Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी भागातील जनतेला मिळावे हे स्वप्न ठेवून आपण काम केले. या कामासाठी योगदान दिले. मात्र पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनावेळी योगदान देणारे दूरच मात्र प्रकल्पग्रस्त किंवा साधा कामगारही उपस्थित नव्हता. ही बाब चांगली नाही. मोठ्या प्रयत्नातून मिळालेल्या निळवंडेच्या पाण्यामुळे तालुक्यात आनंदाची दिवाळी होत असून यापुढील काळात हे पाणी सर्वांना मिळेल, यासाठी काम केले जाणार आहे. निळवंडेचे पाणी हा परमेश्वराचा प्रसाद असल्याचे प्रतिपादन निळवंडे धरण व कालव्याचे निर्माते जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. वडगाव पान येथे आयोजित कृतज्ञता सोहळा व जल पूजन कार्यक्रमात थोरात बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, साखर संघाचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राज्यभरातील 15 हजार सरकारी शाळा बंद करून 65 हजारापेक्षा जास्त सरकारी शाळा कंपन्यांना दत्तक देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे गोरगरीब जनतेचे शिक्षण बंद होणार असून हा निर्णय सरकारने मागे घ्यावा यासाठी संगमनेर छात्र भारतीने राज्य सरकारसह शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना काळा आकाश कंदील भेट पाठविला आहे. शुक्रवारी हा आकाश कंदील टपाल खात्यामार्फत पाठविण्यात आला आहे. राज्य सरकारच्या शाळा बंदी निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून सरकारी शाळा बंद झाल्या तर गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाला मुकावे लागणार आहे. शाळा बंद होणे म्हणजे मोफत मिळणारे शिक्षण बंद करण्याचा सरकारचा डाव आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात…
महाराष्ट्र संवाद न्यूज जळगाव – बुधवारी पहाटे संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहातून कोठडीचे गज कापून चार आरोपींनी सिनेस्टाईल पलायन केले होते. या चौघा आरोपींना त्यांच्या दोघा साथीदारांना अहमदनगर एलसीबीच्या पथकाने गुरुवारी दुपारी शेळगाव (ता. जामनेर) येथे एका शेतातून शिताफीने ताब्यात घेतले आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक राजकुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पळालेले चौघेही आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आल्याने त्यांचा पळून जाण्याचा घटनाक्रम आता उलगडणार आहे. बलात्कार, खून, कुणाचा प्रयत्न या सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये कारागृहात असणाऱ्या राहुल देविदास काळे, रमेश थापा, अनिल छबू ढोले आणि मच्छिंद्र मनाजी जाधव या चौघा जणांना इतर कैद्यांसोबत जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. या…
राजहंस दूध संघात वसुबारस निमित्त गाईंचे पूजन महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : शेतीला जोडधंदा असलेल्या दूध व्यवसायाने अनेक शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक विकासाला मोठी बळकटी दिली आहे. संगमनेर तालुक्यातून दररोज सुमारे सात लाख लिटर दुधाची निर्मिती होत असून शेतकऱ्यांच्या जीवनात पशुधनाचे मोठे महत्त्व असल्याचे प्रतिपादन माजी कृषी व महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. राजहंस दूध संघ येथे वसुबारस निमित्त गाईंचे पूजन करण्यात आले. यावेळी समवेत दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर, रामहरी कातोरे, डॉ. तुषार दिघे कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. थोरात म्हणाले, दूध संघाने तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत केली आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळ पडला आहे. मात्र तालुके दुष्काळी जाहीर झाल्याने अशा गावांना त्याचा लाभ मिळणार नाही. अनेक गावे योजनांपासून वंचित राहतील. दुष्काळी भागातील शेतकरी वंचित राहू नये, यासाठी दुष्काळाचे मूल्यमापन करताना तालुक्याऐवजी गाव हा निकष करावा, अशी मागणी नाशिक पदवीधर संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे. डॉ. तांबे म्हणाले, नगर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र येथे दुष्काळ जाहीर झाला नाही. खरिपाची पिके वाया गेली. रब्बीच्या पेरण्यांमध्ये अडचणी आहे. नैसर्गिक आपत्ती, बदलते वातावरण या सगळ्या बाबींमुळे शेतकरी सातत्याने संकटात सापडत आहे. समाजातील महत्त्वाचा घटक असलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्था अपहार प्रकरणी गुन्हा दाखल होऊन तब्बल चार महिन्यांचा कालावधी उलटण्याच्या मार्गावर आहे. मात्र अद्यापही या अपहार प्रकरणातील मुख्य मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे कुठे दडून बसला याचा शोध लागत नसताना त्याचे कुटुंब मात्र अटकपूर्व जामीनासाठी हायकोर्टापर्यंत पोहोचले आहे. भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबियांना संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर आता त्याचे कुटुंब औरंगाबाद हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी पोहोचले आहे. गेल्या आठवड्यात शकुंतला भाऊसाहेब कुटे, विमल भाऊसाहेब कुटे, संदीप भाऊसाहेब कुटे, दादासाहेब भाऊसाहेब कुटे, अमोल भाऊसाहेब कुटे व सोनाली दादासाहेब कुटे यांचा यात समावेश आहे. यांच्या जामीन अर्जावर काय निर्णय होतो यानंतर…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर @ अनंत पांगारकर भल्या पहाटे संगमनेरच्या तुरुंगातील चार आरोपींनी पलायन केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी समोर आल्यानंतर गार्डच्या बंदोबस्तावरील तीन पोलीस कर्मचारी अडचणीत सापडले असतानाच दुसरीकडे जळगाव कारागृहातील कैद्याला भेटू देण्यासाठी दोन हजाराची लाच घेणाऱ्या जेलच्या सुभेदारासह अन्य दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यामुळे बुधवारचा दिवस संगमनेर आणि जळगाव या दोन्ही कारागृहातील गार्डसाठी काळा दिवस ठरला आहे. विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. संगमनेर मध्ये झालेल्या आरोपी पलायन प्रकरणावेळी एक महिला कर्मचारी ड्युटीवर होती. तर जळगावच्या प्रकरणात दोन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जळगाव कारागृहातील कैद्याला भेटू देण्यासाठी जेलच्या सुभेदारासह दोन…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी : कोणतेही शुल्क न आकारता साईबाबा ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन शिर्डीमध्ये शुक्रवारपासून (१० नोव्हेंबर) रोज सायंकाळी लेझर शो सुरू केला जाणार असल्याची माहिती मालपाणी उद्योग समूहाचे संचालक जय मालपाणी यांनी दिली. शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांना दर्शनानंतर काय? हा प्रश्न अनेक वर्षापासून पडत असतो. अशा हजारो भाविकांना सहकुटुंब आनंदाची अनुभूती मिळावी, यासाठी साईबाबा ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन या लेझर शोची निर्मिती करण्यात आली आहे. या लेझर शोचे उद्घाटन शुक्रवारी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जय मालपाणी म्हणाले, रोज सायंकाळी सूर्यास्तानंतर साई तीर्थ थीम पार्कच्या प्रांगणात निशुल्क सादर…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : संगमनेरमधून पोलीस दलाचे नाचक्की करणारी घटना समोर आली आहे. खुनाचा प्रयत्न, खून, पोक्सो, बलात्कार प्रकरणातील चार आरोपींनी शहर पोलीस ठाण्यात असलेल्या उपकारागृहाचे गज कापून पलायन केल्याची धक्कादायक घटना पहाटे घडली आहे. या कोठडीतून आरोपी पळून जाण्याचा हा दुसरा प्रकार आहे. या घटनेमुळे पोलीस आणि तुरुंग प्रशासनाची धावपळ उडाली अजून पळून गेलेल्या चारही आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके त्यांच्या मागावर पाठविण्यात आली. राहुल देविदास काळे, मच्छिंद्र मनाजी जाधव, अनिल छबु ढोले आणि रमेश रोशन दधेल उर्फ थापा असे कोठडीचे गज कापून पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे सर्वजण संगमनेरच्या उपकारागृहात न्यायालयीन कोठडीत बंदिस्त होते.…
संगमनेरमधील महिला वकील सीमा काळे-सातपुते यांना आधारचा “आदर्श समाज भूषण प्रेरणा गौरव” पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे : विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संगमनेर मधील नामांकित महिला वकील सीमा काळे-सातपुते यांचा पिंपरी चिंचवड (पुणे) येथे राष्ट्रीय फिनिक्स गोल्ड स्टार अवार्ड सोहळ्यात “आदर्श समाज भूषण प्रेरणा गौरव” पुरस्काराने नुकताच सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यामध्ये कार्यरत असलेल्या आधार सोशल फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात प्रभावी कामगिरी करणाऱ्यांना या पुरस्काराचे दरवर्षी वितरण करण्यात येते. ॲड. सातपुते-काळे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना आयोजित कार्यक्रमात “आदर्श समाज भूषण प्रेरणा गौरव” पुरस्काराचे अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या मानसकन्या व कल्याणी महिला सेवाभावी संस्थेच्या संस्थापक डॉ. सुनीताताई मोडक, निवृत्त जिल्हा न्यायाधीश रवींद्र कुलकर्णी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर…
