Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या दहाव्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर, ज्युनिअर आणि सिनिअर गटातील स्पोर्ट्स डान्स चॅम्पियनशीप स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने नेत्रदीपक यश संपादन केले. या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करतांना ध्रुवच्या स्पर्धकांनी २१ सुवर्णसह २१ रौप्य पदकांची कमाई केली. स्पर्धेतील एकूण कामगिरीच्या जोरावर ध्रुव ग्लोबल स्कूलने दुसरा क्रमांक पटकावला. मुलींच्या १३ वर्षांखालील गटात ईश्‍वरी गोकुळ खताळने विश्‍वेश्‍वर वंदना सादर करतांना प्रथम तर, लोकनृत्य प्रकारातील रासरकेली नृत्य सादर करताना द्वितीय क्रमांक मिळवला. या वयोगटातील सांघिक प्रकारात मुलींच्या गटाने सादर केलेल्या कोनाडू या लोकनृत्य प्रकाराला रौप्य पदकाने सन्मानीत करण्यात आले. या संघात देवश्री अतुल देशमुख, आराध्या सुरेश रहाणे, काव्या स्वप्निल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरमध्ये सुरू असलेल्या गुन्हेगारी घटनांच्या तपासासंदर्भात सातत्याने संशय व्यक्त होत असताना आता शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका चोरीचा तपास शंकास्पद झाल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात आरोपीकडून चोरीचे सोने विकत घेतलेल्या सोनारांना पोलिसांनी सहआरोपी न करता क्लीन चीट दिल्याने या सोनारांवर कारवाई करावी, या मागणीसाठी संगमनेरातील तरुणाने उपोषणाचा इशारा दिला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षकांपर्यंत हे प्रकरण जाऊन पोहोचल्याने आता या प्रकरणात नेमके काय घडते याकडे लक्ष लागले आहे. संगमनेरमध्ये घडलेल्या गुन्हेगारी घटनांचा तपास लावण्याची जबाबदारी स्थानिक पोलिसांची असताना या तपासात वरिष्ठ कार्यालयाकडून सातत्याने हस्तक्षेप होत असल्याचे दिसते. यात नगर एलसीबी अग्रभागी असते. या एलसीबीचे अनेक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राहता: बिबट्याच्या संचारामुळे वारंवार पिंजरा लावण्याची मागणी करून देखील वनविभागाने केलेल्या दुर्लक्षाचा परिणाम महसूल मंत्र्यांच्या लोणीमध्ये दिसून आला. भर लोकवस्तीत आणि प्रवरा ग्रामीण रुग्णालयासमोर असलेल्या गोसावी वस्तीवर रविवारी सायंकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात नऊ वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या बालकाच्या मृत्यूकडे वनविभागाचा निष्काळजीपणा म्हणून बघितले जात आहे. अथर्व प्रवीण लहामगे असे या बालकाचे नाव आहे. लोणी बुद्रुकमध्ये प्रवरा ग्रामीण रुग्णालयासमोर गोसावी वस्ती आहे या वस्तीवर राहावयास असलेल्या लहामगे कुटुंबातील अथर्व हा चिमूरडा सायंकाळी खेळण्यासाठी संदीप गोसावी यांच्या घरी गेला होता. त्यानंतर गोसावी यांच्या मुलासोबत तो दूध आणण्यासाठी गेला होता. दूध घेऊन आल्यानंतर गोसावी यांचा मुलगा घरात…

Read More

प्रवीण पुरो @ मो. 9869991868 महिन्याभरापूर्वी एका वाहिनीच्या चर्चासत्रात भाग घेताना शिवसेनेच्या फाटाफुटीचा निकाल काय लागेल असा प्रश्‍न अँकरने आम्हा पाच जणांना विचारला होता. सहकारी चार जणांनी निकाल उध्दव ठाकरे यांच्या सेनेच्या बाजूने लागेल, असं उत्तर जे कायद्याला धरून होतं दिलं. ते योग्यच होतं. पण तसा निर्णय अभिप्रेत नव्हता. या प्रकरणात कायदा म्हणून निकाल द्यायचा असेल तर त्यात एकनाथ शिंदे यांच्या गटाचा पराभव स्पष्ट होता. तो अध्यक्षांना द्यायचा नव्हता. कायद्याला गुंडाळून निकाल द्यायचा असल्यास त्यात ठाकरे गटाच्या झोळीत काहीही पडणार नाही, हे उघडच होतं. फाटाफुटीच्या या लढ्यात उध्दव ठाकरेंच्या सेनेला सत्तेने ज्या प्रकारे त्रास दिला, यंत्रणेने जी गोची केली, निवडणूक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : गावातील अवैध दारू विक्री ग्रामपंचायतीने बंद करावी, या मागणीसाठी महिला आणि ग्रामस्थांनी उपोषण सुरू करताच ग्रामपंचायतने तात्काळ अवैध दारू विक्रेत्याची नळजोडणी तोडत त्याचा पाणीपुरवठाच बंद केला. याशिवाय त्याने अवैध दारू विक्री न थांबवल्यास ग्रामपंचायतीने त्याच्या विरोधात तीव्र कारवाई करण्याचा मानस व्यक्त केल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले या गावांमध्ये सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करावी, यासाठी महिलांनी दारू विक्रेत्याच्या घरावर मोर्चा काढला. मात्र याचा अवैध दारू विक्रेत्यावर कोणताही परिणाम झाला नाही त्यामुळे अखेरीस महिला आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने दारूबंदी करण्याच्या मागणीसाठी शनिवारी आमरण उपोषणच सुरू केले होते. त्यामुळे उपसरपंच नामदेव घुले, ग्रामसेवक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “बापू तेरे रास्ते” या महात्मा गांधींवरील भावगीत, भजनाच्या कार्यक्रमातून भाऊसाहेब थोरात यांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली. वैष्णव जनते, कानडा राजा पंढरीचा,मोगरा फुलला, मिले सुर मेरा तुम्हारा अशा विविध गीतांमधून परिसर भक्तीरसात न्हावून निघाला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त बापू तेरे रास्ते हा भजनांचा कार्यक्रम झाला. यावेळी विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ विचारवंत मधुकर भावे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, राजवर्धन थोरात, रणजीतसिंग देशमुख, प्रा. बाबा खरात,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज श्रीरामपूर : संगमनेरमधील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत राजकीय प्रतिष्ठितांनी केलेल्या सुमारे ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणाचा अद्याप तपास सुरू असतानाच आता लगतच्याच श्रीरामपूरमधील श्री संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांचे फसवणूक प्रकरण समोर आले आहे. या संदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात संस्थापक, संचालकांसह १४ जणांविरोधात भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४२० महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण) अधिनियम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात सनी किशोर अंबिलवादे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी श्री संत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सोमनाथ रघुनाथ महाले, संचालक निखिल विजय नागरे, आशिष सुरेश क्षीरसागर,…

Read More

थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त तालुक्यातील ज्येष्ठांचा सन्मान महात्मा गांधींचा विचार हाच शाश्वत विचार : आमदार थोरात महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : काही विघातक शक्तींनी महात्मा गांधींना मारले असले तरी त्यांचे विचार कधीही मारता आले नाही. आजही जगभरातील ६०० विद्यापीठांमधून गांधी विचार शिकविला जातो. गांधी-नेहरू हा देशाच्या विकासाचा विचार आहे, तो कोणीही पुसू शकणार नसल्याचे स्पष्ट करत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचे जीवनकार्य पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहणार असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार विचारवंत मधुकर भावे यांनी काढले. सहकार महर्षी थोरात कारखान्याच्या कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे जयंती शताब्दी वर्षानिमित्त सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन करण्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित जयंती महोत्सवात बॉलीवूडमधील आघाडीचा गायक जावेद आली यांनी गायलेल्या कजरारे, वंदे मातरम, पुष्पामधील श्रीवल्ली गाण्यासह विविध गीतांवर संगमनेरमधील तरुणाईने प्रचंड जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. जाणता राजा मैदानावर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवात जावेद आली लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम झाला. यावेळी विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, राजवर्धन थोरात, मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी, शरयूताई देशमुख, डॉ. हर्षल तांबे आदींसह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जावेद…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राजुर : झोपेत असतानाही आपल्यासाठी आपल्या पैशांनी काम केले पाहिजे. श्रीमंती प्रत्यक्षात उतरण्यासाठी व आपल्या ध्येयांना आणि स्वप्नांना अर्थ प्राप्त होण्यासाठी महागाईवर मात करणारी गुंतवणूक करून आपली स्वप्ने साकार केली पाहिजेत. त्यासाठीचे आर्थिक नियोजन म्हणजेच अर्थसाक्षरता होय, असे प्रतिपादन कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनील कडलग यांनी केले. सत्य निकेतन संस्थेच्या रा. वि.पाटणकर सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांच्या संकल्पनेतून ‘गोष्ट पैशापाण्याची’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी कडलग यांच्या मार्गदर्शनाने अर्थ साक्षरतेचे धडे गिरवले. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य आण्णासाहेब धतुरे, प्रा. शरद तुपविहिरे, प्रा. रमेश शेंडगे, प्रा. संतोष कोटकर, प्रा. बाळासाहेब घिगे आदी उपस्थित होते. कडलग यांनी अगदी डेबिट कार्ड कसे…

Read More