Author: अनंत पांगारकर
माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांचा पुढाकार महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महिलांचे सबलीकरण व त्यांचे आरोग्य याचबरोबर समृद्ध कुटुंब व्यवस्थेकरता जयहिंद महिला मंचच्यावतीने माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जात असून संगमनेर-शिर्डी या पायी वृक्षदिंडीत मार्गातील 9 गावांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. संगमनेर ते शिर्डी या पायी दिंडीत समनापुर, वडगाव पान, निळवंडे, कवठे कमलेश्वर, कासारे, काकडी, कोऱ्हाळे, नांदुरखी, शिर्डी, या गावांमध्ये दंडकारण्य अभियानांतर्गत रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण झाले. दुर्गाताई तांबे म्हणाल्या, सजीव सृष्टीच्या रक्षणाकरता थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दंडकारण्य अभियान सुरू केले. या अभियानाचे हे 17 वे वर्षे आहे. काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राज्य सरकारने शुक्रवारी गेल्या तीन वर्षांपासूनचे क्रीडा पुरस्कार जाहीर केले आहेत. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्यांचा सन्मान या पुरस्काराद्वारे राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. यामध्ये संगमनेरची कन्या सायकलपटू प्रणिता सोमण हिच्यासह राज्यातील 116 जणांचा समावेश आहे. सन 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन वर्षातील एकत्रित पुरस्काराची घोषणा क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे केली. प्रणिता प्रफुल्ल सोमण हिला सायकलिंग साठी सन 2019-20 चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू म्हणून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रणिता ही संगमनेर मधील वैद्यकीय व्यावसायिक प्रफुल्ल सोमण यांची कन्या आहे. महाजन म्हणाले, राज्यात क्रीडा…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – आंबी (ता. मावळ) येथे एका बंद खोलीत शुक्रवारी (ता.१४) रात्रीच्या सुमारास मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ सिने अभिनेते रवींद्र महाजनी (वय ७७) यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. महाजनी यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेते महाजनी हे गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून आंबी येथे एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहण्यासाठी आले होते. शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – शपथविधीच्या तब्बल बारा दिवसानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अखेर राज्याच्या अर्थ खात्याच्या किल्ल्या सोपविण्यात आल्या आहे. शिवाय त्यांच्या सर्वच मंत्र्यांना वजनदार खाती देण्यात आली आहे. अजित पवार 2 जुलैला शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आणखी आठ मंत्र्यांना शपथ देण्यात आली होती. मात्र त्यानंतर खाते वाटपाचा घोळ सुरूच होता. त्यातच मुख्यमंत्री शिंदे गटाकडून पवारांना अर्थ खाते देण्यास विरोध दर्शविला जात होता. परिणामी पवारांना राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडील महसूल खाते सोपविले जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अखेरीस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिल्ली दरबारात झालेल्या…
शहर पोलिसांच्या नव्या टीमची लक्षवेधी कामगिरी परजिल्ह्यातील टोळीकडून दरोड्याच्या साहित्यासह सुमारे तीन लाखाचा मुद्देमाल ताब्यात महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस दलात केलेल्या खांदेपालटानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी लक्षवेधी कामगिरी केली आहे. तृतीयपंथीयांच्या वेषात दरोड्याच्या तयारीतील सहा जणांची टोळी पकडण्यास शहर पोलिसांना यश आले. शहर पोलिसांचे हे मोठे यश मानले जात आहे. संजय मारुती शिंदे (वय 25 वर्षे रा. चिसखेड, ता. भोताळा, जि. बुलढाणा), ओंकार शंकर शेगर (वय 23 वर्षे रा. टाकळी तलाव, पो. ढोरपगाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा, सुनिल बाबुराव सावंत (वय 32 वर्षे रा. टाकळी तलाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा, राजेश शंकर शेगर…
महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या धमकी प्रकरणी आरोपीकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी जयेश पुजारी उर्फ शाकीर याचे जम्मू काश्मीरमधील कुख्यात दहशतवादी बशिरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशा सोबत होते, असं एनआयएच्या तपासात निष्पन्न झालं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील कार्यालयात जयेश पुजारीने उर्फ शाकीरने जानेवारी आणि मार्च महिन्यात दोन वेळा गडकरींना धमकी दिली होती. या धमकी प्रकरणी नागपूर पोलिसांनी यापूर्वीच जयेश पुजारी याच्या विरोधात यूएपीए अंतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. आता त्याच गुन्ह्यांमध्ये बशुरुद्दीन नूर अहमद उर्फ अफसर पाशाला सहआरोपी बनवण्यात आले आहे. सध्या बशिरुद्दीन नूर अहमद उर्फ…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार सत्तेत असले तरी त्यांच्यात सर्व काही आलबेल नाही. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी शपथ घेतली असली तरी त्यांना अद्याप खाते वाटप करण्यात आले नाही तसेच मंत्रिमंडळ विस्तार देखील रखडला आहे. यामुळे तिन्ही पक्षाचे आमदार नाराज असल्याने या पार्श्वभूमीवर आता महायुतीने तीन पक्षांच्या समन्वयासाठी १२ जणांच्या समन्वय समितीची स्थापन केली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड हे या समितीचे प्रमुख समन्वयक आहेत. खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये आत्तापर्यंत बैठकांचा सिलसिला सुरू आहे. चर्चेच्या फेऱ्या होत असल्या तरी देखील अंतिम निर्णय समोर येताना दिसत नाही. तसेच अर्थ खाते राष्ट्रवादीला देण्यास…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – रोटरी क्लबसह विविध संस्थांनी आयोजित केलेला रक्तदान शिबिराला संगमनेरकरांचा मोठा प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये एकाच वेळी 327 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदात्यांना एक लाखाचे अपघाती विमा संरक्षण आणि छत्री भेट देण्यात आली. रक्ताची वाढती गरज लक्षात घेत रोटरी क्लब, टीएलसी ग्रुप, इनरव्हील क्लब, संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहत, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, निमा, आयएमए, आयडीए, आयएचएमए आदी संस्थांनी शुक्रवारी (7 जुलै) आयोजित केलेल्या या शिबिराचे उद्घाटन एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या हस्ते औद्योगिक वसाहतीमध्ये तर जागतिक स्तरावर संगमनेरचे नाव उंचावणाऱ्या सायकलपट्टू प्रणिता सोमन हिच्या हस्ते रोटरी नेत्र रुग्णालयात करण्यात आले. रक्तदात्यांमध्ये महिलांचाही मोठ्या संख्येने…
महाराष्ट्र संवाद न्यूज आपल्या वक्तव्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या आणि मंत्रिपदावर गंडांतराची शक्यता निर्माण झालेल्या राज्याच्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात न्यायालयाने खटला चालविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या समोरील अडचणी आणखी वाढल्या आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी आणि अपुरी माहिती दिल्याच्या कारणावरून राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोडच्या प्रथम वर्ग न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरलाल शंकरपेल्ली आणि पुण्यातील डॉक्टर अभिषेक हरिदास यांनी 2021 मध्ये दाखल केलेल्या याचिकेत हे आदेश देण्यात आले आहे. या संदर्भात न्यायदंडाधिकारी मीनाक्षी एम. धनराज यांनी सीआरपीसी 204 अन्वये कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 च्या कलम 125 ‘अ’…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी कोणताही गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला नसताना केवळ राजकीय द्वेषातून त्यांची खासदारकी रद्द करून त्यांना बेघर करण्यात आले. गांधी यांच्यावरील अन्यायाविरोधात आज आम्ही एक दिवसाचे मौन सत्याग्रह आंदोलन केले. आंदोलन संपले असून आता भ्रष्ट भाजपचा राज्यभर भांडाफोड करून त्यांना सळो की पळो करून सोडणार असल्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. जनतेची भावना संसदेत मांडणाऱ्या निरपराध राहुल गांधी यांच्यावर लावण्यात आलेल्या खोट्या आरोपांमागे भाजपचा हात असल्याचा आरोप पटोले यांनी बुधवारी केला. मंत्रालयाजवळ महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसच्या वतीने मौन सत्याग्रह करण्यात आला. यावेळी माध्यमांच्या…
