Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कडून खाजगी प्रवासी बसेसची विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेत अवघ्या पंधरा दिवसातच 140 वाहने दोषी आढळून आली असून दंडापोटी 6,18,260/-रुपये वसूल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश डगळे यांनी दिली आहे. या मोहिमेत 16 जुलै अखेर 350 बसेसची तपासणी करण्यात आली. या विशेष मोहीमेत मद्य प्रशासन करुन वाहन चालविणाऱ्या चालकांची तपासणी करणे, वेग नियंत्रकामध्यें छेडछाड करणे, अग्निशमन यंत्रणा नसणे, विना परवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करणारी वाहने, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, अवैध मालवाहतूक करणाऱ्या बसेस, वाहनांमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, आपत्कालीन निर्गमन आणि दरवाजे कार्यरत स्थितीत नसणाऱ्या,…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे माजी कृषिमंत्री, काँग्रेसचे गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर टीका केल्यानंतर राज्याचे नवे कृषिमंत्री धनंजय मुंडे ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून आले. माध्यमांशी बोलताना मुंडे म्हणाले, राज्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके यांची विक्री करणाऱ्या विरोधात अधिक कठोर कायदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या पावसाळी अधिवेशनातच अशा विक्रेत्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा कायदा अस्तित्वात आणणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात संपन्न झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी एक विशेष समितीही स्थापन करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. थोरात…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात विविध भागातील डोंगर, टेकड्या, माळरान हरित झाली आहेत. अभियाना अंतर्गत आतापर्यंत 80 लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले असून यावर्षी ही संख्या एक कोटीवर नेण्याचा संकल्प असल्याची माहिती दंडकारण्य अभियानाच्या प्रकल्प प्रमुख संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी दिली. संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्ष तांबे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना यावेळी रोपण करण्यासाठी रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शिवाजीराव खुळे, विठ्ठलबाबा खुळे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – अधिवेशनात पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झालेले काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमने-सामने बघावयास मिळाले. आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर टीका करत काही प्रश्न उपस्थित केले होते. यावर थोरात यांच्या टिकेला उत्तर देत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, शेतकऱ्यांच्या प्रश्न संदर्भात आम्हालाही गांभीर्य आहे. काही भागात पाऊस कमी असल्याने पेरण्या होऊ शकल्या नाहीत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 80 टक्के पेरण्या झाल्या आहेत. पुणे आणि नाशिक विभागात पेरण्या कमी प्रमाणात झाल्या. हवामान विभागाने पुढील आठवड्यात पाऊस सांगितला आहे, त्यामुळे पेरण्या योग्य प्रकारे होतील. यासंदर्भात सरकारने एका समितीची स्थापना केली आहे. दुबार पेरणीची वेळ आली…
बाजारात बोगस बियाणे खते मोठ्या प्रमाणात; सरकारी असल्याचे दाखवून काही टोळ्या राज्यभरात हप्ते वसुली करत आहे राज्यात 50 टक्के पेक्षा अधिक भागात पाऊस नाही तर केवळ 20 टक्केच पेरण्या पूर्ण नगरमधील मदतीच्या शब्दाचा मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना विसर महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – बाजारामध्ये बोगस बियाणे, खते मोठ्या प्रमाणावर आले आहेत. काही टोळ्या सरकारी असल्याचे दाखवून संपूर्ण राज्यभरात हप्ते वसुली करत आहे. आशा स्थितीत दुर्दैवानं सरकार म्हणून शेतकऱ्यांकडे कोणतेही लक्ष दिले जात नाही. मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप, दिल्ली दौरे या सगळ्या प्रकरणात शेतकऱ्यांकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याची टीका काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी केली. राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – अजितदादांचे मंत्री आणि शरद पवारांच्या भेटीत आज नेमकी काय चर्चा झाली? याबाबत जयंत पाटलांनी मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, हे सर्वजण पवार साहेबांना भेटण्यासाठी आले होते. ते अनपेक्षितपणे आले. पवार साहेबांनी त्यांचे सर्व म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेतले आहे. अजित दादांचा नेतृत्वाखाली राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या या गटाचे म्हणणे आहे की, आपण एकसंध राहू. चूक झाली आहे. आपणच यातून काय तो मार्ग काढावा. यावर पवार साहेबांनी त्यांना कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. आम्ही यावर चर्चा करून निर्णय घेऊ असे पाटील म्हणाले. राज्य विधीमंडळ अधिवेशन उद्यापासून सुरू होत असतानाच राज्यात काही महत्त्वाच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – कोल्हार घोटी राज्यमार्गावर निर्जन ठिकाणी वाहन अडवून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली सराईत गुन्हेगारांची पाच जणांची टोळी उघडकीस आणण्यास शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौघांना पकडले असून टोळीचा मोहरक्या अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे. पकडलेल्या आरोपींमध्ये तिघा अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. या टोळीकडून पोलिसांनी 1 लाख 23 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तृतीय पंथीयांचा वेश परिधान करत राज्य मार्गावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली सहा जणांची टोळी तीन दिवसांपूर्वीच पकडण्यात यशस्वी ठरलेल्या शहर पोलिसांना लागोपाठ दुसरे यश मिळाले आहे. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत दाभाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच आरोपी…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – न्यायालयाचा निकाल, अध्यक्षांचा निकाल यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असं वाटत होतं. मात्र आता असं वाटतंय की, राष्ट्रवादीमुळेच हा मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. काँग्रेस हा एकच पक्ष आता शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये येणं बाकी आहे तोही आला तर काय हरकत आहे असा प्रश्न आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित करत अजित दादा मुख्यमंत्री होतील याला मी होही म्हणू शकत नाही आणि नाही सुद्धा म्हणू शकत नाही, सध्या अंदाजाच्या पलीकडे राज्याच राजकारण गेलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेमध्ये येऊन एक वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी देखील भाजप शिवसेना मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.…
महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष | प्रवीण पुरो शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे नागपूरमध्ये जाऊन काही बोलले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी सार्या महाराष्ट्रात त्यांचा निषेध केला. राज्याच्या भल्याची ज्यांना अक्कल नाही ते ही यानिमित्त बाहेर आले. स्पष्ट बोललं की माणसाला झोंबतं. जे स्पष्ट बोलतात तेच दिसतात. महाराष्ट्रात असं उघडपणे बोलण्याची कोणाची हिंमत नसते. उध्दव ठाकरे यांनी ही हिंमत थेट नागपूरमध्ये जाऊन दाखवली आणि कोण गजहब झाला. आपल्या नेत्याची कोणी निंदा नालस्ती केली तर त्याचा निषेध करायचा अधिकार त्याच्या समर्थकांना असायलाच हवा. पण ज्याच्या समर्थनार्थ आपण हे करतो, तो त्या समर्थनाच्या पात्रतेचा आहे काय, याची जाणीव समर्थकांनी ठेवली पाहिजे. जो कलंकित शब्द उध्दव…
महाराष्ट्र संवाद न्यूज उस्मानाबाद – पाझर तलाव आणि साठवण तलावाकरिता संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्याचे 26,56,017/- व 4,31,798/- रुपयांचे दोन धनादेश उस्मानाबादच्या प्रांताधिकारी कार्यालयातून काढून देण्याच्या मोबदल्यात दोन लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दोघा खाजगी उस्मानाबाद एसीबीने रंगेहात पकडले. पकडलेल्या लाचखोरात एका संपादकाचा समावेश आहे. अनिरुद्ध अंबऋषी कावळे (वय 52 वर्ष, रा. केकस्थळवाडी, उस्मानाबाद) व बाबासाहेब हरिश्चंद्र अंधारे (वय 42 वर्ष, संपादक दैनिक मराठवाडा योद्धा, रा. गणपती मंदिर जवळ, आनंदनगर, उस्मानाबाद) अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत. यासंदर्भात अधिक माहिती अशी, तक्रारदादाच्या पत्नीच्या नावे असलेले शेत जमीन शासनाने पाझर तलाव आणि साठवण तलावासाठी संपादित केली आहे. संपादित केलेल्या जमिनीचा अधिकचा मोबदला न्यायालयाने दिलेल्या…
