Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन भांडी घेण्यासाठी खूप घासाघीस करत असलेली श्रीमंत घरातली ती महिला एका मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या मोबदल्यात आपल्या दोन जुन्या साड्या दारावर भांडी विकायला आलेल्या त्या भांडेवाल्यास द्यायला शेवटी कशीबशी तयार झाली. “नाय ताई ! मला न्हाय परवडत. एवढ्या मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या बदल्यात मला तुमच्याकडून कमीत कमी तीन तरी साड्या पायजेत.” म्हणत भांडेवाल्याने ते भांडे त्या बाईंच्या हातातून अदबीने काढून आपल्या हाती परत घेतले. अरे भाऊ, फक्त एकदाच नेसलेल्या साड्या आहेत या दोन्ही. बघ अगदी नवीन असल्यासारख्याच आहेत! तुझ्या या स्टीलच्या पातेल्यासाठी या दोन साड्या तशा तर फार जास्त होतात. मी म्हणून तुला दोन साड्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निळवंडे धरणातून संगमनेर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन इंदोरी फाटा (अकोले) येथे लिकेज झाली आहे. लिकेज झालेल्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असल्याने सोमवारी सकाळी संगमनेर शहर व उपनगरात होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे माहिती मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. कधी होणार नियमित पाणीपुरवठा: पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून याचा परिणाम सोमवारी होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर होणार आहे. पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर संगमनेर शहराला नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे. आवाहन: तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने निळवंडे धरणात पाण्याची नवीन आवक होत असून पाणी गढूळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून, गाळून थंड करून…
शासन आपल्या दारी, थापा मारते लय भारी; उद्धव ठाकरेंचा हिंगोलीत हल्लाबोल “मी फडतूस म्हणणार नाही, कलंक म्हणणार नाही, थापाड्याही…”; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना पुन्हा डिवचलं महाराष्ट्र संवाद न्यूज हिंगोली – भाजपमध्ये सगळे आता आयाराम आहेत. अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी आयुष्य खर्ची घातले आहे. परंतु ते आता फक्त सतरंज्या उचलण्यापुरते उरले असून शासन आपल्या दारी थापा मारते लय भारी अशा शब्दात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्ला चढविला. हिंगोलीत निर्धार सभा: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज रविवारी हिंगोलीतील रामलीला मैदानावर निर्धार सभा झाली. सभेत ठाकरेंनी केंद्रातील मोदी आणि राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका केली. जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत त्यांनी…
आम्ही एक झटका दिला आणि त्यांना ऑनलाईनवरुन थेट लाईनवर आणलं… काही लोक पाटण्यात जमले आणि द्वेषाची खिचडी शिजवू लागले अजित पवारच सरकारमध्ये आले आणि सरकार आणखी मजबूत झाले महाराष्ट्र संवाद न्यूज परभणी – “तुमचा भोंगा हा कायम शिव्या शाप देण्यासाठी वाजतो पण आमचा भोंगा हा शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लोकांसाठी वाजतो.” ‘काही लोक पाटण्यात जमले आणि द्वेषाची खिचडी शिजवू लागले’, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी सांगत रविवारी विरोधकांवर निशाणा साधला. शासन आपल्या दारी: रविवारी परभणीमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज उन्हं उतरायला लागली होती. मी आणि माझी मैत्रीण घरी परतत होते. मी रोज तिला वाटेत तिच्या बस स्टाॅपवर सोडते. आणि मग पुढे जाते. बसस्टाॅपच्या आधी गाडी थांबवून आम्ही जरा वेळ शिळोप्याच्या गप्पा मारतो, आणि मग आपापल्या दिशेने जातो. गेले काही दिवस त्या स्टाॅपच्या आधाराने एक कुटूंब रहायला आलंय. भिकारीच असावेत. तिथेच फुटपाथवर चूल मांडलीय. नवरा, बायको, दोन तीन लहान मुलं. एक कुत्र्याचं पिल्लू. कधीच कसली भांडाभांडी न करता अगदी मजेत रहाताना दिसतात ते. रोज बघून बघून मी आता त्यांना ओळखायला लागले. त्यातलं सगळ्यात छोटं मूल एकदमच गोड हालचाली करत फिरत असतं. असेल जेमतेम दोन अडीच वर्षाचं. बसस्टाॅपच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष @ प्रवीण पुरो महाविकास आघाडी सरकारला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी जे-जे कारण ठरले त्यांच्याशी आघाडीतील घटक पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी किती जवळीक साधावी याला काही मर्यादा असायला हवी. सारं काही हातातून हिसकावून घेणार्या अशा बदमाशांना त्यांची जागा दाखवण्याची शिकस्त आघाडीतल्या प्रत्येक नेत्यामध्ये असायला हवी. पण दुर्देवाने अशांविषयी आघाडीतले घटकपक्ष आणि त्यांचे नेते बेरजेचं राजकारण करताना दिसतात तेव्हा त्यांनाही सत्तेची लालसा आहे की काय असं वाटतं. या संशयाने जनसामान्यांमध्येही अशा व्यक्ती आणि त्यांच्या पक्षाविषयीची सहानुभूती आपोआप लोप पावत असते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचे प्रमुख, देशातील धुरंधर राजकारणी शरद पवार यांच्याविषयी…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – संगमनेरच्या घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाची सेंट्रलाइज ऑक्सिजन पाईपलाईन व टर्मिनल तोडून साडेबारा लाखाच्या तांब्याच्या पाईपची चोरी करणारी सहा जणांची आख्खी टोळीच पकडण्यात नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याशिवाय हे पाईप भंगारमध्ये विकत घेणाऱ्या दोन भंगार व्यावसायिकांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. काय होती घटना: ग्रामीण रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर सेंटरच्या ऑक्सीजन प्लांटमधून साडेबारा लाख रुपयांच्या तांब्याच्या पाईप चोरीचा प्रकार गेल्या सोमवारी समोर आला होता. या संदर्भात रुग्णालयातील परिसेविका शकुंतला पालवे यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला संगमनेर शहर पोलिसांसोबत नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस यासंदर्भात समांतर तपास करत होते.…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – सिंचनासाठी शेतकऱ्याला पाटबंधारे विभागामार्फत देण्यात येणारे पाणी अविरत चालू राहू देण्यासाठी शेतकऱ्याकडे 85 हजार रुपयांची मागणी करून चाळीस हजार रुपयांवर तडजोड तडजोड करत दोघा खाजगी व्यक्तींच्या मध्यस्थीने लाचखोरी करणाऱ्या कालवा निरीक्षकासह तिघांना अहमदनगरच्या अँटी करप्शनने पकडले आहे. श्रीरामपूर पोलीस ठाण्यात या तीन लाचखोराविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. हे आहेत लाचखोर: अंकुश सुभाष कडलग (वय ४२ वर्ष) हा संगमनेर शहरालगतच्या बटवाल मळा, सावित्रीबाई फुले नगर, ढोलेवाडीमधील रहिवासी असून सध्या तो श्रीरामपूरमध्ये वडाळा उपविभागाअंतर्गत नॉर्दन ब्रांच येथील सिंचन शाखेत कालवा निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. कडलग याने अनिस सुलेमान शेख, (वय- ३४ वर्ष, धंदा-शेती, (खाजगी इसम)…
महाराष्ट्र संवाद न्यूज देशातील व विशेषतः महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींचा इतिहास उज्वल आहे. सामाजिक सुधारणांचा स्त्रोत जिथे सुरू झाला आणि तिथे महाराष्ट्र शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांनी ज्या गतीने पुढे नेला त्या महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीकडे मोठ्या आशेने पाहिले जाते. अभिमानास्पद उत्तम भविष्यासाठी पोषक आणि चिकित्सक वातावरण महाराष्ट्र भुमीने नेहमी दिले आहे, पण सद्य राजकारणात महाराष्ट्राला नेहमी डावलले जाते आणि अभ्यासू, तत्वज्ञानी उमेदवारांना महाराष्ट्रातील, देशातील खरे शासक संसदेत पोहचू देत नाही. आजही मतदारांना आपल्या देशातील खऱ्या शासकांचा पत्ता देखील लागलेला दिसत नाही. पुर्वी मतपत्रिकेत घोळ होत आता ई.व्हि.एम.मध्ये छेडछाड करुन निकालच बदलले जाऊ शकतात. लोकशाहीची व्याख्या राज्यशास्त्र वेत्ते, लेखक, समाजशास्त्र आणि इतर…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शुक्रवारी मध्यरात्री नासिक-पुणे महामार्गावर संगमनेरनजीक कऱ्हे घाटाजवळ एका संशयास्पद वाहनातून मुंबईच्या दिशेने जाणारे गोमांस पकडण्यात तालुका पोलिसांना यश मिळाले आहे. साडेसहा लाखाचा मुद्देमाल: या कारवाईत पोलिसांनी एका टाटा कंपनीच्या वाहनासह तब्बल साडेसहा लाख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. यात अडीच लाख रुपये किमतीच्या एक हजार किलो गोवंश जनावरांची कत्तल केलेल्या गोमांसाचा समावेश असून पोलिसांनी या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांना अटक केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. यांना पकडले: मुज्जफ्फर जाकीर हुसेन कुरेशी (वय २८ वर्ष, रा. दादामिया इस्लामी चाळ, कुरेशीनगर, कुर्ला (पूर्व) मुंबई) आणि असलान अस्लम कुरेशी (वय २२वर्ष, रा. अल्ताफ बिल्डिंग,…
