Author: अनंत पांगारकर
पुणे (महाराष्ट्र संवाद न्यूज) महिलेसोबत अश्लील संभाषण करून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी असलेल्या निलेश अष्टेकर यांच्या विरोधात पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. अष्टेकर काही वर्षांपूर्वी पुणे शहर पोलीस दलामध्ये नेमणुकीस होते. सध्या ते गुप्त वार्ता विभागात कार्यरत आहेत. पोलीस दलातील वड्या आयपीएस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मूळची धुळ्याची असलेली ही 31 वर्षीय महिला सध्या ठाण्यामध्ये कळवा येथे राहावयास आहे. विधवा असल्याने धुण्याभांड्याची कामे करून ती आपला उदरनिर्वाह करते. अष्टेकर यांनी या महिलेच्या फेसबुक अकाउंटवर 19 फेब्रुवारी 2023 रोजी…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) वाळू खरेदी करणाऱ्या ग्राहकांना स्वखर्चाने ग्राहकांच्या इच्छित स्थळी वाळू पोहोच केली जाणार आहे. ग्राहकांना वाळू पोहच करण्याच्या अनुषंगाने सर्व गौण खनिज वाहतुकदार (सहा टायरपर्यंत असणारे टिप्पर टैम्पो व इतर ) यांनी www.mahakhanij.maharashtra.gov.in/mahatrack/login या प्रणालीवर जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन अहमदनगरचे अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी केले आहे. राज्य शासनाने वाळू तस्करी थांबविण्यासाठी नवीन वाळू धोरण जाहीर केले आहे या धोरणाच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यात वाळू उत्खनन वाळू डेपो निर्मिती व व्यवस्थापन अशा स्वरूपाच्या निविदा मागविण्यात आले आहे. त्या पाठोपाठ आता वाहतूकदारांना नोंदणी करावी लागणार आहे. वाळू धोरणानुसार ग्राहकांच्या स्वखर्चाने वाळू ग्राहकांच्या इच्छुक ठिकाणी पोहच करण्यात येणार आहे. ग्राहकांना…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) घरीच झालेल्या प्रसूतीनंतर पोट दुखत असल्याने ती ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आली. तिची शरीरयष्टी बघता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चूकचुकली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नातेवाईकांकडे रुग्णाच्या आधार कार्डची मागणी केली आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले आणि पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. संगमनेर तालुक्यातील कनोली येथे बालविवाहाची घटना पोलीस ठाण्यात पोहोचली असतानाच त्यापाठोपाठ संगमनेर तालुक्यातील ही दुसरी घटना समोर आली आहे. यामुळे संगमनेरमध्ये बालविवाहाचे प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले. दुसऱ्या घटनेतील पीडित बालिका संगमनेर तालुक्यातील असून तिचे सासर देखील संगमनेर तालुक्यातच आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात या पालिकेच्या तक्रारीवरून तिचा नवरा सासू-सासरे आणि आई-वडिल…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामध्ये मानवी तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलिसांनी यातील रॅकेट उघड करत चौघा जणांना ताब्यात घेतलं असून चार जणांची सुटका केली आहे. मानवी तस्करी करणाऱ्या टोळीने लोकांना डांबून ठेवत, त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडून वेठबिगारी तसेच भीक मागून घेतली जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पिलाजी भोसले, अमोल भोसले, अशोक भोसले आणि गंजा काळे अशी बेलवंडी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे असून आणखी दोघा आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. परराज्यातील मनोरुग्ण किंवा भोळसट लोकांना महाराष्ट्रामध्ये पाच-पाच हजार रुपयात विकले गेले असल्याचे समोर आले असून आरोपींनी मानसिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना बेलवंडी…
शिर्डी, (महाराष्ट्र संवाद न्यूज) ‘‘लोणी जिल्हा परिषद शाळेची बीओटी तत्त्वावर सुंदर इमारत उभारण्यात आली आहे. लोणी जिल्हा परिषद शाळेचे हे बीओटी मॉडेल राज्यभर राबविण्यात येईल.’’ अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी केली. लोणी बु. येथे बीओटी तत्त्वावर बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचे व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुल इमारतीचे लोकार्पण शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे-पाटील, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अण्णासाहेब…
आश्वी (महाराष्ट्र संवाद न्यूज) महिलांच्या चळवळीमधून भीमक्रांती अवतरेल. महामानव बाबासाहेबांच्या विचारांची आठवण करून देवून या देशात ब्राह्मणशाही व भांडवलशाही हे दोन प्रमुख शत्रू असून यांच्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत असल्याने त्यांना ओळखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शाहीर संभाजी भगत यांनी केले. तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्यावतीने आश्वी खुर्द येथे बुधवारी (ता. 3 मे) लोकशाहीर संभाजी भगत यांच्या शाहिरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समितीने केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे आश्वी परिसरातील नागरिकांनी न भूतो न भविष्यती असा डोळ्यांचे पारणे फेडणारा अविस्मरणीय सोहळा अनुभवला. कार्यक्रमास्थळी पेटत्या मशालीच्या ज्वाळा व हलगीच्या कडकडाटात प्रेक्षकांमधून जोरदार…
तिरुवनंतपुरम : ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटात भारतात ‘लव जिहाद’ या दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदू मुलींचे वास्तव चित्रण करण्यात आले आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आदल्या दिवशी या चित्रपटाच्या विरोधात तब्बल सहा याचिका दाखल केल्याने न्यायालयाने तातडीने निर्णय देण्यास स्पष्ट नकार दिला. ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट वादाच्या भोव-यात सापडला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यापासून ते शशी थरूरपर्यंत अनेक दिग्गजांनी या चित्रपटावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला आव्हान देणाऱ्या सहा याचिका काल केरळ उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर आता न्यायमूर्ती एन. नागेश आणि न्यायमूर्ती सोफी थॉमस यांच्या खंडपीठात सुनावणी होईल. सर्वोच्च न्यायालय आणि मद्रास उच्च…
मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज) शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर उडालेला गदारोळ थांबण्याची चिन्हे निर्माण झाले आहेत आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला असून अशा आशयाचा ठराव राष्ट्रवादीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. प्रदेश कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करणारा ठराव मांडण्यात आला आहे. हाच ठराव सर्वच नेत्यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष राहणार असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. राष्ट्रवादीच्या निवड समितीची बैठक सुरू होताच प्रफुल्ल पटेल यांनी दोन ठराव मांडले. शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्याचा एक ठराव मांडण्यात आला. दुसरा ठराव शरद…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) अवघ्या सोळा वर्षाच्या बालिकेसोबत बालविवाह करणाऱ्या नवरोबासह त्याचे आई-वडील आणि सासूवर संगमनेरच्या तालुका पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंध अधिनियमाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील कनोली येथे बालविवाहाचा हा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात कनोली गावचे ग्रामसेवक रवींद्र केशव शिंदे (वय 38 वर्षे, रा. हनुमंतगाव, ता. राहता जि. अहमदनगर) यांनी पोलीस ठाण्यात कनोली येथील नवरदेव त्याचे आई-वडील आणि त्याच्या सासू विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन मे 2023 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कनोली येथे आरोपींच्या घरी बालविवाहाचा प्रकार समोर आला. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर ग्रामसेवक…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) ‘शासकीय योजनांची जत्रा’ या उपक्रमांतर्गंत संगमनेर व अकोले तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांना विविध महसूली, शैक्षणिक दाखल्यांचे तत्परतेने वितरण करण्यात येणार आहे. यासाठी आज शुक्रवारपासून (ता. ५ मे १५ जून २०२३) विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहीमेचा लाभ घेण्याचे आवाहन संगमनेर उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने “जत्रा शासकीय योजनांची – सर्वसामान्यांच्या विकासाची” या उपक्रमांचे राज्यात आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत महसूल विभागामार्फत देण्यात येणारे विविध दाखले, प्रमाणपत्र विनासायास उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासाठी विद्यार्थी, नागरिकांनी आपल्या जवळच्या सीएससी केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा (सेतू)…
