Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : पावसाळ्यात झालेल्या जास्तीच्या पावसामुळे स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिराकडे जाणाऱ्या पुलाच्या पायाच्या स्लॅबचा राफ्ट तुटल्यामुळे म्हाळुंगी नदीवरील पूल खचला आहे. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी या पुलाच्या नवीन उभारणीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यांच्या माध्यमातून लवकरच या पुलाची उभारणी केली जाणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी दिली. विकासातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहरात अनेक मोठमोठे विकास कामे मार्गी लागली असून गेल्या काही वर्षात या शहराने जलदरीत्या विकासाचे शिखर गाठले आहे. थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरात अनेक विकासाच्या योजना राबवल्या गेल्या. मोठमोठ्या वैभवशाली इमारतींसह हायटेक बसस्थानक हे शहराचे वैशिष्ट्य…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : स्नेहालय संचलित रेडिओ नगर ९०.४ एफएमचा १३ जानेवारीला१२ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्या निमित्ताने रेडिओ उद्धघोषक स्पर्धा (RJ कॉन्टेस्ट) आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तीन गटांमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ९०११११२३९० या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावयाचा आहे. स्पर्धकांना रेडिओ नगर केंद्रावर आल्यानंतर दोन ते तीन मिनिटात स्क्रिप्टचे वाचन सादर करावयाचे आहे. स्पर्धेचा निकाल १३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाणार असून विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. विजेत्यांसाठी रेडिओवर स्पेशल शो आयोजित करण्यात येईल.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : संगमनेर शहरातील मंगेश सुरेश घुले या वाळूतस्कराला एक वर्षासाठी प्रांताधिकारी नगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. तसे आदेश प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी काढले आहे. यापूर्वी प्रांताधिकार्यांनी दोघा तस्करांचे हद्दपारीचे आदेश काढले होते, त्यात आणखी एकाची भर पडली आहे. मंगेश घुले यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. वाळू तस्करी करणाऱ्या घुले याच्या विरोधात शहर पोलिसांमार्फत हद्दपारचा प्रस्ताव प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्याकडे दाखल करण्यात आला होता. प्राथमिक चौकशीसाठी प्रांताधिकार्यांनी पोलीस उपाधीक्षकांना आदेश दिले होते. पोलीस उपाधीक्षकांनी आपला चौकशी अहवाल प्रांताधिकाऱ्यांकडे सादर करत घुले याला दोन वर्षासाठी नगर, नाशिक व पुणे या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : चोऱ्या, घरफोडी, दरोडे आणि खुनापाठोपाठ आता संगमनेरमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमधील डिझेलची देखील चोरी सुरू झाली आहे. नासिक-पुणे महामार्गावर सायखिंडी शिवारात उभ्या असलेल्या एका ट्रकच्या डिझेल टाकीतून अडीचशे लिटर डिझेल अज्ञात चोरट्याने काढून नेण्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात अमोल भाऊसाहेब गायकवाड राहणार सायखिंडी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध गुन्ह्यांचा तपास लावण्यात अपयशी ठरलेल्या शहर पोलिसांना नव्या वर्षात आता वाहनांतील डिझेल चोरांचा देखील शोध घ्यावा लागणार आहे. गायकवाड यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी (४ जानेवारी) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास नासिक-पुणे महामार्गावरील…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अकोले : दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याचा प्रकार अकोले तालुक्यात समोर आला आहे. यासंदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात अकोले आणि राजुर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस या गायब झालेल्या मुलींचा शोध घेत आहेत. अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका कापड दुकानात काम करणारी अल्पवयीन मुलगी अनपेक्षितरित्या गायब झाली आहे. तर राजुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावातील मंदिरामध्ये हरिपाठासाठी गेलेली अल्पवयीन मुलगी गायब झाल्याची तक्रार पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. दोन दिवसात तालुक्यातून दोन अल्पवयीन मुली गायब झाल्याने व त्यांना अज्ञात व्यक्तीने पळविले असल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केल्यामुळे अकोले तालुक्यात खळबळ उडाली आहे. या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये संगमनेरच्या श्री दिगंबर गणेश सराफ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. इयत्ता पाचवीमधील चौदा तर इयत्ता आठवीमधील चार विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश असल्याची माहिती विद्यालयाच्यावतीने देण्यात आली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेचा राज्य व जिल्हा पात्र विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला असून सर्वच्या सर्व अठरा विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत. यामध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी नील अमोल गायकवाड यांने ११ वा क्रमांक, नमिता मंगेश सांगळे हिने २६ वा क्रमांक, श्रद्धा योगेश दुर्गुडे हिने ३८ वा क्रमांक, दीपज्योत प्रदीप शेळके याने जिल्ह्यात ४७ वा क्रमांक, संस्कृती संदीप भोर हिने ५८…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेअंतर्गत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. संस्कार सचिन कडाळे (इयत्ता पाचवी), अनिष कैलास नेहे, प्रतीक्षा दत्तात्रेय गुंजाळ, निकिता रावसाहेब नेहे व साहिल राजेंद्र साळुंके (इयत्ता आठवी) अशी गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहे. हे पाचही विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरल्याची माहिती देण्यात आली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अंतर्गत दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. शिष्यवृत्ती परीक्षेचा (२०२२) निकाल नुकताच जाहीर झाला असून यात चंदनेश्वर विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले असल्याने या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने दिले जाणारे २०२१ चे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. पुरस्कारार्थीमध्ये संगमनेरमधील लेखक हिरालाल पगडाल यांच्या इलेक्शन बिलेक्शन या पुस्तकाचा देखील समावेश आहे. यामुळे साहित्य क्षेत्रात संगमनेरचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे. इलेक्शन बिलेक्शन, जगणं विकणाऱ्या माणसांच्या कविता, धगधगते तळघळ, रानजुई, नवरत्न, वळण वाटा या पुस्तकांचा राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कारात समावेश आहे. पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये मान्यवरांच्या हस्ते या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण केले जाणार असल्याची घोषणा शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केली. पुरोगामी विचारांच्या आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन असलेल्या शब्दगंध साहित्य परिषदेच्यावतीने लेखक, कवी यांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांची जयंती 6 जानेवारीला साजरी होत आहे. या दिवशी नगरमध्ये अहमदनगर प्रेस क्लबच्यावतीने पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने विविध दैनिकांमध्ये कार्यरत असणार्या पत्रकारांना यावर्षीचा ‘उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय पत्रकारीता क्षेत्रात मोलाची कामगीरी बजावणार्या पत्रकारांना पत्रकारितेतील मान्यवरांच्या नावाने यावर्षीपासून स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आले असून हे पुरस्कार दरवर्षी दिले जाणार असल्याची माहिती अहमदनगर प्रेस क्बचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी दिली. अहमदनगर प्रेस क्लबच्या कार्यकारीणीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणार्या प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणार्या पुरस्कारांबद्दल चर्चा करण्यात आली व…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आपसातील जागेचे वाद आणि सलूनचे दुकान तोडल्याच्या कारणावरून दोन कुटुंबीयांमध्ये मंगळवारी सकाळी जोरदार वाद झाले. पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेल्या या वादामध्ये दोन्ही कुटुंबीयातील बावीस जणांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे हा प्रकार घडला. यासंदर्भात दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत. राजेंद्र यादव सस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते गावी गेलेले असताना जनार्दन गोविंद गुंजाळ, संदीप चंद्रभान गुंजाळ, दत्तू तुकाराम गुंजाळ, विलास तुकाराम गुंजाळ, भानुदास देवराम गुंजाळ, बादशहा गोविंद गुंजाळ, बाबासाहेब गोविंद गुंजाळ, सचिन बादशहा गुंजाळ, अमोल भानुदास गुंजाळ, संकेत बाबासाहेब गुंजाळ, शुभम बाबासाहेब गुंजाळ, नितीन…
