा अविस्मरणीय थरार “शिवपुत्र संभाजी” महानाट्याच्या रूपाने रविवारी संध्याकाळी संगमनेरकरांना अनुभवण्यास मिळाला. निमित्त होते लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचे. बुधवारी ७ फेब्रुवारीला थोरात यांचा वाढदिवस. या निमित्ताने ४ ते ७ फेब्रुवारी या चार दिवसां दरम्यान जाणता राजा मैदानावर खासदार अमोल कोल्हे यांचे प्रमुख भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी अपेक्षा अधिक गर्दी झाल्याने अनेकांनी तब्बल चार तासाहून अधिक वेळ उभे राहून महानाट्याचा थरार अनुभवला तर मैदानावर जागाच शिल्लक नसल्याने अनेक नागरिकांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ॲड. श्रेयस देशमुख (LL.M) आर्थिक गुन्ह्यांमुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेच्या स्थिरतेला आणि अखंडतेला मोठा धोका निर्माण होतो, त्यासाठी मजबूत कायदेशीर चौकट आणि प्रतिबंधात्मक उपायांची आवश्यकता असते. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), भारतीय दंड संहिता (आयपीसी), सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कायदा, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) आणि महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स कायदा (MPID), बेनामी व्यवहार (Prohibition), परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) यासारख्या अनेक कायदे यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात या सर्व कायद्यांचा मूळ उद्देश आर्थिक गुन्ह्यांना संबोधित करणे आणि प्रतिबंध करणे असा आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) हा मनी लाँडरिंग आणि संबंधित गुन्ह्यांच्या विरोधात…
महाराष्ट्र संवाद न्यूज अनंत पांगारकर @ ७५८८६००९५० दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवीदारांच्या ठेवींचा गैरवापर करत तब्बल ८१ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा करणाऱ्या भाऊसाहेब कुटेचा नवा कारनामा समोर आला आहे. पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या औरंगाबादच्या चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज यांच्या सोबत मोठे आर्थिक व्यवहार असल्याचे समोर येत आहे. चेतन नागराज बाबा कपाटे उर्फ सुदर्शन महाराज यांचा ‘श्रीकृष्ण आश्रम ट्रस्ट’ या नावाने पैठण औरंगाबाद येथे आश्रम आहे. कुटे याच्या अधिपत्याखाली असलेल्या दूधगंगा पतसंस्थेकडून सुदर्शन महाराज यांच्या या ट्रस्टला धर्मप्रसार करण्यासाठी २४० कोटी रुपये देणगी रूपाने देण्याचे ठरले. या संबंधीचा २४ नोव्हेंबर २०१८ रोजी एक करारनामा देखील झाला.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेरमधील जाणता राजा मैदानावर आजपासून (ता. ४ फेब्रुवारी) खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे प्रमुख भूमिका असलेल्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे प्रयोग सुरू होत आहे. ते बुधवारपर्यंत (ता. ७ फेब्रुवारी) होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त चार दिवस विनामूल्य सादर होणाऱ्या या महानाट्याची उत्सुकता संगमनेरकरांसह लगतच्या तालुक्यातील जनतेला गेल्या अनेक दिवसांपासून लागली होती. थोरात दरवर्षी आपला वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने करत असतात. यावर्षी मात्र थोरात समर्थक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने मराठ्यांचा ज्वलंत इतिहास साकारणारे शिवपुत्र संभाजी महानाट्य संगमनेरात होत आहे. यासाठी जाणता राजा मैदानावर…
आनंदोत्सव साजरा करत धांदरफळ, नांदुरी दुमाला, मिर्झापूर, निमजमध्ये जलपूजन महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निळवंडे धरणाचा ४० वर्ष स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी वापर करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना महायुती सरकारने उघडे पाडले. गेली अनेक वर्ष चातकाप्रमाणे निळवंडे कालव्यामधून पाण्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर महायुती सरकारने पाणी मिळवून दिल्याचे प्रतिपादन संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी केले. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे निळवंडे धरणाच्या डाव्या, उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला. उजव्या कालव्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या नांदुरी दुमाला, मिर्झापूर, धांदरफळ खुर्द, निमज येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी केलेल्या विनंतीवरून उजव्या कालव्याच्या जलपूजनासाठी अमोल…
प्रवीण पुरो | मो. 8169135253 देशातील लोकसभा निवडणुका जसजशा पुढे येत आहेत तसतसं देशातील राजकारण कोणतंही वळण घेऊ शकतं. विरोधकांच्या इंडिया आघाडीचे प्रवर्तक नितीश कुमारच आघाडी सोडून भाजपला जाऊन मिळत असतील, तर इतर कोणत्याही गोष्टींची चर्चा ही खूजीच. देशाच्या या विचित्र राजकीय परिस्थितीपासून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी विरोधी पक्षांनी प्रामाणिक हालचाली सुरू ठेवल्या असल्या आणि या प्रयत्नाला अनेकांनी वरकरणी पाठिंबा तसंच आघाडीत सामील होण्याचा प्रयत्न केला तरी शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. महाराष्ट्र हे देशाला वळण देणारं राज्य मानलं जातं. सर्वार्थाने देश आपल्या राज्याकडे आदर्श म्हणून पहात असे. पण गेल्या काही वर्षांपासून विशेषत: राज्यात भाजपप्रणित राज्यसत्ता निर्माण झाल्यापासून…
थोरातांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदोत्सवात उजव्या कालव्याचे जलपूजन महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निळवंडे धरणाचे डाव्या आणि उजव्या कालव्यातून येणारे पाणी पुढील अनेक पिढ्या समृद्ध करणारे ठरणार आहे. धरण आणि कालव्याच्या कामासाठी आपल्या कार्यकाळात सातत्याने पाठपुरावा करत सरकारकडून निधी मिळविला. अनेक अडचणींवर मात करून हे धरण पूर्णत्वास गेले. आता धरणातून पाणी आपल्यापर्यंत पोहोचले असल्याने या कामाचा मोठा आनंद आणि समाधान असल्याचे प्रतिपादन निळवंडे धरण आणि कालव्याचे निर्माते जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. हिवरगाव पावसा येथे उजव्या कालव्याचे जलपूजन आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माधवराव कानवडे, आर. बी. राहणे, उत्तमराव…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – लग्नामध्ये हुंडा दिला नाही म्हणून घर बांधण्यासाठी माहेरच्यांकडून पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेरमध्ये समोर आला असून या संदर्भात विवाहितेच्या तक्रारीवरून पती सासू-सासर्यांसह चार जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी, हल्ली संगमनेर शहरातील मालदाड रोड येथे असलेल्या सुवर्णा संजय भुसारी (वय ३४ वर्ष) हिचा विवाह वीरगाव येथील संजय यशवंत भुसारी याच्यासोबत झाला होता. मात्र विवाहितेच्या माहेरच्यांनी लग्न व्यवस्थित केले नाही, लग्नात हुंडा दिला नाही तसेच विवाहितेला शेती काम करता येत नाही अशी कारणे पुढे करत तिने माहेरच्यांकडून घर बांधण्यासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रात ‘रामलीला’ नाटक सादर करणे अंगाशी आले आहे. सादर करण्यात आलेल्या या नाटकात श्रीराम आणि सीता यांच्या तोंडी शिव्या आणि आक्षेपार्ह संवाद वापरण्यात आल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हे नाटक बंद पाडले होते. दरम्यान या प्रकरणी पुण्याच्या चतु:शृंगी पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या या नाटकात सीतेचे आक्षेपार्ह पात्र दाखविण्यात आल्याने या नाटकावरून मोठा गदारोळ उडाला होता. नाटकातील संवादाच्या काही क्लिप्स देखील समाज माध्यमातून व्हायरल झाल्याने त्याचे देखील पडसाद उमटल्याचे दिसून आले. पोलिसांनी सावित्रीबाई फुले पुणे…
