Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नागपूर – दि. ७ डिसेंबर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे सरकार असवेदनशील आहे, याचा प्रत्यय आज सभागृहात आला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या प्रश्नांवर चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली. मात्र सरकारने चर्चा तर सोडा साधे निवेदन सुद्धा केले नाही. असा घनाघाती आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. नागपूर येथील अधिवेशनाचा पहिलाच दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून गाजला. पायर्‍यांवर आंदोलन केल्यानंतर सभागृहात विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी सरकारकडे लावून धरली. मात्र अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज रेटत विरोधकांची चर्चा करण्याची मागणी फेटाळली. त्यामुळे संतापलेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – लोणी, दि. ७ डिसेंबर पोलीस पथकासह बेकायदेशीर कत्तलखान्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्राणी कल्याण समितीच्या अधिकाऱ्यांवर पिस्टलने फायरिंग करत गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या १६ जणांवर लोणी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी संध्याकाळी घडलेल्या या घटने संदर्भात गुरुवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता तालुक्यात ही घटना घडली. या संदर्भात प्राणी कल्याण समिती मुंबई हायकोर्ट महाराष्ट्र शासन या संस्थेत अधिकारी असलेल्या अप्पासाहेब बाबासाहेब नाईकवाडे (वय 39 वर्ष, रा. राहुरी) यांच्या फिर्यादीवरून नियाज कुरेशी, सद्दाम कुरेशी, अरबाज कुरेशी, नजीम कुरेशी, साजिद कुरेशी,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – दि. ७ डिसेंबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याबरोबरच संविधानकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संगमनेरच्या लौकिकाला साजेसे स्मारक उभारणार असल्याचे सांगत आणखीही महापुरुषांची स्मारके उभारणार असल्याची ग्वाही नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन प्रसंगी तांबे बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते, श्रीमती कुसुम माघाडे, के. एस. गायकवाड, विनय घोसाळे, विलास दारोळे, विनोद गायकवाड, भास्कर बागुल आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. आमदार तांबे म्हणाले, जगातील सर्वात मोठी लोकशाही व राज्यघटना देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा व मानवतेचा विचार सर्वांनी पुढे घेऊन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – दि. ५ डिसेंबर पोलीस दप्तरी बंद असलेले संगमनेर मधील बेकायदेशीर कत्तलखाने सुरूच असल्याचे अहमदनगर एलसीबीच्या छाप्यात समोर आले आहे. अनेक प्रकारच्या अवैध व्यवसायांवर कारवाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या संगमनेर पोलिसांच्या हद्दीत थेट एलसीबी छापेमारी करत कारवाया करत आहे. यामुळे स्थानिक पोलीस यंत्रणेचे पितळ उघडे पडत असले तरी एलसीबीच्या कारवाया देखील अनेकदा संशयाच्या वलयात अडकलेल्या दिसतात. बुधवारी सकाळी साडेसात वाजता मोगलपुऱ्यातील बेकायदेशीर कत्तल खानावर अहमदनगर एलसीबी पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी या कारवाईत एक लाख वीस हजार रुपये किमतीचे गोवंश जनावरांचे कत्तल केलेले सहाशे किलो गोमांस ताब्यात घेतले. याशिवाय कत्तरीसाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. अहमदनगर एलसीबीचे पोलीस नाईक सचिन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – दि. ६ डिसेंबर संगमनेर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याबरोबरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती स्मारक उभारले जाईल अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी संगमनेर येथे डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या अभिवादन सभेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज भेट दिली. या भेटीत त्यांनी संगमनेरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती स्मारक उभारले जाईल, अशी घोषणा केली. मागील महिन्यात विखे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा संगमनेरात उभारला जाईल, अशी घोषणा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर दि. ६, संगमनेर तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अध्यक्षपदी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक कार्यकर्ते अमोल खताळ यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या शिफारशीवरून जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी खताळ यांची संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदावर नियुक्ती केल्याचे पत्र दिले आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी खताळ यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या या समितीत सदस्य म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तर सचिव म्हणून तहसीलदार, नायब तहसीलदार काम बघतात. शासनाच्या विशेष सहाय्य योजना अंतर्गत असलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई, दि. ५ – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नगर उत्तर मधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली असल्याची माहिती शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनातून देण्यात आली. जिल्हाप्रमुख – रावसाहेब खेवरे (शिर्डी लोकसभा); शिर्डी लोकसभा प्रचारप्रमुख – सुहास वहाडणे (कोपरगाव, राहाता, संगमनेर, अकोले), राजेंद्र पठारे (श्रीगोंदा, नेवासा, राहुरी); सहसंपर्कप्रमुख – राजेंद्र झावरे (कोपरगाव, श्रीरामपू, नेवासा), दिलीप साळगट (संगमनेर, अकोले, राहाता); जिल्हा समन्वयक नितीन औताडे (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा), मुजीब शेख (संगमनेर, अकोले, राहाता); जिल्हा संघटक नाना बावके (संगमनेर, अकोले, राहाता), प्रमोद लबडे (कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा).…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यभर दुधाचे भाव कोसळल्यामुळे व पशुखाद्याच्या सातत्याने वाढत्या भावामुळे दुग्ध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुधाला किमान ३४ रुपये दर द्यावा, यासाठी सरकारने हस्तक्षेप करण्याच्या मागणीसाठी किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने मंगळवारी दुपारी संगमनेरमध्ये प्रांताधिकारी कार्यालयासमोर दूध ओतून आंदोलन केले. शेतकरी नेते कॉम्रेड डॉ. अजित नवले यांच्यासह सतीश देशमुख, सदाशिव साबळे, ज्योतीराम जाधव, महेश नवले, डॉ. मनोज मोरे, नामदेव भांगरे, डॉ. संदीप कडलग, एकनाथ मेंगाळ, रामनाथ वदक, नंदू रोकडे, नंदू गवांदे, ताराचंद विघे, संगीता साळवे या प्रमुख नेत्यांसह शेकडो दूध उत्पादक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी सरकारने दूध…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑगस्टमध्ये समोर आलेल्या संगमनेरच्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या ८१ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या देवळाली प्रवरा येथील कृष्णराव कदम आणि त्यांच्या पत्नी प्रमिला यांचा अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळला आहे. आत्तापर्यंत न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबीयांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्या पाठोपाठ आता कदम दाम्पत्याचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असला तरी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अद्यापही या आरोपींपर्यंत पोहोचू शकले नसल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरत आहे. न्यायालयात मुख्य आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले जात असताना आर्थिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी या व्हाईट कॉलर गुन्हेगारांना हात न…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर उपविभागातील संगमनेर-अकोले तालुक्यातील रिक्त असलेल्या १५१ गावांमधील पोलीस पाटीलपदाच्या समांतर आरक्षणासाठी येत्या ७ डिसेंबरला सकाळी ११.०० वाजता नवीन नगर रोडवरील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील सभागृहामध्ये आरक्षण सोडत काढली जाणार असल्याची माहिती प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांनी दिली आहे. संगमनेर व अकोले तालुक्यातील रिक्त पदांवर पोलीस पाटील नेमण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत. रिक्त असलेल्या जागांवर प्रचलित शासन तरतुदीनुसार प्रवर्गनिहाय आरक्षण निर्धारित करावयाचे असून त्या अंतर्गत समांतर आरक्षण सोडत काढण्यासाठी प्रांताधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संबंधित गावातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रांताधिकार्‍यांनी केले आहे. रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांच्या गावांची नावे प्रांताधिकारी कार्यालयात उपलब्ध…

Read More