Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई आता ट्रेलर नाही तर गुढीपाडव्याला थेट चित्रपटच दाखविणार, असे संकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्याच्या मेळाव्यात दिले होते. त्यामुळे आज, बुधवारी होणाऱ्या गुढीपाढव्याच्या सभेत राज ठाकरे नेमकी कोणावर तोफ डागणार याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या धर्तीवर राज ठाकरे यांचा गुढी पाडवा मेळावा होत असतो. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याप्रमाणेच या मेळ्याव्याचीही जय्यत तयारी केली जाते. मुंबईसह राज्यभरातील मनसैनिक पदाधिकारी या मेळाव्याला हजेरी लावत असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी हा मेळावा महत्त्वाचा असतो. बुधवारी संध्याकाळी होत असलेल्या या मेळाव्यात राज ठाकरे नेमकी कोणावर टीका करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुका…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशपातळीवरील सहकारासाठी मापदंड ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने सन 2022- 23 या हंगामात 10 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा टप्पा पार केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली आहे. कारखान्यातील चालू हंगामातील ऊस गाळपाबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, मागील वर्षी व यावर्षी कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्रा बाहेर पाऊस चांगला झाल्याने कारखान्याने मागील वर्षाच्या हंगामात 15 लाख 53 हजार मेट्रिक टनाचे उच्चांकी गाळप केले होते. तर यावर्षी सन 2022- 23 या हंगामात आतापर्यंत 10 लाख मेट्रिक टनाचे ऊस गाळप केले आहे. कारखान्याने कार्यक्षमता व अचूकता…
संगमनेर महाराष्ट्र संवाद न्यूज महाराष्ट्र ग्रामीण बँकेपाठोपाठ आता दि नाशिक मर्चटस् को-ऑपरेटीव्ह बँकेच्या संगमनेर शाखेतील ४ कोटी २० लाखाचा सोनेतारण घोटाळा समोर आला आहे. विशेष म्हणजे याही घोटाळ्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील गोल्ड व्हॅल्यूअरसह बँकेचा व्यवस्थापकच सामील असल्याचे पोलीस दप्तरी दाखल झालेल्या तक्रारीवरुन समोर आले आहे. आणखीही काही बँकांमधील सोनेतारण घोटाळे समोर येण्याची चिन्हे असल्याने नागरिकांचा बँकावरील विश्वास उडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. नामको बँकेतील सोनेतारण घोटाळ्यामध्ये तब्बल १३६ खातेदारांनी बनावट सोने बँकेत ठेवून कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. बँकेच्या व्यवस्थापनाला अंधारात ठेवत हा प्रकार घडल्याने बँकांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र बँकेतील घोटाळ्यात काही कर्जदार आणि गोल्ड व्हॅल्युअरला जामिन…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर: शे-दोनशे, हजार-दोन हजार नव्हे तर तब्बल एक लाखाची लाच घेताना नगरच्या सहकारी संस्थेच्या विशेष लेखापरीक्षकासह खाजगी लेखापरीक्षक अँटी करप्शनच्या सापळ्यात अडकला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्याच्या सहकार विभागातील मोठी लाचखोरी समोर आली आहे. किसन दिंगबर सागर, वय ५५, विशेष लेखापरीक्षकाचे व तय्यब वजीर पठाण वय ४८, असे लाखाच्या पटीत लाचखोरी करणाऱ्या खाजगी लेखा परीक्षकाचे नाव आहे. अँटी करप्शनच्या नाशिक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, वाचक पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर अँटी करप्शनचे पोलीस उपाधीक्षक तथा सापळा अधिकारी हरिष खेडकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत केलेली चर्चा यशस्वी ठरली आहे. चर्चेमध्ये यशस्वी तोडगा निघाल्याने मंगळवारपासून संप मागे घेण्याचा निर्णय संपकऱ्यांनी घेतला आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आठवडाभरापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. अधिवेशनात देखील या संपाचे पडसाद उमटले. संपकऱ्यांच्या मागण्यांमध्ये लक्ष घालण्याची मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सभागृहामध्ये केली होती. अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संपकऱ्यांच्या शिष्टमंडळाची आज झालेली चर्चा यशस्वी ठरली. शिष्टमंडळामध्ये संपकऱ्यांच्या वतीने 16 सदस्य होते. येत्या तीन महिन्यांमध्ये सरकार संपकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करेल असे आश्वासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. सरकार संपकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी बुकी अनिल जयसिंघानी याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. त्याला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले आहे. जयसिंघानी पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर आता या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा हिला आधीच पोलिसांनी अटक केलेली आहे. अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षा हिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांच्या लाचेचीही ऑफर दिली होती. तसेच त्यांना टेक्स्ट मेसेज, व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी विरोधात मलबारहिल पोलीस…
महाराष्ट्र संवाद न्यूज पोलीस पाटील गाव पातळीवरील शासन आणि जनतेमधील महत्त्वाचा दुवा आहेत. गाव पातळीवरील प्रशासनाच्या सर्व विभागांचे पोलीस पाटील प्रमुख आहेत. गाव पातळीवर ते सामाजिक न्याय आणि लोक कल्याणकारी राज्याची प्रभावी अंमलबजावणी करू शकतात, असे प्रतिपादन संगमनेर-अकोलेचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी केले. संगमनेर उपविभागातील साठ कामगार पोलीस पाटलांनी आपल्या सेवेचा दहा वर्षाचा कार्यकाळ यशस्वी केल्याबद्दल आयोजित गुणगौरव सोहळ्यात प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे बोलत होते. यावेळी उपविभागीय वन अधिकारी डॉ. संदीप पाटील, उपविभागीय कृषीअधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, प्रशिक्षणार्थी तहसीलदार स्वाती घावटे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, पोलीस निरीक्षक भानुदास मथुरे, नायब तहसीलदार श्रीकांत…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिक्षकांच्या संपामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने शिक्षकांनी शाळेत हजर होऊन सर्व वर्ग चालू करावेत अन्यथा पालकांच्या विनंतीवरून मुलांचे दाखले काढून अन्य खाजगी शाळेत टाकण्याचा इशारा संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द ग्रामपंचायतच्यावतीने संपकरी शिक्षकांना देण्यात आला आहे. ग्रामपंचायतच्या या निर्णयाचे पालकांमधून स्वागत होत आहे. जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यभरातील शासकीय निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा देखील समावेश आहे. १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेलेल्या शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुरू झाले आहे. शाळाच बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे दिसते. गत दोन वर्ष कोरोनामुळे शाळा बंद होत्या. याचा मोठा फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर अचानक मिळालेल्या मंत्रीपदामुळे काही लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे. अधिकाराचा वापर दंडेलशाहीसाठी सुरू आहे. आपल्या राजकीय सुडापोटी जिल्ह्यातील विकासकामे आणि जनतेला वेठीस धरणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, धमक्या आणि दादागिरी संगमनेरमध्ये चालणार नाही. आमच्या शांततेचा अंत बघू नका, तुमच्या दहशतीचे झाकण उडवायला आम्हाला वेळ लागणार नाही, असा सज्जड इशारा माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्र्यांना दिला. थोरात रविवारी संगमनेरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, ‘लोकप्रतिनिधी या नात्याने प्रत्येक आमदाराला काही अधिकार दिलेले आहेत. नगर जिल्ह्यात विद्यमान पालक मंत्र्यांकडून या अधिकारांची पायमल्ली केली जात आहे. लोकप्रतिनिधीला न कळवता परस्पर बैठका घेतल्या जात आहेत, आपल्या चेल्या चपाट्यांना हाताशी धरून…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: काँग्रेस पक्षाला त्याग आणि बलिदानाची परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत या पक्षाचा इतिहास दैदिप्यमान असा राहिला. मात्र पुढील काळात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करावे लागणार असून, महाराष्ट्रात सध्या वातावरण बदलत आहे. काँग्रेस पक्षाबद्दल जनतेत पुन्हा अनुकूलता निर्माण होत असून आगामी काळात पक्ष पुन्हा जोमाने उभारी घेईल, असा विश्वास माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र नागवडे यांची निवड झाल्याबद्दल सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित सत्कार समारंभावेळी आमदार थोरात बोलत होते. यावेळी करण ससाने, महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्ष रूपवते, सचिन गुजर, संपतराव म्हस्के, मधुकरराव नवले, प्रताप शेळके, हेमंत…
