Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राज्यात शिर्डी आणि चिमूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात येणार असून याबाबतचा अतिशय महत्त्वाचा ठराव आज मंत्रीमंडळ बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. जिल्हा प्रशासनाचे बळकटीकरण करण्याच्या तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व चंद्रपूर जिल्हयातील चिमूर येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणे बाबतचा प्रस्ताव राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीमंडळ बैठकीत मांडला. शिर्डी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जगात अनेक नावाजलेली व दैदिप्यमान यश मिळवलेली माणसे आहेत. त्यांचे यश आपल्याला दिसते मात्र त्यामागील त्यांचे प्रयत्न दिसत नाही. अशाच यशस्वी व्यक्तींपैकी एक म्हणजे क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर. प्रत्येकाला सचिन व्हावेसे वाटते पण सचिनसारखे कष्ट नको असतात. असे चालणार नाही. तुम्हाला जर यशाच्या शिखरावर जायचे असेल व इच्छित ध्येय गाठायचे असेल तर योग्य दिशेने प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन संगमनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले. विद्या विद्यापीठ संचलित व्हिजन कोचिंग इन्स्टीट्युटच्यावतीने आयोजित केलेल्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विदयापीठाचे अध्यक्ष डॉ. नामदेव गुंजाळ होते. प्रा. राहुल मिश्रा, प्रा. सुनिल…
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक : गेल्या महिनाभरापासून रखडलेल्या बदल्यांना अखेर मुर्हूत लागला आहे. राज्य सरकारने नाशिक विभागातील बदल्यांचे आदेश जारी केले असून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या संगमनेरचे तत्कालीन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांची नाशिक जिल्हा निवडणुक उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर या पदावर कार्यरत असलेल्या स्वाती थविल यांची उपजिल्हाधिकारी पाटबंधारे क्रमांक १ येथे बदली करण्यात आली आहे. संगमनेरचे तत्कालीन प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांची महिनाभरापूर्वी नाशिक येथे बदली करण्यात आली होती मात्र त्यांना नियुक्तीचे ठिकाण देण्यात आले नव्हते. मंगरूळे यांनी संगमनेरमध्ये २०१९ ते २०२३ या कार्यकाळात संगमनेर उपविभागीय अधिकारी म्हणून काम पाहिले. संगमनेरला येण्यापूर्वी त्यांनी २०१६ ते २०१९ यादरम्यान नासिक…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शहरातील जोर्वे नाका येथे जोर्वे येथील आठ तरुणांवर झालेला प्राणघातक हल्ला, त्यानंतर त्याचे जोर्वे गावात उमटलेले पडसाद, शहरातील भगवा मोर्चा नंतर समनापुर गावात पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्यासमोर झालेली दगडफेक प्रकरण हाताळण्यात अपयशी ठरलेल्या पोलीस निरीक्षक ढुमणे यांची नगर कंट्रोलला तडकाफडकी महिनाभराच्या आतच बदली करण्यात आली आहे. त्यांचा पदभार प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्याकडे तीन महिन्यांसाठी सोपविण्यात आला आहे. मंगळवारी रात्री वमने यांनी तालुका पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतली. जोर्वे येथील तरुणांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर संगमनेरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकारावर नियंत्रण मिळविण्यात शहर पोलीस…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निर्ढावलेल्या दागिने चोरांनी पोलीस यंत्रणेला पोलीस यंत्रणेला आव्हान देतानाच सोमवारी दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पावणेतीन लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना शहरातील अकोले नाका परिसरात घडली. संगमनेरमध्ये दागिने आणि दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. उपविभागाचा पदभार घेतलेल्या उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासमोर या गुन्हेगारीचा बीमोड करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. शहर पोलीस ठाण्यात वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेले कर्मचारी देखील चोरांचा अद्याप शोध लावू शकलेले नाही. त्यामुळे या पोलीस ठाण्यात निश्चितच पाणी कुठेतरी मुरतंय असे दिसते. या दोन्ही अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्याचा विशेषतः कर्मचाऱ्यांचा बारकाईने अभ्यास करून…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – गुन्हेगारीचे माहेरघर झालेल्या संगमनेरमध्ये दागिने चोरीचा सिलसिला सुरूच आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रात्री जेवणानंतर फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढत धूम स्टाईलने पोबारा केला. या प्रकारामुळे दागिने चोरीच्या घटनेत आणखी एका गुन्ह्याची वाढ झाली. बस स्थानकापासून जवळच असलेल्या पावबाकी रस्त्यावर रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या संदर्भात जानकीनगरमध्ये दूधगंगा पतसंस्थेजवळ राहणाऱ्या सविता शशिकांत मुळे वय 65 वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औषध विक्रेते असलेले शशिकांत मुळे हे रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जेवणानंतर पत्नी सविता यांच्यासोबत फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. पावबाकी रस्त्याने फिरत असताना…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पिकअप चालकाला चौघांनी मारहाण करत पिकअपसह सुमारे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्याची घटना नाशिक पुणे महामार्गावरील गुंजाळवाडी शिवारात घडली. दरम्यान काही वेळानंतर पोलीस पथकासह पिकअपचा शोध घेतला असता ती बेवारस स्थितीमध्ये जवळच कासारवाडी मध्ये आढळून आल्याचे समोर आले आहे. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्री चोरीची ही घटना घडली. अधिक माहिती अशी, महेश रतीलाल पंचाळ हा वाहन चालक पिकअप घेऊन गुजरातहून नासिक-पुणे मार्गाने कर्नाटकला जात असताना सोमवारी रात्री सव्वा बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान पिकअप घेऊन गुंजाळवाडी शिवारातून उड्डाणपूल पास करून जात असताना लघुशंकेसाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ज्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात अशी घटना घडली, तेव्हा सर्वांनी त्यांना सांभाळून घेतले होते, त्यामुळे विरोधकांनी आळंदीतील प्रकरणावरून राजकारण करू नये, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. मंदिरात प्रवेश देण्याच्या कारणावरून रविवारी आळंदीमध्ये पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये वाद झाला हा वाद एवढा विकोपाला गेला की शेवटी पोलिसांना वारकऱ्यांवर लाठीचार्ज करावा लागला. या घटनेचे व्हिडीओदेखील समोर आले आहेत. तर वारकऱ्यांवर कोणताही लाठीहल्ला करण्यात आलेला नाही, असे राज्याचे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे. यानंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर चांगलीच टीका करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून संगमनेरमध्ये देखील शिवसेनेच्या ठाकरे गटाने सरकार विरोधात सोमवारी सकाळी निषेध आंदोलन केले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त १२ ते २६ जूनपर्यंत ‘नशामुक्ती भारत पंधरवडा’ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेत जिल्हाभर व्यापक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्याअनुषंगाने जिल्ह्यात महाविद्यालयातील समान संधी केंद्रांमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी दिली आहे. भारत सरकारने अंमली पदार्थाच्या धोक्याविरुद्ध लढण्यासाठी ‘ड्रग्स मुक्त ‘भारत’ चा संकल्प केला आहे. त्याअनुषंगाने ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने १२ ते २६ जून या कालावधीत ‘नशामुक्त भारत पंधरवडा’ जाहीर करून त्याबाबत सर्व राज्यांना अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अंमली…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर -रविवारी आळंदी येथे श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा दरम्यान वारकऱ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याविरोधात सोमवारी सकाळी संगमनेरमध्ये शिवसेनेने (ठाकरे) शिंदे-फडणवीस सरकारविरोधात निषेध आंदोलन केले. शिवसेना वारकरी भजनी मंडळाच्यावतीने शिंदे-फडणवीस सरकारच्या निषेधार्थ व राजीनामाच्या मागणीसाठी संगमनेर बस स्थानकासमोर हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांनी वारकऱ्यांच्या वेशात पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह केलेल्या या आंदोलनाने लक्ष वेधून घेतले होते. रविवारी आळंदी येथील श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी व पोलिसांमध्ये मंदिर प्रवेशावरून वाद उपस्थित झाला व त्याही पुढे जाऊन भगवा ध्वज खांद्यावर घेऊन हरीनामाचा गजर करणाऱ्या वारकऱ्यांवर पोलिसांनी अमानवीपणे लाठीचार्ज केला. ह्या घटनेने संपूर्ण…
