Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक : नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त रमेश काळे यांनी दिली आहे. हे आहेत  उमेदवार : रतन कचरु बनसोडे (वंचित बहुजन आघाडी), सुरेश भिमराव पवार (नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी), यांच्यासह अनिल शांताराम तेजा, अन्सारी रईस अहमद अब्दुल कादीर, अविनाश महादू माळी, इरफान मो इसहाक, ईश्वर उखा पाटील, बाळासाहेब रामनाथ घोरपडे, ॲड. जुबेर नासिर शेख, ॲड.सुभाष राजाराम जंगले, सत्यजित सुधीर तांबे, नितीन नारायण सरोदे, पोपट सिताराम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : मारुती व्हॅनमधून आलेल्या चौघा तोतया पोलिसांनी रोकड रकमेसह टेम्पो लांबविण्याची घटना शहरालगतच्या नाशिक पुणे बाह्यवळण मार्गावर घडली आहे. थेट पोलीस असल्याची बतावणी करत टेम्पो लांबवल्याने संगमनेरमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. या संदर्भात मुंबई येथील शामू रज्जु गौड याने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात चार अनोळखी भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पो चालक गौड हा १२ जानेवारीला पुणे येथून टेम्पोमध्ये टिशू पेपरचा माल घेऊन नाशिक येथे जात होता. संगमनेरच्या पावसा येथील टोल नाक्यावर चहापाणी घेऊन तो नाशिकच्या दिशेने सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या दरम्यान मार्गस्थ झाला असताना बाह्यवळण रस्त्यावर मालपाणी तंबाखू कारखान्याजवळ पिवळ्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : सिन्नर येथील उडान फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय बालशौर्य पुरस्कार संगमनेरच्या आर्या सुनील नवले हिला प्राप्त झाला. एका जीवघेण्या अपघातात समयसूचकता व धाडस दाखवत आपल्या आईचे प्राण आर्या नवले हिने वाचवले होते. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सिन्नर येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सिन्नर नगरपालिकेच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात झालेल्या सोहळ्यात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक ऐश्वर्य पाटेकर व नाशिक येथील जीवन मार्गदर्शक व्याख्यात्या नीता अरोरा यांच्या हस्ते आर्या नवले हिला ‘बालशौर्य पुरस्कार २०२२’ प्रदान करण्यात आला. नाशिक जिल्हा बाल विकास मंडळाचे न्यायाधीश गणेश…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे, असे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर देखील उमेदवारी अर्ज दाखल न करणाऱ्या आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे यासंदर्भात आमदार तांबे यांनी एका ट्विटद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. नाशिक पदवीधर मतदार संघात महा विकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाने विद्यमान आमदार तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता सत्यजित तांबे यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने उमेदवारी देऊनही उमेदवारी अर्ज दाखल न करणाऱ्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेसच्या शिस्त विषयक समितीने निलंबनाची कारवाई केली आहे. तांबे यांनी उमेदवारी अर्ज का भरला नाही याची चौकशी होईपर्यंत राहणार आहे. नाशिक पदवीधर मतदार संघातील उमेदवारी, बंडखोरी आणि त्यानंतरच्या घडामोडींमुळे या मतदारसंघासोबत राज्यातील राजकारण आता चांगलच तापलं आहे. या मतदारसंघातून काँग्रेस आणि महाविकास आघाडीने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी गेलेल्या डॉ. तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केलाच नाही. उलट त्यांचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : पुरोगामी विचारांचे पाईक, जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा वाढदिवस १७ जानेवारीला आहे. पुस्तक प्रेमी असलेले तांबे यांचा वाढदिवस पुस्तक मैत्री दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. तांबे यांच्या वाढदिवशी कोणत्याही प्रकारचे हार तुरे न आणता सामाजिक जाणीवेतून नागरिक व कार्यकर्त्यांनी पुस्तके भेट देऊन हा दिवस पुस्तक मैत्री दिन म्हणून वाढदिवस साजरा करण्याचे आवाहन जयहिंद युवा मंचच्यावतीने करण्यात आले आहे. संगमनेरचे नगराध्यक्ष, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष, विधान परिषद गटनेते अशा विविध जबाबदाऱ्या पार पडत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार असलेल्या तांबे यांच्या नेतृत्वात, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : घराच्या पोर्चमधून चार वर्षाच्या चिमुकल्याला आपल्या जबड्यात पकडत ओढून नेणाऱ्या बिबट्याच्या तावडीतून आपल्या जीवावर उदार होत आईने या चिमुकल्याची सुटका केली. समोर साक्षात बिबट्या असताना मातेने चिमुकल्याला मृत्यूच्या दाढेतून परत आणले. संगमनेर शहरालगतचा गुंजाळवाडी मधील देशमुख नगरमध्ये शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. जखमी असलेल्या चिमुकल्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला आहे. लोकवस्तीत आलेले हे बिबटे आता माणसांवर देखील हल्ले करत आहेत. त्यामुळे माणसांवर हल्ले करणारे बिबटे पकडण्याचे आव्हान वनविभागासमोर आहे. देशमुख नगरमध्ये सिमेंट पोल फॅक्टरी जवळ असलेल्या कृष्णाई बिल्डिंगच्या पाठीमागील भागात मोठ्या प्रमाणात बाभळीची झाडे वाढले आहेत.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : ‘कुस्तीत दोन मिनिटात खेळ संपतो, परंतु राजकारणात निष्ठा महत्त्वाची असते, दोन दशकात कमावलेले नाव तुम्ही दोन मिनटात गमावले. आम्हा तरुणांना भुलवून आमची फसवणूक केली’ अशी टीका नाशिक पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर नेटकऱ्यांनी केली आहे. महाराष्ट्र केसरीच्या अभिनंदनच्या ट्विटर पोस्टमुळे सोशल मीडियावर सत्यजित तांबे यांना महाराष्ट्रातील युवकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे. याबाबतची माहिती अशी की शनिवारी पुण्यामध्ये कुस्ती स्पर्धा झाली त्या स्पर्धेतील विजेत्या मल्लाचे अभिनंदन करताना सत्तेत तांबे यांनी ट्विटरवर “वाह रे पठ्ठ्या ! पहिल्या दोन मिनिटांतच खेळ एकतर्फी करून महाराष्ट्र केसरी मिळवणाऱ्या शिवराज राक्षेचे खूप खूप अभिनंदन!…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिर्डी : नाशिक पदवीधर मतदार संघातील बंडखोरीवरून कॉंग्रेसमध्‍ये सुरु असलेल्‍या घडामोडींबाबत निष्ठा आणि इतर बाबतीत ज्ञान पाजळणाऱ्या आमदार बाळासाहेब थोरातांनीच आता खुलासा करण्‍याची गरज असल्‍याचे मत महसूल मंत्री ना. राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केले. उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रविवारी शिर्डी विमानतळावर तिळगुळ देवून महसूल मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी स्‍वागत केले. पदवीधर निवडणूकीच्‍या पार्श्‍वभूमीवर या दोघांमध्‍ये झालेल्‍या गुप्‍त चर्चेने निवडणूकीतील सस्‍पेन्‍स अधिकच वाढला आहे.  बीड येथील एका कार्यक्रमास जाण्‍यासाठी उपमुख्‍यमंत्री फडणवीस शिर्डी विमानतळावर १० मिनिट थांबले होते. या दरम्‍यान पालकमंत्री विखे पाटील यांनी त्‍यांचे स्‍वागत केले आणि मकर संक्रांतीच्‍या पार्श्‍वभूमीवर तिळगुळ देवून शुभेच्‍छा दिल्‍या. भाजपाचे…

Read More

रविवार विशेष : प्रवीण पुरो महाविकास आघाडीचं सरकार पाडल्यानंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या अस्तित्वाच्या घटका आणखी जवळ येऊ लागल्यात. सरकार पडणं आणि नवं सरकार बसवणं या बाबी संविधानाच्या चाकोरीतील असल्या तरी संविधानाला कसंही वाकवता येईल, हे मनसुबे नेहमीच चालतात असं नाही. यामुळेच अनाधिकाराने सरकार घालवण्याची कृती ही घटनाबाह्य ठरते. आपल्या अस्तित्वाचे दावे करणार्‍यांना आता आपल्या कृतीचा पश्‍चाताप होईल, अशी सारी परिस्थिती आहे. संविधानाला आव्हान देणार्‍या अशा घटना लपवणं आता कोणालाच शक्य नाही. याकरताच विलंबाचा आधार घेतला जातो. गैरमार्ग अवलंबल्याने शिंदे सरकारच्या अस्तित्वाला धोका होताच. पण तो सातत्याने पुढे सरकत असल्याने सरकार वाचवण्याचे प्रयत्न होतात की काय, अशा शंकांनी जोर धरला…

Read More