Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : संगमनेरमधून पोलीस दलाचे नाचक्की करणारी घटना समोर आली आहे. खुनाचा प्रयत्न, खून, पोक्सो, बलात्कार प्रकरणातील चार आरोपींनी शहर पोलीस ठाण्यात असलेल्या उपकारागृहाचे गज कापून पलायन केल्याची धक्कादायक घटना पहाटे घडली आहे. या कोठडीतून आरोपी पळून जाण्याचा हा दुसरा प्रकार आहे. या घटनेमुळे पोलीस आणि तुरुंग प्रशासनाची धावपळ उडाली अजून पळून गेलेल्या चारही आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके त्यांच्या मागावर पाठविण्यात आली. राहुल देविदास काळे, मच्छिंद्र मनाजी जाधव, अनिल छबु ढोले आणि रमेश रोशन दधेल उर्फ थापा असे कोठडीचे गज कापून पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे सर्वजण संगमनेरच्या उपकारागृहात न्यायालयीन कोठडीत बंदिस्त होते.…
संगमनेरमधील महिला वकील सीमा काळे-सातपुते यांना आधारचा “आदर्श समाज भूषण प्रेरणा गौरव” पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे : विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संगमनेर मधील नामांकित महिला वकील सीमा काळे-सातपुते यांचा पिंपरी चिंचवड (पुणे) येथे राष्ट्रीय फिनिक्स गोल्ड स्टार अवार्ड सोहळ्यात “आदर्श समाज भूषण प्रेरणा गौरव” पुरस्काराने नुकताच सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यामध्ये कार्यरत असलेल्या आधार सोशल फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात प्रभावी कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्काराचे दरवर्षी वितरण करण्यात येते. ॲड. सातपुते-काळे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना आयोजित कार्यक्रमात “आदर्श समाज भूषण प्रेरणा गौरव” पुरस्काराचे अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या मानसकन्या व कल्याणी महिला सेवाभावी संस्थेच्या संस्थापक डॉ. सुनीताताई मोडक, निवृत्त जिल्हा न्यायाधीश रवींद्र कुलकर्णी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर…
महाराष्ट्र संवाद न्यूज लोणी : ग्रामपंचायत निवडणूकीत मिळालेला विजय म्हणजे महायुती सरकारच्या कामावर मतदारांनी केलेले शिक्कामोर्तब असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचे मिळालेले हे प्रभावी यश आहे. सरकार आणि संघटना यांच्यातील समन्वयाने सुरु असलेल्या विकासात्मक कामाला मतदारांनी साथ दिली असल्याची प्रतिक्रीया महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राहाता तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींमध्ये जनसेवा मंडळाचे उमेदवार विजयी झाले आहेत. संगमनेर तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींमध्ये आणि श्रीरामपूर तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींमध्ये विजयी झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन करुन, मंत्री विखे पाटील म्हणाले की, आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज केंद्र व राज्यातील सरकारवर जनतेची पूर्णतः नाराजी आहे. वाढलेली महागाई, बेरोजगारी, अस्थिरता, अमली पदार्थांची तस्करी यामुळे जनता नाराज आहे. सरकारचे सर्वसामान्य जनता शेतकऱ्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. यामुळे जनतेत रोशाचे वातावरण असून आगामी काळात काँग्रेस व महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचा विश्वास माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुक्यातील सात पैकी पाच ग्रामपंचायतींवर थोरात समर्थकांनी निर्विवाद यश मिळविले आहे. नवनिर्वाचित सदस्य सरपंचांचा थोरात यांनी सत्कार केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली. थोरात म्हणाले, संगमनेर तालुक्यात सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे राजकारण केले जाते. ग्रामपंचायतमध्ये झालेला विजय हा विकास कामांचा आणि कार्यकर्त्यांच्या एकीचा आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महसूल मंत्री विखे गटाकडून आव्हान देण्याचा प्रयत्न होऊन देखील आमदार बाळासाहेब थोरात यांचेच वर्चस्व कायम राहिले असल्याने ‘थोरातच सरकार’ असल्याचे संगमनेरकरांनी दाखवून दिले. संगमनेर तालुक्यात झालेल्या सात पैकी पाच ग्रामपंचायतींवर थोरात समर्थकांनी निर्विवाद विजय मिळविला. तर संगमनेर तालुक्यातील मात्र शिर्डी विधानसभा मतदार संघात येणाऱ्या आश्वी खुर्दची ग्रामपंचायत विखे समर्थकांकडे, पठार भागातील घारगावची ग्रामपंचायत शिवसेना (ठाकरे) गटाचे जनार्दन आहेर यांनी आपल्या गटाच्या ताब्यात ठेवली. सुरुवातीलाच संगमनेर तालुक्यातील ढोलेवाडी आणि बोरबन या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. या दोन्ही ग्रामपंचायतींवर माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी काँग्रेसचा झेंडा फडकविला. तर तालुक्यातील आश्वी खुर्द आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : तीन महिने पीडितेवर अनैसर्गिक शरीर संबंध केल्याचा तसेच शरीर संबंधाचे आक्षेपार्ह फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप असणाऱ्या आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. पहिला विवाह लपवून ठेवत पीडित महिलेसोबत दुसरा विवाह करून तीन महिने अनैसर्गिक शारीरिक संबंध करून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. शरीर संबंधाचे आक्षेपार्ह फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली असा आरोप करत पीडित महिलेने संगमनेर तालुक्यातील आरोपी विरोधात सांगवी (पुणे) पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीचा हा गुन्हा संगमनेर शहर पोलिसांकडे वर्ग…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : शनिवारपासून जिल्ह्यात मराठा कुणबी व कुणबी मराठा, कुणबी जातीचे पुरावे तपासणीची विशेष मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘विशेष कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला. मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोहीम राबविण्यात आली, त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. यावर नाशिक विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये यासंदर्भात “स्वतंत्र कक्ष” स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा- कुणबी नोंदी शोधण्यासाठी ४ नोव्हेबर पासूनच विशेष मोहीम हाती घेतली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात “विशेष कक्ष”…
महाराष्ट्र संवाद न्यूज वर्धा : रखडलेल्या कामाविषयी विचारणा केल्याने आमदार रणजीत कांबळे यांच्याकडून ग्रामपंचायत सदस्याला मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. ग्रामपंचायत सदस्याच्या तक्रारीवरून आमदार कांबळे यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्ध्यातील देवळी तालुक्यामधील सोनेगाव ग्रामपंचायतचे सदस्य गणेश सातव यांनी गावातील एका भूमिपूजन कार्यक्रमावेळी आमदार कांबळे यांना रखडलेल्या कामाविषयी विचारणा केली होती. या कामाचे भूमिपूजन तीन वर्षांपूर्वी झाले तरीही अद्याप काम सुरू झाले नाही याबद्दल सातव यांनी नाराजी व्यक्त केल्याने कांबळे यांनी त्यांना मारहाण केली. कांबळे काँग्रेसचे आमदार असल्याने मारहाणीच्या प्रकरणानंतर भारतीय जनता पक्षाने हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. कार्यकर्त्याला न्याय मिळायला हवा, अशी मागणी खासदार रामदास तडस…
महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली होती. यातील एक आरोपी तब्बल महिनाभर पोलिसांच्या कस्टडीत आणि ताब्यात असताना देखील न्यायालयासमोर पोलीस या आरोपीचा सहभाग सिद्ध करू शकले नाही, जी गोष्ट पोलिसांना सहज उपलब्ध झाली असती ती पोलीस तपासामध्ये कोठेही न आल्याने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकेत असलेल्या आरोपीचा जामीन मंजूर केला. या घटनेमुळे पोलीस तपास संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. घटनेतील दोन आरोपी अद्यापही तुरुंगात असून एक-एक करत पाच आरोपी जामिनावर मुक्त झाले तर एक आरोपी अद्यापही पोलिसांना सापडू शकलेला नाही. दरम्यान यातील एक आरोपी जामिनावर मुक्त करताना न्यायालयाने तपासा संदर्भात…
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष @ प्रवीण पूरो नियतीची चक्र कशी फिरत असतात याचा धडा सध्या भाजप घेत आहे. याला कोणी कर्माचं फळ म्हणो वा नियतीचं चलचक्र. पापाचा घडा हा कधी तरी भरतोच. ती कोणत्या रुपात येतील हे कोणीही सांगू शकत नाही. केलेल्या पापांची फळं कधी तरी भोगाल, असे शाप महाराष्ट्रातल्या असंख्य राजकारण्यांनी भाजपच्या डोक्यावर फोडले आहेत. आज त्याची प्रचिती या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना येत असेल. यावेळी निमित्त झालंय ते गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचं. आरक्षणात खोडा घातल्याचे सारे दोष आपल्यावर येतील, असं त्या पक्षाच्या नेत्यांनी जराही मनात आणलं नसेल. आज ते घडतंय हे मात्र त्यांना मान्यच…
