Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जालना जिल्ह्यात आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा संगमनेरात सकल मराठा समाज, संगमनेरकरांच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. बस स्थानकासमोर काही काळ रास्ता रोको करत आंदोलकांनी आपला संताप व्यक्त करत निषेध नोंदविला. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ रविवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली जाण्याची शक्यता असून यात सकल मराठा समाज सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली. विश्रामगृहावर बैठक: जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी या गावांमध्ये मराठा आंदोलनाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असतानाच संगमनेरातदेखील सकल मराठा समाज आणि संगमनेरकर संतप्त झाल्याचे दिसून आले. शनिवारी सकाळी यासंदर्भात शासकीय विश्रामगृहावर बैठक घेण्यात आली. या बैठकीत…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकरवी झालेला लाठीचार्ज हा सरकार पुरस्कृत भ्याड हल्ला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून सरकारचा अमानुषपणा ढळढळीतपणे दिसतो आहे. ट्विट: जालन्यातील आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्ज संदर्भात थोरात यांनी समाज माध्यमावर ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आंदोलन चिरडणे योग्य नाही: मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक आंदोलने सातत्याने करीत आहे, लोकशाहीने त्यांना दिलेला तो हक्क आहे. पोलिस बळाचा वापर करून आंदोलन चिरडणे योग्य नाही. चर्चेच्या माध्यमातून अनेक आंदोलनांमध्ये मार्ग निघालेला आहे, हा आजवरचा इतिहास आहे. केंद्र, राज्यात महाशक्तीचे सरकार मात्र मार्ग निघत नाही: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरच्या सहकारी पतसंस्थांच्या विश्वासार्हतेला गालबोट लावणाऱ्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी राजकीय नेता, माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह आठ आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला असून याप्रकरणी न्यायालयात कधी सुनावणी होते, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान या संदर्भात सरकारी वकील सरकार पक्षाचे म्हणणे मांडणार असल्याची माहिती मिळते. यांनी केला अर्ज: 81 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात पोलिसांकडून होणारी अटक टाळण्यासाठी मुख्य आरोपी भाऊसाहेब दामोधर कुटे याच्यासह पत्नी शकुंतला कुटे, विमल कुटे, मुलगा संदीप, अमोल आणि दादासाहेब कुटे यांच्यासह सून…
श्रावण महिन्याच्या निमित्ताने कामगारांसाठी कीर्तनाचे आयोजन समाजाला दिशा दाखविणारी माध्यमे दिशाहीन महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – मालपाणी उद्योग समूहातील कामगार आपल्या कामातच विठ्ठलाचे रूप बघणारे आहे. आयुष्यातला आनंद द्विगुणित करण्यासाठी नकारात्मक गोष्टींना दूर ठेवण्याचे आवाहन करताना आजकाल नाटक, चित्रपट, समाज माध्यमांनी विकृतीची परिसीमा गाठली. टीव्ही मालिकांनी तर कहरच केल्याचे स्पष्ट करत बहुसंख्य मालिकांमध्ये एकमेकांचे पती-पत्नी पळवापळवीचे खेळ सुपारी देऊन चालविले जात असल्याची खंत प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त महाराज आफळे यांनी व्यक्त केली. येथील मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने श्रावण मासानिमित्त आफळे महाराजांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, व्यवस्थापक रमेश घोलप आदी उपस्थित होते. आफळे महाराज म्हणाले, सभ्य…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पकडलेल्या दोघा जणांकडून ठिबक सिंचन पाईप चोरीचे रॅकेट समोर आले आहे. या चोरट्यांनी काही पाईप चोरीची कबुली दिली असून आणखी गुन्हे समोर येण्याची शक्यता आहे. हे आहेत आरोपी: फरदिन इसाक शेख व नवशाद इशाक शेख (दोन्ही रा. अकोलेनाका, संगमनेर) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. पकडलेल्या आरोपींकडून संगमनेर शहरातील दोन व संगमनेर तालुका अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकेक गुन्ह्याची दाखल करण्यात पोलिसांना यश आले आहे. याशिवाय आरोपी विरोधात चोरीचे आणखी काही गुन्हे देखील दाखल आहेत. चोऱ्यांचे सत्र होते सुरू: गेल्या काही दिवसापासून संगमनेरमध्ये जल जीवन मिशन व शेतकऱ्यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – एक कर्तव्यदक्ष संरक्षण मंत्री म्हणून राजनाथ सिंह यांची देशाला ओळख आहे. पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे देशाची ताकद निश्चितच वाढली आहे. चीन व पाकिस्तानसारख्या शेजारील राष्ट्रांना आपल्या कणखर शब्दात त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे जगभरात आज भारताचे नाव आदराने घेतले जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पुरस्काराचे वितरण: प्रवरानगर (शिर्डी) येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२३ व्या जयंतीचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी अमळनेर…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – भारताची अर्थव्यवस्था गतीने वाढत आहे. पुढील तीन वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असेल. भारत विकसित राष्ट्र होण्यात सहकार क्षेत्राचे योगदान आहे. देशाच्या सहकार क्षेत्राच्या विकासात महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचे अमूल्य योगदान आहे, असे गौरवोद्गार देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काढले. पुरस्कार वितरण सोहळा: प्रवरानगर येथे सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२३ व्या जयंतीचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य आणि कलागौरव पुरस्काराचे वितरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेर येथील नियोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – रविवारी (3 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सह्याद्री महाविद्यालयातील के. बी. दादा देशमुख सभागृहात गुणवंत शिक्षकांसह पारनेरचे आमदार निलेश लंके व सिन्नरच्या जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांना गौरवले जाणार असल्याची माहिती समन्वयक अंतोन मिसाळ व अध्यक्ष बाळासाहेब हेंद्रे यांनी दिली आहे. सातत्याने सामाजिक उपक्रम: संगमनेरमधील पठार भागातील विविध कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या जाणीव जागृती फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवले जात असून दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या आदर्श शिक्षकांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने जाणीव फाउंडेशनच्यावतीने आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जनआरोग्यम परिवार आयोजित जाणीव फाउंडेशनचा यावर्षीचा लोकनेते बाळासाहेब थोरात शिक्षक गौरव पुरस्कार सह्याद्री प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका नम्रता पवार यांना जाहीर झाला आहे. अध्ययन, अध्यापनासाठी पुरस्कार: फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अमित पाटणकर यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शैक्षणिक अध्ययन, अध्यापनात नव संजीवनी ठरावा असा हा पुरस्कार पवार यांना देण्यात येणार आहे. रविवारी वितरण: शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिला जाणारा हा पुरस्कार पवार यांना रविवारी (3 सप्टेंबर) बीएसटी महाविद्यालयाच्या के. बी. दादा देशमुख सभागृहात वितरित केला जाणार आहे. पुरस्काराबद्दल पवार यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र संवाद न्यूज ठाणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना उपशाखाप्रमुख अक्षय ठुबे यांची धारदार शासनाने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात समोर आला आहे. ठुबे वसंत विहार भागातील शिवसेनेचे उपशाखाप्रमुख होते. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. मंगळवारपासून होते बेपत्ता: वसंत विहारच्या धर्मवीर नगर परिसरात राहणारे उपशाखाप्रमुख अक्षय ठुबे मंगळवारपासून बेपत्ता होते. ते घरी परतले नसल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी बुधवारी चितळसर पोलीस ठाण्यात नोंदवली होती. पोलीस ठुबे यांचा शोध घेत होते. बुधवारी रात्री आढळला मृतदेह: बुधवारी रात्री अक्षय ठुबे यांचा मृतदेह कोकणी पाडा परिसरातील जंगलात आढळून आला. तुबे यांची हत्या झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्वरेने तपास…
