Author: अनंत पांगारकर
अनंत पांगारकर @ ७५८८६००९५० लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. २००९ साली झालेल्या निवडणुकीत सध्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पराभव करत या मतदारसंघातून शिर्डीच्या साई संस्थांचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले. रामदास आठवलेसारख्या बलाढ्य उमेदवाराचा पराभव करणारे वाकचौरे या मतदार संघात जायंट किलर ठरले. त्यामुळे देशभर या मतदारसंघाची चर्चा झाली. या मतदारसंघातून म्हणजेच पूर्वीच्या कोपरगावमधून शिवसेनेच्या तिकिटावर तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या पाठोपाठ वाकचौरे दुसरे खासदार ठरले. शिवसेनेकडून मिळालेली खासदारकी गमविल्यानंतर काँग्रेस, भाजप असा प्रवास करत वाकचौरे दीर्घकाळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा स्वगृही म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत परतले आहे. सध्याच्या राजकारणात…
प्रवीण पुरो @ ९८६९९९१८६८ ३ डिसेंबर १९८४ ची काळी रात्र देशातल्या प्रत्येकाच्या काळजाचा थरकाप उडवणारी ठरली होती. मध्यप्रदेशमधील भोपाळ शहरात किटकनाशकं बनवणार्या युनियन कार्बाइड या अमेरिकन कंपनीतून सोडण्यात आलेल्या विषारी वायूने शहरातील सुमारे १६ हजार लोकांचा बळी घेतला आणि सुमारे ४० हजार लोकांना कायमचं अपंगत्व आलं. जगभरातल्या अशा घटनांची नोंद झालेली ही देशातील पहिली सर्वात मोठी दुर्घटना ठरली. आज या भीषण घटनेची आठवण येण्याचं कारण सिडको अधिकार्यांच्या अर्धवटपणात आहे. या अधिकार्यांना उरणचं भोपाळ करायचं आहे. लोकं जीवानिशी गेली तरी चालतील पण कमाई झाली पाहिजे, असल्या मतलबी कारणाने त्यांनी उरणला भीषण संकटात लोटण्याचं पातक हाती घेतलंय. भरवस्तीत असले प्रकल्प नको, असे…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कार्यक्रमानंतर परतणाऱ्या काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले आणि माजी नगरसेवक सुरेश आरणे यांच्यावर राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावांमध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेला पाच दिवसांचा कालावधी उलटून देखील पोलिसांनी अद्याप प आरोपींवर कोणतीही कारवाई केली नाही. सदर गुन्ह्यातील आरोपी व मुख्य सूत्रधार यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी शिर्डीच्या डीवायएसपींना महाविकास आघाडीच्यावतीने निवेदन देण्यात आले. संगमनेर तालुक्यातील आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात असलेल्या आश्वी गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत २ जानेवारीला झालेल्या एका कार्यक्रमाहून परतत…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ठरणाऱ्या स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यासाठी रविवारी (ता. ७) कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह विविध मान्यवर संगमनेरमध्ये येत आहे. राज्यस्तरीय पुरस्कार वितरणासह पाच दिवस चालणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठीच्या सोहळ्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते रविवारी पहिल्याच दिवशी माजी आमदार उल्हासदादा पवार यांना सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने, जळगावच्या जैन उद्योग समूहास डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने तर कोल्हापूरचे आमदार पी. एन. पाटील यांना सहकारातील आदर्श कार्यकर्ता पुरस्काराने गौरविले जाणार आहे. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : विद्युत पुरवठा खंडित केल्याच्या रागातून महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास मारहाण, शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या मनोली येथील राजेंद्र सुभाष बोऱ्हाडे याला संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत तीन महिने साधा कारावास व 12 हजार रुपये नुकसान भरपाई भरण्याची शिक्षा ठोठावली आहे. २७ डिसेंबर २०१८ रोजी आरोपी राजेंद्र सुभाष बोऱ्हाडे याने सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता प्रदीप नवनाथ गुंजाळ (रा. केडगाव, अहमदनगर) यांना फोन करून शिवीगाळ केली. त्यामुळे गुंजाळ यांनी विद्युत पुरवठ्यामध्ये काही अडचण आली असेल म्हणून खात्री करण्यासाठी विद्युत सहाय्यक निखिल शेंडे यांच्याशी संपर्क करत माहिती घेतली. त्यांना देखील घटनास्थळी बोलावून…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : शुक्रवारी होणाऱ्या लग्न समारंभासाठी नवरदेवाला विवाहस्थळी पाठविण्यासाठी निघालेल्या वराच्या मिरवणुकीत असलेल्या डीजे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनाखाली समोरचे वऱ्हाड चिरडले गेले. चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजते. ही घटना संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द गावामध्ये घडली. बाळासाहेब हरिभाऊ खताळ (वय ४८ वर्ष) व भास्कर राधु खताळ (वय ७३ वर्ष) अशी मृतांची नावे असून जखमींवर संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्यासंदर्भात सूचना केल्या. पाठोपाठ त्यांच्या यंत्रणेतील कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जात जखमींना…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : प्रभू श्रीरामाबद्दल अवमानकारक शब्द वापरणाऱ्या माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या संगमनेरमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शहर पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहे. आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचे महापाप त्यांनी केले आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले. भाजपचे शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांच्यासह वैभव लांडगे, संतोष गायकवाड, संतोष पठाडे, सिताराम भांगरे, हरीश वलवे, राहुल भोईर, केतन भांगरे, सुरेश…
महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरच्या ग्रामीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघास राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशनच्या ई-मार्केट पुरस्काराने केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने देण्यात येणारा हा पुरस्कार दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी स्वीकारला. गुजरातच्या गांधीनगरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्रभाई पटेल, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. मिनेश शहा, राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. मंगलजीत आदी मान्यवर उपस्थित होते. स्वातंत्र्यसेनानी, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दूध संघाची स्थापना केली असून त्यांच्या आदर्श…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले आणि नगरसेवक सुरेश आरणे यांच्यावर राहाता तालुक्यातील लोणी येथे मंगळवारी संध्याकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत संगमनेरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात जाऊन या दोघांची भेट घेतली. मंगळवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महसूल मंत्री विखे यांच्या मतदारसंघातील आश्वीमध्ये आरपीआय नेते गायकवाड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी हे दोघे उपस्थित होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर शिर्डीकडे परतत असताना लोणी मध्ये चौगुले व आरणे यांची गाडी अडवत…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध व्यक्तिगत लाभाच्या योजनांपोटी संगमनेर तालुक्यातील १९ हजार १९३ लाभार्थ्यांना डिसेंबर २०२३ अखेर १ कोटी ४८ लाख ६९ हजार ७०० रुपयांचे अनुदान मंजुर झाले आहे. महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग झाल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली. राज्य शासनाच्या माध्यमातून विविध सामाजिक योजनांची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये प्रामुख्याने सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वर्गासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती…
