Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क | नाशिक नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर आज मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. विभागातील 2 लाख 62 हजार 678 मतदानापैकी 1 लाख 29 हजार 456 इतके मतदान झाले असून 49.28 टक्के मतदान झाल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (प्रशासन) रमेश काळे यांनी दिली. विभागातील नाशिक जिल्ह्यात एकूण 69 हजार 652 मतदारापैंकी 31 हजार 933 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून नाशिक जिल्ह्यात 45.85 टक्के मतदान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 1 लाख 15 हजार 638 मतदारापैंकी 58 हजार 283 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून अहमदनगर जिल्ह्यात 50.40…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क | अहमदनगर नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यात सोमवारी सरासरी ५०.४० टक्के मतदान झाले असल्याची माहिती अहमदनगर निवडणूक शाखेतर्फे देण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील संगमनेरमध्ये एका मतदान केंद्रावर आल्या असता त्या मतदारांना हात जोडत असताना संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी त्यांना प्रचारापासून रोखण्याचा प्रकार समोर आला आहे. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघासाठी अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र मतदान प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत पार पडली असल्याचे सांगण्यात आले. स्थानिक भूमिपुत्र असलेल्या अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्यामध्ये प्रमुख लढत झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील १४७…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क | संगमनेर ऊस तोडणी सुरू असताना उसाच्या शेतामध्ये बिबट्याची दोन बछडी आढळून आली आहेत. संगमनेर शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर असून मानवावर बिबट्याने हल्ला करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील खळी या गावात साहेबराव तांबे या शेतकऱ्याच्या उसामध्ये बिबट्याचे दोन बछडे आढळून आले आहे. ऊसतोड सुरू असताना हे बछडे आढळल्याने या ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याने घबराट निर्माण झाली आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. खळी गावच्या शिवारामध्ये साहेबराव तांबे यांनी ऊस लागवड केले आहे. रविवारी सकाळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे ऊस तोडणी कामगार ऊस तोड करत असताना उसामध्ये आवाजासह…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क | अहमदनगर गो मातेच्‍या संरक्षण आणि संवर्धन चळवळीला बळकटी देण्‍यासाठी केंद्र सरकारच्‍या धर्तीवर राज्‍यातही गोसेवा आयोगाची स्‍थापना करण्‍यासाठी सरकार सकारात्‍मक असून लवकरच या बाबतीतील निर्णय घेणार असल्‍याची माहीती पशुसंवर्धन आणि दूग्‍धविकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. गो विज्ञान संशोधन संस्‍था पुणे, दादरा नगर हवेली मुक्‍ती संग्राम समिती आणि गो सेवा समिती अहमदनगर यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने श्रध्‍देय मोरोपंत पिंगळे गो सेवा पुरस्‍कार २०२३ चे वितरण मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले. राष्‍ट्रीय स्‍वंयसेवक संघाचे पश्चिम विभागाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, भारतीय किसान संघाचे दादा लाड, गो विज्ञान संशोधन संस्‍थेचे राजेंद्र लुंकड, दादरा नगर हवेली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क | पंढरपूर / अकोले अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे, उपाध्यक्षपदी ना. नरेंद्र पाटील तर सरचिटणीसपदी प्रकाश देशमुख यांची निवड करण्यात आली. पंढरपूर येथे अखिल भारतीय मराठा महासंघ सर्वसाधारण सभेत महासंघाच्या २०२२ ते २५ या सालाकरिता नविन कार्यकारिणी निवड करण्यात आली. निवड निर्णय अधिकारी अँड. प्रविण गोगावले हे होते. त्यांनी घोषित केलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे : कार्यकारणी अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, विभागीय उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष ना. नरेंद्र अण्णासाहेब पाटील, सरचिटणीस प्रकाश वसंतराव देशमुख, कोषाध्यक्ष प्रमोद बळवंत जाधव, विभागीय चिटणीस अतिश गायकवाड निवडणूक प्रक्रियेस अखिल भारतीय मराठा महासंघाचे माजी अध्यक्ष शशिकांत पवार…

Read More

रविवार विशेष 🔸प्रवीण पुरो राज्य भाजपचे सवेसर्वा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्फूर्त खोटारडेपणाची सार्‍यांना आता चांगली जाणीव होऊ लागली आहे. फडणवीस कधीही कशाचीही सरमिसळ करू शकतात. असलेल्या बाबी नसल्याची आणि नसलेल्या घटना घडल्याचीही टेप सहज वाजवू शकतात. म्हणजे होत्याचं नव्हतं करण्याचा त्यांचा हातखंडा आहे, हे पुन्हा एकदा सिध्द झालंय.  अशीच एक टेप त्यांनी नुकतीच दिल्लीत असताना पत्रकारांपुढे वाजवली. ती होती महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नव्या कस्टडीची. फडणवीसांमुळे राज्यातल्या जनतेला कळलं की राज्यपाल नावाच्या संविधानिक व्यक्तीच्या कागदपत्रांची कस्टडी स्वतंत्र आहे ते. या भयानक खोटं बोलण्याच्या कृतीचं कौतुक करायचं तर लोकं कौतुक करणार्‍यालाच मुर्खात काढतील. तुम्ही काय त्यांच्या नादी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क | संगमनेर संगमनेर शहर पोलिसांनी दोन पिकअप वाहनांवर केलेल्या कारवाई सुमारे सव्वा आठ लाख रुपयांचा मुद्देमात हस्तगत केला आहे. ६ जिवंत गोवंश जनावरांसह सुमारे दोन लाख रुपयांच्या गोमांसाचा यात समावेश आहे. राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असला तरी देखील संगमनेरमध्ये मात्र या कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन सुरूच आहे. याला स्थानिक पोलिसांचे देखील पाठबळ मिळत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे शेकडोने टाकलेल्या छाप्यानंतर देखील येथील बेकायदा कत्तलखाने अद्याप बंद झालेले नाहीत. वारंवार टाकले जाणारे छापे आणि या छाप्यामध्ये निष्पन्न होणारे तेच तेच आरोपी यामुळे पोलिसांची कार्यपद्धतीच संशयास्पद बनली आहे. प्रत्येक कारवाईमध्ये आरोपी फरार असल्याचे दाखविले जाते. त्यामुळे पोलीस अशा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क  नाशिक / अहमदनगर  नाशिक पदवीधर मतदार संघासाठीच्या जाहीर प्रचाराचा तोफा शनिवारी संध्याकाळी पाच वाजता थंडावल्या आहे. पदवीधर साठी येत्या सोमवारी (ता.३०) तारखेला नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात मतदान होत आहे. निवडणूक प्रचारामध्ये सोशल मीडियाचा यावेळी मोठा बोलबाला दिसून आला. काही माध्यमातील एकतर्फी बातम्या पदवीधरांनी फारशा गांभीर्याने घेतल्या नसल्याचे दिसून आले. पेड नावाचा विकृतीचा राक्षस याही निवडणुकीत दिसून आल्याच्या भावना मतदारांनी व्यक्त केल्या. सोशल माध्यमातून अनेक पदवीधरांनी आपली भूमिका जाहीरपणे व्यक्त केली. या निवडणुकीतील मतदार हा संपूर्णतः सुशिक्षित आणि पदवीधर असल्याने चांगल्या-वाईटाची जाण या मतदारांमध्ये दिसून आली. नाशिक पदवीधर मतदार संघामध्ये 16 उमेदवार आपले नशीब आजमावत असले तरी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क | पुणे पुण्याच्या न्यायालयाने शुक्रवारी एक महत्त्वाचा निवाडा केला आहे. मोहसीन शेख या तरुणाची हत्या केल्याच्या आरोपातून हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई व संघटनेच्या २० जणांची निर्दाेष सुटका केली. सोशल मिडियावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. तेव्हा धनंजय देसाईने चिथावणीखोर भाषण केले होते. त्यानंतर शेख हा त्याचा भाऊ व मित्रांसह हडपसर येथील एका मशिदीत जात होता. तेथे बाईकवरून काहीजण आले. शेखच्या डोक्यावर टोपी होती. एवढ्या एका कारणावरुन शेख व त्याच्या मित्रांवर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. शेखला बॅटने मारहाण झाली. या मारहाणीत शेखचा मृत्यू झाला. हडपसर येथे २ जून २०१४ रोजी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : देशाच्या सुरक्षेसाठी ज्याप्रमाणे लष्कराचे जवान प्राणाची बाजी लावतात, त्याचप्रमाणे औद्योगिक सुरक्षा व्यवस्थाही अत्यंत महत्त्वाची असते. सुरक्षा विभागाच्या अचूक कामगिरीमुळे उद्योगधंदे, कारखाने सुरक्षित राहून प्रगती करु शकतात. त्यामुळे दरवर्षी प्रजासत्ताक दिनी मालपाणी उद्योग समूहातील सुरक्षा जवानांचा विशेष सन्मान करण्याची पद्धत आपण जोपासली. आजच्या दिवशी आपण देशातील सुरक्षा यंत्रणांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतांनाच आपला देश प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प केला पाहिजे, असे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे संचालक जय मालपाणी यांनी केले. प्रजासत्ताक दिनी मालपाणी इंडस्ट्रियल पार्कमध्ये त्यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यवस्थापक रमेश घोलप, मानव संसाधन विभागाचे प्रमुख शिवाजी आहेर, उत्पादन विभागाचे प्रमुख…

Read More