Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – उन्हाची तीव्रता सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याने सर्वांगातून घामाच्या धारा वाहत असतांना संगमनेरच्या गीता परिवार संचलित संस्कार बाल भवनच्या शंभरावर मुलांनी जलक्रीडेचा आनंद घेतला. मालपाणी हेल्थ क्लबच्या सहकार्याने यासर्व मुलांना जीव रक्षकांच्या निगराणीत जलतरण तलावात सोडण्यात आले. यावेळी लहान मुलांसाठी असलेल्या स्वतंत्र वर्तुळाकार हौदात बाल भवनमधील सर्वाधीक लहान मुलांची धम्माल अनुभवायला मिळाली. मुलांनी पाण्यात मनसोक्त डूंबण्याचा आनंद घेतला. गीता परिवाराच्यावतीने दरवर्षी उन्हाळ्यात ज्या प्रमाणे संस्कार शिबिरांचे आयोजन होते, त्या धर्तीवर बाल भवनच्या संचालिका अनुराधा मालपाणी यांनी बाल भवनमधील मुलांसाठी वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले आहे. सध्या सुट्ट्यांचा काळ असल्याने बरीच लहान मंडळी पाहुणे म्हणून संगमनेरात आली आहेत. त्यांच्यासह…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शहरातील मोठ्या वर्दळीच्या नवीन नगर रस्त्यावर दुपारी साडेबाराच्या सुमारास एका वृक्षाची धोकादायक फांदी अचानक तुटून रस्त्यावर पडली. फांदी रस्त्यावर पडत असताना तेथून जाणाऱ्या-येणाऱ्याचा अंगावर पडण्याची शक्यता होती. मात्र सतर्कता दाखविल्याने दुर्घटना टळली. शहरातील नवीन नगर रस्त्यावर एका डेरेदार वृक्षाच्या काही धोकादायक फांद्या तुटून रस्त्यावर पडण्याची चिन्हे निर्माण झाली होती. दरम्यान शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारस कडकड करत एक फांदी अचानकपणे तुटून मोठ्या वर्दळीच्या रस्त्यावर पडली. यावेळी रस्त्यावरून नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू होती. फांदी तुटत असताना मोठा आरडाओरडा झालेला येथून लोक बाजूला पळाले. तुटणारी फांदी एका त्वचा की जवळ पडली त्यामुळे दुचाकी चालविणारा वृद्ध गृहस्थ आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज काय ग !!!! कालच तुला खडसावून सांगितले, की बंगल्याच्या भिंतीला पण स्पर्श करायचा नाही… तरी तू आज परत आलीस फुलं मागण्यासाठी ? ती कळकट मळकट फ्रॉक घातलेली ८-९ वर्षांची मुलगी अंत्यत केविलवाणा चेहरा करून करुणेच्या स्वरात आवाजात कापर भरत बोलली ….. ताय, वंजळभरच पायजेती.. द्याकीव. तुमच्या झाडाला हायती बी फुलं म्हणून मागत्या. इथं कुठच येवढी फूलं नायत, फकस्त तुमच्याच बंगल्यात हायत. ती आठ नऊ वर्षांची मुलगी काकुळतीला येऊन अनघाला तिच्या बंगल्यातील मोगऱ्याची फुले मागत होती. अनघा – नाही म्हणून सांगितले ना. निघ इथून. असं म्हणून अनघा बंगल्यात गेली. कुठून कुठून येतात फुलं मागायला. काय फुकट येतात का?…
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पोलिसांनी मोठी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांनी पकडली असून यात 1 कोटी 28 लाख रुपये किमतीचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. गुटख्यासह लाखो रुपये किमतीची दोन वाहने देखील ताब्यात घेण्यात आली आहे. नासिकहून मुंबईच्या दिशेने दोन वाहनांमधून बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती. सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने इगतपुरी जवळील ग्रँड परिवार हॉटेल समोर वाहन पकडण्यासाठी सापळा लावला होता. पोलीस पथकाने संशयित वाहनांची तपासणी केली असता त्यांना दोन्ही वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात बंदी असलेला गुटखा आढळून आला. पोलिसांनी…
समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी (उमाका वृत्तसेवा) – हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याचे २४ जिल्हे जोडले जाणार आहेत. विकासाचा हा महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार असून डिसेंबर २०२३ पर्यंत समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण करण्यात येईल. त्याचबरोबर येत्या काळात राज्यात समृद्धीसारखे अनेक प्रकल्प राज्यात राबविण्यात येतील. राज्यातील सर्व जिल्हे द्रुतगती महामार्गाने जोडण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जेऊर कुंभारी (ता.कोपरगाव) शिर्डी पथकर प्लाझा येथे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर, दि.26 मे (जिमाका वृत्तसेवा) – राज्यातील जनतेच्या हितासाठी राज्य शासनामार्फत अनेक महत्त्वकांक्षी (फ्लॅगशिप )कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या सर्व कार्यक्रमांची प्रशासनाने गतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विविध योजनांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. बैठकीस राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे-पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार प्राजक्त तनपुरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – गुन्हा करण्याच्या उद्देशाने विनापरवाना २१ इंच लांबीची गुप्ती जवळ बाळगणाऱ्या चार जणांना संगमनेर तालुक्यातील शिवारामध्ये वडगाव पान ते तळेगाव रस्त्याच्या पाटावर करुले शिवारात पकडण्यात आले आहे. आरोपी पैकी तिघेजण बुलढाणा जिल्ह्यातील असून एक आरोपी संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील आहे. कैलास अशोक सावंत (वय २४ वर्ष), मारुती बळवंत सावंत (वय ७० वर्ष, दोन्ही रा. मु. गोसिंग गाव, पोस्ट नांदुरा, जि. बुलढाणा), राजू रावसाहेब शिंदे (वय २३ वर्ष, रा. मुंबरा पो. बोरजवळा ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि जितेश भाऊसाहेब गोडे (वय २४ वर्ष, रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर, सर्व हल्ली रा. समनापुर, ता. संगमनेर) अशी आरोपींची…
अनंत पांगारकर (महाराष्ट्र संवाद न्यूज) अहमदनगर जिल्ह्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्यातील वादा संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अहमदनगरमध्ये मोठे भाष्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहमदनगर मध्ये आले असता त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी पत्रकारांनी त्यांना तुमच्या शेजारी बसलेल्या (विखे-शिंदे) दोन नेत्यांमध्ये वाद असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर फडणवीस यांनी मार्मिक उत्तर देत मी त्यांना घेऊन बसलो आहे. वाद असला तरी वादळ नाही, तो चहाच्या पेल्यातला वाद आहे, तो संपलेला आहे… त्यामुळे चिंता करू नका. अशा शब्दात या वादावर भाष्य केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले बघा व्हिडिओ…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अहमदनगर दौऱ्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विकास कामांच्या आढावा बैठकीनंतर फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना यावेळी ते म्हणाले; नाना पटोले आणि संजय राऊत हे बोलघेवडे लोक आहेत. तुम्हाला काम पाहिजेत, म्हणून ते बोलतात. आम्हाला भरपूर काम आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना उत्तर देत नाही. जलजीवन मिशनच्या सगळ्या कामांना केंद्र सरकारने पैसा दिला असला तरी या कामांचे टेंडर हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात निघाले आहे. केंद्र…
(महाराष्ट्र संवाद न्यूज) नाशिक ते शिर्डी महामार्गावर सिन्नरच्या पांगरी गावाजवळ नादुरुस्त झालेल्या व रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बसच्या चालकाने कंबरेच्या करदोऱ्याच्या सहाय्याने बसच्या छताला लटकून फाशी घेतली. राज्य परिवहन महामंडळ नाशिक आगार- १ चे चालक राजू हिरामण ठुबे (वय ४९) असे मयत चालकाचे नाव आहे. बस चालक ठुबे हे शिर्डी येथून नाशिककडे बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिवशाही बस (एमएच – ०९, इएम -१२८०) घेऊन निघाले होते. शिवशाही बस वावी ते पांगरी दरम्यान शिंदेवस्तीजवळ येताच नादुरुस्त झाली. महिला वाहकाने प्रवाशांना अन्य बसमध्ये बसून दिल्यानंतर बस नादुरुस्त झाल्याची माहिती संबंधित आगारांना कळविण्यात आली. त्यानंतर प्रवासी व महिला वाहक दुसरा…
