Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज पंढरपूर – गेल्या 35 वर्षांपासून देवगड येथील भास्करगिरी महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील भाऊसाहेब मोहनीनाथ काळे आणि त्यांच्या पत्नी मंगल यांना आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरातील महापूजेचा बहुमान मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते ही महापूजा झाली. त्यामुळे यावर्षी नगर जिल्ह्यातील नेवासा येथील वडाळा बहिरोबा या दांपत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळाला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आज (ता. 29 जून) आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापूजा झाली. या महापूजेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दांपत्यासमवेत काळे दाम्पत्य सहभागी झाले होते. महापूजेचा मान मिळाल्यानंतर या गणपतीला एक वर्षाचा मोफत एसटी पास एस टी महामंडळाकडून…
महाराष्ट्र संवाद न्यूज चोराला कोण आपलं म्हणेल, कोण त्याची पूजा करेल; पण महाराष्ट्र धर्मात चोरही वंदनीय आहे आणि त्या चोराचे नाव आहे विठ्ठल. ह्या विठ्ठलाला अनेक प्रतिभावान कवींनी, संतांनी आपल्या शब्दात “धरले”. गच्चं बांधून ठेवले. कसे ते सांगत आहेत निरेन आपटे! ग. दि. माडगूळकरांनी ह्याला वेडाही म्हटलं, त्यांनी लिहिलं आहे: “घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्याविना ते कोणा नकळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार! विठ्ठला, तू वेडा कुंभार!” प्रत्येक माणूस निराळा घडवून, प्रत्येकाचे दैव निराळे घडवणारा हा विठ्ठल कुणा मुखी लोणी टाकतो तर कुणा मुखी अंगार टाकतो, म्हणून हा वेडा कुंभार वाटतो. विठुरायाचं वर्णन “कानडा राजा पंढरीचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज उत्तर प्रदेशातील सहानपूर येथे भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आजाद यांच्यावर अज्ञात लोकांनी गोळीबार केल्याची घटना घडली. या जीवघेण्या हल्ल्यातून ते बचावले असून जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळते. आझाद त्यांच्या फॉर्च्यूनर कारमधून देवबंद दौऱ्यावर होते. ते देवबंदजवळ पोहोचले असताना काही अद्याप लोकांनी त्यांच्या कारवर अचानकपणे गोळीबार केला. त्यांच्या कारवार अनेक गोळ्यांचे ठसे दिसत असून कारच्या सगळ्या काचा फुटल्या आहेत. तसेच अज्ञातांनी झाडलेल्या गोळ्यांमधील एक गोळी आझाद यांच्या बरगडीला चाटून गेली आहे. त्यामुळे त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. हल्लेखोर नेमके…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार दि. 3 जुलै, 2023 रोजी दुपारी १-०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडित जवाहरलाल नेहरु सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जैन परंपरेचा चातुर्मास रविवारपासून (दि. ०२ जुलै) सुरु होत असुन संगमनेर येथील जैन स्थानकमध्ये प्रखर व्याख्याता पू. श्री. विश्वदर्शनाजी म.सा. व विद्याभिलाषी पू. श्री. तिलकदर्शनाजी म.सा. या साध्वींचा चातुर्मास होणार आहे, अशी माहिती संगमनेर संघाचे संघपती शिरीष दर्डा व चातुर्मास समितीचे अध्यक्ष राजकुमार पारख यांनी दिली. चातुर्मास निमित्त साध्वींजींचा मंगल प्रवेश गुरुवारी (दि. २९ जुन) संगमनेर शहरातील आनंद नागरी सहकारी पतसंस्थेपासून शोभा यात्रेने जैन स्थानक, सुयोग सोसायटीमध्ये सकाळी साडेआठ वाजता आगमन होणार आहे. मंगल प्रवेश निमित्त सकल जैन समाजाला गौतम प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या मंगल प्रवेश व शोभा यात्रेमध्ये सकल जैन समाज व…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक न्याय देण्याची केंद्र शासनाची भूमिका असून सुगम्य भारत अभियानाच्या माध्यमातून विकासाची प्रक्रीया अधिक गतिमान करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. लोणी येथे केंद्रीय आधिकारीता मंत्रालय आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तिंना साधन साहित्याचे मोफत वितरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आशिष येरेकर, सहायक आयुक्त राधाकिसन देवडे, डॉ. अभिजित दिवटे, बाळासाहेब गायकवाड, श्रीकांत भालेराव, सुरेंद्र थोरात, प्रकाश लोंढे, पप्पू बनसोडे आदी उपस्थित होते. आठवले म्हणाले,…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – राज्याचे माजी महसूल मंत्री काँग्रेसचे पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते युवक काँग्रेसच्या “बेहत्तर भारत की बुनियाद” या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. आमदार थोरात यांच्या उपस्थितीत मंगळवारी अहमदनगरमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली. बैठकीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व तालुकाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी थोरात यांनी या सर्वांशी संवाद साधत जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती व संघटनात्मक कार्याची माहिती जाणून घेतली. या बैठकीत युवक काँग्रेसच्या होऊ घातलेल्या उपक्रमाच्या पोस्टरचे प्रकाशन देखील करण्यात आले. अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, प्रदेश सचिव दीप चव्हाण, जिल्हा युवा काँग्रेस अध्यक्ष स्मितल वाबळे आदी…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – केंद्र सरकारच्या एडीप योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७२० दिव्यांगाना सहाय्यक उपकरणांचे मंगळवारी (२७ जून) लोणी येथे मोफत वाटप करण्यात येणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते व महसूल, पशूसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे उपस्थित राहणार आहेत. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सकाळी साडेदहा वाजता शिवकांता लॉन्स, लोणी येथे हा कार्यक्रम होणार आहे. अहमदनगरचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न करून केंद्र सरकारच्या एडिप योजनेच्या माध्यमातून जिल्हयात १२…
महाराष्ट्र संवाद न्यूज सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या राज्यभरातील युवा शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त या सोहळ्याचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. पुरस्कारासाठी कृषी क्षेत्रातील तसेच कृषी पूरक व्यवसाय (शेळीपालन, कुक्कुटपालन, गोपालन, कृषी प्रक्रिया क्षेत्र व इतर कृषी अंगीकृत व्यवसाय) यामध्ये उत्कृष्ट नियोजन करून दिशादर्शक प्रकल्प केलेल्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. देशात आजही सुमारे 55 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असते. निसर्गाची अनियमितता, कधी अतिवृष्टी, तर कधी…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई अर्जून लोंढे-कोपरगावकर यांची आज द्वारकामाई वृध्दाश्रम येथे भेट घेत विचारपूस केली. वृध्द कलावंत म्हणून शांताबाईंचा शासनाच्यावतीने योग्य तो सन्मान राखत शासकीय योजनांचा लाभ त्यांना मंजूर केला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ही भेट घेतली. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही शांताबाईंच्या प्रकृतीची समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून विचारपूस केली. त्यांना सर्वतोपरी शासकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या. मागील दोन दिवसापासून शांताबाईंची…
