Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड व उपप्राचार्य डॉ. रवींद्र ताशीलदार यांच्यासह संगमनेर महाविद्यालयामधील 31 जणांचा एचडी सायंटिफिक इंडेक्स 2023 मध्ये समावेश झाल्याची माहिती देण्यात आली आहे. क्रमवारी जाहीर: जागतिक पातळीवरील संशोधकांची क्रमवारी “ए.डी.सायंटिफिक इंडेक्स -२०२३ नुकतीच जाहीर करण्यात असून जागतिक संशोधकांच्या अद्ययावत क्रमवारीत संगमनेर महाविद्यालयातील संशोधकांचा मोठ्या संख्येने समावेश झाला आहे. निकष: अमेरिकेतील मिशिगन विद्यापिठातील प्रा. मुरत आल्पर व प्रा. सिहान डॉ. जर संयुक्तपणे ‘आल्पर डॉ. जर सायंटिफिक इंडेक्स’ तथा ‘ए.डी. सायंटिफिक इंडेक्स विश्लेषित केला आहे. त्यासाठी गुगल स्कॉलरवरील संशोधकांचा गेल्या पाच वर्षातील एच इंडेक्स, आय-टेन इंडेक्स निर्देशांक व सायटेशन स्कोअर याचे विश्लेषण केले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – भारतीय सण-उत्सवांच्या माध्यमातून मुलांना आपली प्राचीन परंपरा समाजावी यासाठी गीता परिवार संचलित संस्कार बालभवनमध्ये वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. गुरुवारी जन्माष्टमी निमित्ताने बालभवनमध्ये दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्रीकृष्ण, राधा, सुदामा, गोप व गोपिकांच्या आकर्षक पेहरावात आलेल्या जवळपास पन्नास मुलांनी या उत्सवात सहभाग घेतला. ‘हाथी घोडा पालखी, जय कन्हैय्या लाल की’ असा घोष करीत मुलांनी एकत्रितपणे हंडी फोडून गोपाळकाल्याचा आनंद लुटला. बालभवन गोकुळासमान: श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून गुरुवारी (ता. 7) गीता परिवाराच्यावतीने संस्कार बालभवनमध्ये बालगोपाळांची ‘दहीहंडी’ बांधण्यात आली होती. यावेळी सजवलेल्या पाळण्यात विराजमान गोपाळकृष्णांच्या समोर बसून मुलांनी सामुहिकपणे वेगवेगळी भजने गावून या उत्सवाची रंगत…
महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेर – संगमनेरच नव्हे तर राज्यातील बहुचर्चित आणि येथील समृद्ध सहकार विश्वाला काळीमा फासणाऱ्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या तब्बल 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित करत या प्रकरणी दाखल असलेल्या सर्वच अर्जांची सुनावणी एकाच वेळी घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे राजकीय विश्वात प्रतिष्ठित म्हणून वावरणाऱ्या जिल्हा परिषदेचा माजी सदस्य असलेल्या व या प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तपास जैसे थे: पतसंस्थेच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल होतात तत्कालीन तपास अधिकारी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी बँकेच्या व्यवस्थापकासह पाच आरोपींना अटक केली…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – कर्जापोटी दिलेला धनादेश बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने वटला नाही या कारणावरून संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपी कर्जदाराला सहा महिने कारावासाची व दंडाची शिक्षा ठोठावली आहे. काय होता प्रकार: श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड या कंपनीकडून अमित व्यंकटेश कल्याणकर यांनी एक लाख रुपयांचे व्यक्तिगत कर्ज घेतले होते. कर्जाच्या फेडीसाठी कल्याणकर यांनी श्रीराम फायनान्सला 1,28,279 रुपयांचा धनादेश दिला होता. कंपनीने हा धनादेश वटण्यासाठी बँक खात्यात जमा केला असता खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने सदरचा धनादेश न वटता परत आला. त्यानंतर कंपनीने कल्याणकर यांच्याकडे धनादेशाच्या रकमेची मागणी केली होती. न्यायालयात खटला: मात्र आरोपी कल्याणकर यांनी धनादेशाची रक्कम न…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – गेल्या वर्षीच्या तुलनेत अहमदनगर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने हीच परिस्थिती कायम राहिल्यास जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे संभाव्य दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे. जिल्ह्यात मागील त्याला काम उपलब्ध होण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे अधिक प्रमाणात सेल्फवर मंजूर करून ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. बैठक: संभाव्य परिस्थिती संदर्भात करावयाच्या योजनांबाबत उपाय योजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित यंत्रणांच्या बैठकीवेळी सालीमठ बोलत होते. अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी आणि संबंधित विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, चालू वर्षात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ…
महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेर – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिर्डीच्या दौऱ्यामध्ये एका शेतकऱ्याच्या मुलानं उद्धव ठाकरेंना लोणचं-भाकरीची शिदोरी दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भावनिक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हे प्रेम आहे त्यांच. हीच आमची शिदोरी आहे. हेच आमचे आशीर्वाद आहेत. मला बोलण्यासाठी शब्द नाहीत. उद्धव ठाकरे शुक्रवारी संगमनेर, शिर्डी, कोपरगावच्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते. या दौरा दरम्यान त्यांनी दुष्काळी भागाची पाहणी करत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी देखील मोठ्या आपुलकी आणि आशेने आपल्या व्यथा ठाकरेंसमोर व्यक्त केल्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना काळजी करू नका मी तुमच्यासोबत आहे, असा धीर दिला.…
महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेर – “तुम्ही कोणी धीर सोडू नका. संपूर्ण शिवसेना ताकदीने तुमच्यासोबत आहे. सरकारला एक मुदत देऊ. यात काही नाही झाले, तर मग आपण आंदोलन असेल, अथवा जे काय करावे लागेल, ते करू” अशा शब्दात माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुष्काळग्रस्तांची संवाद साधत आपल्या शिवसैनिकांना, कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांसोबत राहण्याचा सल्ला दिला. रिमझिम पावसात संवाद: संगमनेर, कोपरगाव, शिर्डीच्या दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर सोबत पाऊस घेऊनच आलेले शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिमझिम पावसातच शुक्रवारी संगमनेर तालुक्यातील वडझरी येथील दुष्काळग्रस्तांशी संवाद साधत शेतकऱ्यांना धीर दिला. नुकसानीची घेतली माहिती: शेताच्या बांधावरच दुष्काळग्रस्तांसोबत संवाद साधताना त्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेला वर्षपूर्ती होत आहे. ही यात्रा देशाच्या भविष्याला व राजकारणाला दिशा देणारी ठरली आहे. या यात्रेचा आपणा सर्वांना अभिमान असल्याचे गौरवोद्गार या यात्रेचे समन्वयक काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले. संगमनेरात पदयात्रा: राष्ट्रीय एकात्मता व लोकशाहीच्या रक्षणासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली वर्षभरापूर्वी भारत जोडो यात्रा पार पडली. यात्रेच्या वर्षपूर्ती निमित्त संगमनेरात काँग्रेसने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य पदयात्रा काढण्यात आली होती. यावेळी थोरात बोलत होते. यांचा सहभाग: संगमनेर नगरपरिषदेपासून सुरू झालेल्या या पद यात्रेचा समारोप नवीन नगर रस्त्यावर झाला. यावेळी थोरात…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – ठेवीदारांना 81 कोटी रुपयांचा गंडा घालून या रकमेचा अपहार करणाऱ्या आरोपींविरोधात पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उभारला आहे. नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी यासंदर्भात चौकशी करण्यासाठी शुक्रवारी दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेत चौकशीसाठी उपस्थित राहणार असून संबंधित ठेवीदार कर्जदार तक्रारदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड यांनी केले आहे. राजकीय प्रतिष्ठितांचा समावेश: 81 कोटी रुपयांच्या अपहरण प्रकरणी मुख्य आरोपी प्रतिष्ठित राजकीय नेता भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्य, राहुरीतील राजकीय प्रतिष्ठित कदम कुटुंबीय यांच्यासह पंधरा मुख्य आरोपींविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची मालमत्ता संरक्षित करणार: याप्रकरणी…
निवडून येण्याची क्षमता, मतदार संघाची परिस्थिती बघून मविआच्या बैठकीत निर्णय होणार महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महाविकास आघाडीमध्ये लोकसभेसाठी राज्यातील 48 जागांवर चर्चा होईल त्यावेळी जागा वाटपा संदर्भातील निर्णय घेतला जाईल. निवडून येण्याची क्षमता मतदार संघाची परिस्थिती बघून निर्णय घेतला जाणार असल्याचे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषद: काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात संदर्भात गुरुवारी संगमनेरमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत यासंबंधी महत्त्वाचे विधान केले. थोरात म्हणाले, राज्यातील 48 जागा संदर्भात चर्चा होईल. त्यानंतर काही गोष्टी ठरतील. कोणी उमेदवारी जाहीर केली असं आज म्हणू शकत नाही. महाविकास आघाडी म्हणून शिर्डीच्या जागेचा निर्णय घेतला…
