Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: शहरातील नासिक-पुणे महामार्गावर असलेल्या जोर्वे नाका येथे रविवारी रात्री झालेल्या हाणामारी आणि दंगल प्रकरणी पोलिसांनी सोळा आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने पाच तारखेपर्यंत वाढ केली आहे. सुरुवातीला पकडलेल्या 16 आरोपींची पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता पोलिसांच्यावतीने सरकारी वकील मिराज पर्बत यांनी जोरदार व्यक्तिवाद करत आरोपींच्या पोलीस वाढ करण्याची मागणी केली. आरोपींच्या वकिलांचा आणि सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत आणखी वाढ केली. रविवारी रात्री जोर्वे नाका येथे झालेल्या वादातून काही नागरिकांवर प्राणघात हल्ल्याचा प्रयत्न झाला. धारदार शस्त्राचा वापर करत दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला. गुन्हेगारांनी थेट कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देत अशांतता…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – राज्यात जनतेच्या मनातील सरकार असल्यामुळेच लोकांच्या हिताचे निर्णय होत आहेत. सर्व समाज घटकांसाठी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरु आहे. सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांची भरपाई या आठवड्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल, अशी ग्वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राहाता तालुक्यातील वाकडी व पंचक्रोशीतील गावांमधील शेतकरी, नागरिकांचा समस्या मंत्री विखे पाटील यांनी आज राहाता येथे जाणून घेतल्या. ‘शासन आपल्या दारी’ या शासन उपक्रमाचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. यावेळी शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. विखे म्हणाले, शासन आपल्या दारी…
नव्या युगाचे आर्थिक व्यवस्थापन कार्यशाळा महाराष्ट्र संवाद न्यूज शेवगाव – कोरोना महामारीनंतर रशिया-युक्रेन युद्धाच्या जागतिक पातळीवरील झालेल्या आर्थिक ध्रुवीकरणाचा सकारात्मक परिणाम म्हणून भारतीय रुपया हे चलन जागतिक पातळीवर अमेरिकन डॉलर नंतर आंतरराष्ट्रीय चलन म्हणून पर्याय ठरू पाहत आहे, सद्यस्थितीत जागतिक आर्थिक क्रमवारीत भारताचे असलेले पाचवे स्थान लवकरच आणखीन मजबूत होऊन येत्या काही वर्षांत भारत जागतिक पातळीवर तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल, असा आशावाद एमएफडी सुनील कडलग यांनी व्यक्त केला. मंगळवारी मेडिकल असोसिएशन आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने चला अर्थसाक्षर होऊया या उपक्रमांतर्गत ‘नवीन युगाचे आर्थिक व्यवस्थापन’ या कार्यशाळेत कडलग बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. संजय लड्डा होते. रोटरी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाकरिता ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती योजना अंतर्गत संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील विकास कामासाठी एक कोटी तीन लाख रुपयांचा निधी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते,आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून मंजूर झाल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली. संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य, शिक्षण, दळणवळण, सिमेंट बंधारे, रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजनासह अनेक विकासाच्या योजना आमदार थोरात यांनी सातत्याने राबविल्या. सहकारातून समृद्धी निर्माण झालेला हा तालुका राज्यात विकसित असलेल्या पहिल्या पाच तालुक्यांमध्ये गणला जातो. सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षासाठी ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे येळुशी ठाकरवाडी वस्ती अंतर्गत सामाजिक सभागृहाचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज आज सकाळी किरकोळ कारणाने बायकोशी कटकट झाली, वैतागून दवाखान्यात आलो होतो. ओपीडी मध्ये नर्सने एक केसपेपर आत आणून दिला. पेशंटचं नाव वाचलं, पुढे वय लिहिलं होतं…१०३ वर्षे! मी सिस्टरला आत बोलवून ‘नीट वय विचारत जा!’ असं म्हणालो. “सर, त्याहून जास्ती असेल असं घरचे म्हणताहेत” ती म्हणाली. मी खुर्चीवरून उठून पलीकडे गेलो. टेबलावर कृश, छोटीशी आजी, अबोली रंगाची साधीशी नऊवारी नेसलेली, सुरकुत्याने भरलेला चेहरा, तोंडचं बोळकं, चेहऱ्यावर मिश्किल हसू.. ऐकायचा प्रॉब्लेम असेल असं उगाच गृहीत धरून मी बरोबर उभ्या असलेल्या सुनेला ‘काय होतंय” असं विचारलं. ती काही सांगणार इतक्यात “मला इचारा, मी सांगते की” आजी हसून म्हणाली. “मला…
Maharashtra sanvad news Anant Pangarkar संगमनेर – अहमदनगरसह नाशिक व पुणे जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या आणि व्यापाऱ्यांची आर्थिक कामधेनू म्हणून परिचित असलेल्या संगमनेर मर्चंट बँकेची निवडणूक बिनविरोध होणार की बँकेची निवडणूक लागणार? याचा आज दुपारपर्यंत अंतिम निर्णय समोर येणार आहे. दरम्यान सत्ताधारी गटाने निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केल्यानंतर अनेक उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. नव्या जुन्यांचा मेळ साधत सत्ताधारी गटाने आपल्या व्यापारी एकता पॅनलची अंतिम यादी जाहीर केली आहे. बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाले असून शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. सत्ताधारी गटाच्या काही संचालकांनी दुसऱ्या इच्छुक उमेदवारांना संधी मिळावी यासाठी यावेळी उमेदवारी अर्ज भरले नाही. राखीव जागेपैकी एका…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने ३ व ४ जूनला भंडारदर्याच्या पांजरे गावात काजवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या काजवा महोत्सवाला जास्तीत जास्त पर्यटकांनी भेट देण्याचे आवाहन नासिक पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक श्रीमती मधुमती सरदेसाई-राठोड यांनी केले आहे. सरदेसाई-राठोड यांनी यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, काजवा महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या पर्यटकांना प्रशिक्षित मार्गदर्शकासोबत काजवे बघण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा देखील आनंद घेता येणार आहे. तसेच या महोत्सवाच्या ठिकाणी स्थानिक आदिवासी लोकांनी उत्पादन केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री देखील करण्यात येणार आहे. यामध्ये भंडारदरा परिसरामध्ये विशेष करुन घेतल्या जाणाऱ्या काळा भात व…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – कांदा अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केले मात्र ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर ई पीक पेऱ्याची नोंद झाली नाही अशा शेतकऱ्यांनी समितीचे अहवाल संबंधितांकडे सादर करण्याचे आवाहन संगमनेरच्या सहकारी संस्थेचे उपनिबंधक संतोष कोरे यांनी केले आहे. या संदर्भात कोरे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाकडील कांदा अनुदान योजनेप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, चेट पणन अनुज्ञाप्ती धारक व नाफेडमध्ये शासन निर्णय दिनांक २७ मार्च २०२३ नुसार दिनांक १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतक-यांनी कांदा अनुदान मिळणेसाठी प्रस्ताव सादर केलेले आहेत. परंतु ज्या ठिकाणी शेतक-यांचा ७/१२ उता-यावर ई पीक पे-यांची…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्याना योजनेच्या अंगीकृत रुग्णालयात ५ लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत करण्यात येत असुन या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत कार्ड प्राप्त करुन घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात ४४ अंगीकृत रुग्णालये असुन १ हजार २०९ प्रकारच्या विविध आजारावर मोफत उपचार केले जातात. या आजारामध्ये हृदय विकार, मेंदू विकार, किडनी विकार, अपघात, कर्करोग इत्यादी प्रकारच्या गंभीर आजारावर उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. या योजनेचा लाभ हा आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्याना दिला…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – वैद्यकीय व्यवसायासाठीचे परवानगी नसताना देखील रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बनावट डॉक्टरवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद आयुब शेख, (रा. नवरंग कॉम्प्लेक्स, बागवानपुरा, संगमनेर) असे या बनावट डॉक्टरचे नाव आहे. विशेष म्हणजे संगमनेर शहरात या डॉक्टरचा दवाखाना राजरोसपणे सुरू होता. संगमनेर नगर परिषदेच्या कॉटेज रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी प्रतिभा कचकुरे यांच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 अधिनियमाचे कलम 33 व 37 प्रमाणे संगमनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष राहुल वाघ यांनी संबंधित डॉक्टरवर…
