Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्याच्या मंत्रिमंडळात नव्या मंत्र्यांचा समावेश होऊन आठवडा उलटला तरी सरकारचे खातेवाटप अद्याप जाहीर झालेले नाही. शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये खाते वाटपावरून मोठा पेच निर्माण झाल्याने खाते वाटपाचा तिढा आता दिल्लीत सोडविला जाणार आहे. त्यासाठी शिंदे फडणवीस पवार दिल्लीला जाणार आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन आठवडाभराचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांसह नव्या मंत्र्यांना अद्याप कोणतेही खाते देण्यात आले नसल्याने सध्या हे सर्वजण बिन खात्याचाच कारभार हाकत आहे. वास्तविक नव्या मंत्र्यांना दोन दिवसात खातेवाटप जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील अंतर्गत कलहामुळे अद्याप खातेवाटप जाहीर होऊ शकले नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटपाचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरमधील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सौरभ पगडाल यांनी इंग्लंडच्या बर्मिंगहॅमच्या एन.एच.एस. फाउंडेशन या नामांकित संशोधन संस्थेच्या दि रॉयल ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट व ऑर्थोस्कोपिक सर्जरीमधील फेलोशिप पूर्ण केल्याची माहिती डॉ. प्रदीप कुटे यांनी दिली. इंग्लंड मधील सर्वात जुन्या व सुप्रसिद्ध असलेल्या एन.एच.एस. फाउंडेशन ट्रस्टचे दि रॉयल ऑर्थोपेडिक हॉस्पिटलची स्थापना 1909 मध्ये झालेली असून या हॉस्पिटलमध्ये सुपर स्पेशालिटी ऑर्थोपेडिक हॉस्पिटल असून तेथे असलेल्या 17 सुसज्ज ऑपरेशन थिएटरमध्ये नामांकित व निष्णात ऑर्थोपेडिक सर्जनद्वारा दररोज सुमारे 50 मोठ्या व जखमेच्या आर्थोपेडिक सर्जरी होत असतात. या हॉस्पिटलमध्ये सर्जन डॉ. सौरभ पगडाल यांनी जॉईंट रिप्लेसमेंट व ऑर्थोस्कोपिक सर्जरीचे महिनाभराचे विशेष प्रशिक्षण…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आमदार बाळासाहेब थोरात यांचे सर्वमान्य नेतृत्व आणि संगमनेरचा विकास राज्यासाठी दिशादर्शक असल्याचे स्पष्ट करत यावर्षी देखील राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तविला आहे. हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी मंगळवारी माजी मंत्री, आमदार थोरात यांच्या ‘यशोधन’ या जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी त्यांचे स्वागत केले. श्रीराम कुऱ्हे, पी. वाय. दिघे, अनिल सोमणी, नामदेव कहांडळ, गोरक्षनाथ वर्पे, विजय हिंगे, प्रा. बाबा खरात, संजय कोल्हे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व युवक उपस्थित होते. यावेळी डख यांनी यशोधन कार्यालयातील कामकाजाची पद्धत समजावून घेतली. भेटी दरम्यान डख…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आपल्या नावावर तब्बल दोन मोठ्या उलाढालीच्या कंपन्या असल्याचा धक्का बावीस वर्षे वयाच्या एका बेरोजगार तरुणाला जीएसटीच्या आलेल्या 24 लाख 61 हजार रुपयांच्या बिलाच्या नोटीसमुळे बसला आहे. त्यामुळे धक्का बसलेल्या या तरुणाने थेट पोलीस स्टेशन गाठून आपली व्यथा पोलिसांपुढे मांडली. पोलिसांनी देखील या बेरोजगार तरुणाच्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी तपास सुरू केला आहे. इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातील वृत्त दिले असून त्यात म्हटले आहे की, उत्तर प्रदेश मधील बुलंद शहरातील रहिवासी असलेल्या देवेंद्र कुमारला 24 लाख 61 हजार रुपयांच्या थकीत जीएसटी बिलाची नोटीस आली. बांधकाम मजूर असलेल्या देवेंद्र कुमारला या नोटीसमुळे चांगलाच धक्का बसला. गेल्या काही महिन्यांपासून बेरोजगार असलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर – सध्या सत्तारुढ असलेल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या काळात राज्याची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. लोकशाहीत आपल्या न्याय्य मागण्यांसाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन, मोर्चे काढले जातात. मात्र सध्या कायद्याचा गैरवापर करत आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे सत्र या सरकारकडून सुरू असल्याचा आरोप करीत दलित बांधवांनी शनिवारी काढलेल्या मोर्चा प्रकरणी सुमारे दीडशे जणांवर पोलिसांच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्यात आला याचा शिवसेनेचे (ठाकरे) शहरप्रमुख अमरभाऊ कतारी यांनी निषेध केला आहे. कतारी यांनी म्हटले आहे की, नांदेड येथील अक्षय भालेराव आणि मुंबई येथील हिना मेश्राम यांच्या हत्येच्या निषेधार्थ दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी शहर व तालुक्यातील दलित संघटनांच्या वतीने शनिवारी (8 जुलै) निळ्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर – जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करत मोर्चा काढल्या प्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी एकवीस प्रमुख पदाधिकाऱ्यांसह इतर सव्वाशे आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुमारे दीडशे लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने मोर्चेकर्यांमध्ये खळबळ उडाली आहे. राज्यात मागासवर्गीय समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप करत नांदेड येथील मागासवर्गीय तरुण अक्षय भालेराव याची निर्घून हत्या, मुंबई येथे इंजीनियरिंगचे शिक्षण घेणारी युवती हिना मेश्राम हिच्यावर अत्याचार करून तिच्या झालेल्या हत्याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, या दोघांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी यासह अन्य मागण्यासाठी शनिवारी (8 जुलै) विविध संघटनांच्यावतीने निषेधाच्या घोषणा देत प्रांताधिकारी कार्यालयावर निळा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या संदर्भात…
नूतन पदाधिकार्यांचे पदग्रहण; मालपाणी उद्योग समूहाकडून 21 लाखांची देणगी महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर- इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमनपदी झालेली निवड वैश्विक संघटनेकडून मिळालेली समाजसेवेची खूप मोठी संधी आहे. डिस्ट्रिक्टमधील हजारो महिलांच्या साथीने सेवाकार्याचा नवा आदर्श निर्माण करण्यासाठी यापुढे सांघिक पातळीवर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन इनरव्हील क्लब डिस्ट्रिक्ट 313 च्या नूतन चेअरमन रचना मालपाणी यांनी केले. इनरव्हील क्लबच्या नूतन पदाधिकार्यांच्या पदग्रहण सोहळा डिस्ट्रिक्ट मधील 76 शाखांमधील 630 महिलांच्या उपस्थितीत ढोले पाटील लॉन्सच्या सभागृहात पार पडला. यावेळी मालपाणी बोलत होत्या. इंटरनॅशनल इनरव्हील क्लबच्या व्हाईस चेअरमन ममता गुप्ता, मावळत्या चेअरमन मुक्ती पानसे यांच्यासह डिस्ट्रिक्टच्या व्हाईस चेअरमन डॉ. शोभना पालेकर, सेक्रेटरी डॉ. आशा देशपांडे, खजिनदार…
आजच्या बदलत्या काळात तत्त्व जिवंत ठेवण्याचा संघर्ष : कुलगुरू संजीव सोनवणे चिन्नण्णाच्या माध्यमातून एक चांगले पुस्तक महाराष्ट्रासमोर: आमदार बाळासाहेब थोरात महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची प्रगल्भता आणि राजकीय क्षमता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात आहे. सध्याच्या परिस्थितीत चांगले दिवस आले असल्याने बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ विचारवंत लेखक डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केली. जयहिंद लोक चळवळ आयोजित चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या हिरालाल पगडाल लिखित ‘चिन्नण्णा’ या आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी आमदार जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक डॉ. सुधीर तांबे होते.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण सुरू असताना माणसा-माणसातील संवेदना हरवत चालल्या आहे. अशा स्थितीत गावोगावी ग्रंथ मंदिरे उभी राहिल्यास सुसंस्कृत समाज निर्मिती होईल, असे प्रतिपादन पुण्याच्या बार्कलेज या आयटी कंपनीचे मानव संसाधन व्हाईस प्रेसिडेंट प्रीतम देशमुख यांनी केले. स्व. पतिंगराव देशमुख यांच्या स्मृति निमित्ताने देशमुख यांनी जवळेकडलग येथील सावरकर विचार युवा मंच संचलित स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयास ग्रंथ भेट दिले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव माऊली देशमुख होते. वाचनालयाचे अध्यक्ष गोकुळ खंडागळे, उपाध्यक्ष प्रताप कडलग, कार्यवाह सुनील कडलग, दिलीप कदम, श्रीमती प्रणिता देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, व्हाट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या जाळ्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – एक रुपयात पीक विमा योजना ही राज्य शासनाने सुरु केलेली महत्त्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. शेतकऱ्यांना अशा योजनेतून लाभ देणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य असल्याचे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. राज्य शासनाने खरीप व रब्बी हंगामाकरीता सुरु केलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेचा प्रसार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रथाचे उद्घाटन महसूलमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या रथांना हिरवा झेंडा दाखवून संपूर्ण जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना या योजनेची माहिती देण्यासाठी हे रथ जिल्ह्यामध्ये रवाना करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी…
