Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: काँग्रेस पक्षाला त्याग आणि बलिदानाची परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत या पक्षाचा इतिहास दैदिप्यमान असा राहिला. मात्र पुढील काळात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करावे लागणार असून, महाराष्ट्रात सध्या वातावरण बदलत आहे. काँग्रेस पक्षाबद्दल जनतेत पुन्हा अनुकूलता निर्माण होत असून आगामी काळात पक्ष पुन्हा जोमाने उभारी घेईल, असा विश्वास माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र नागवडे यांची निवड झाल्याबद्दल सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित सत्कार समारंभावेळी आमदार थोरात बोलत होते. यावेळी करण ससाने, महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्ष रूपवते, सचिन गुजर, संपतराव म्हस्के, मधुकरराव नवले, प्रताप शेळके, हेमंत…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: संस्था आणि बँकेच्या व्यवहारावरून संगमनेरमध्ये एका डॉक्टरला चौघा जणांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार शहरातील लिंक रोड भागात घडला असून या मारहाणीत डॉक्टरच्या पायाच्या गुडघा फ्रॅक्चर झाला आहे. संबंधित डॉक्टरवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत खोपट (ठाणे) येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. वसीम करीम तांबोळी यांनी उपचारादरम्यान संगमनेर शहर पोलीस ठाण्यात रईश अहमद शेख बेपारी, अदनान मन्सूर बेपारी, जुबेर आयुब सय्यद आणि फिरोज गुलाब बागवान यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांबोळी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे कुटुंबीय समनापुर येथे राहत असून त्यांच्या वडिलांनी अलाईड एज्युकेशन सोसायटी समनापुर अंतर्गत नॅशनल इंग्लिश स्कूल…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी: राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज राहाता तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जात अवकाळी पाऊस व गारपीटीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. महसूलमंत्र्यांनी यावेळी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. राहाता तालुक्यातील ममदापूर, राजुरी या गावातील द्राक्षे, डाळिंब, गहू, कांदा या शेती पिकांची त्यांनी पाहणी केली. या दौऱ्यात शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, मंडलाधिकारी ठाकरे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेल्या नव्या पोलीस निरीक्षकांना खात्रीशीर माहिती मिळाली आणि त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी छापा टाकण्यासाठी पाठविले. पथकाने छापा टाकला आणि साडेआठशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला. आरोपी विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना घुलेवाडी गावामध्ये महात्मा फुले शाळेजवळ एका टपरीच्या आडोशाला एक व्यक्ती मटक्याचे आकडे घेत असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षकांनी याची माहिती पोलीस कर्मचारी रामकिसन मुकरे, आरवडे, खताळ यांना देत छापा टाकण्याचे आदेश दिले. पथकाने घुलेवाडीतील महात्मा फुले शाळेजवळ एका टपरीच्या आडोशाला छापा टाकला असता तेथे दत्ता वसंत जाधव नावाचा एक इसम पांढऱ्या…
रविवार विशेष ☆ प्रवीण पुरो देशभरात न्याय विकला जात असताना, साऱ्या सरकारी यंत्रणा एका पक्षाच्या बटिक बनल्या असताना चंद्रचूड साहेब आपण सत्तांध झालेल्या भाजपला आणि त्यांच्यासाठी इमान विकलेल्या माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सुनावलेल्या खड्या बोलाचे उभा महाराष्ट्र तुमचे खुलेआम कौतुक करतो आहे. महाराष्ट्राला बदनामीच्या खायित लोटणाऱ्या भाजपेयींच्या काळ्या उद्योगाला आपण वेळीच ठोकून काढलंत याबद्दल आपलं करावं तितकं कौतुक कमीच. राज्यात भाजपची सत्ता यावी, यासाठी संविधान गुंडाळून ठेवलेल्या राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राजभवनाला भाजपचा अड्डा बनवला होता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पायउतार करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. पण अखेरपर्यंत त्यांना यश आलं नाही. अखेर त्यांनी एकनाथ शिंदे यांना फोडून सत्तेला सुरुंग…
महाराष्ट्र संवाद न्यूज शनिवारी दुपारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोराच्या गारपिटीमुळे संगमनेर तालुक्यात बहुतांशी भागात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तलाठी व कृषी सहाय्यक आपला संपातील सहभाग कायम ठेवून करणार असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. शनिवारी दुपारी संगमनेर तालुक्यात बहुतांशी ठिकाणी जोराचा अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाली. यामुळे तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय, निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले होते. नुकसानीचे पंचनामे करण्याचा विषय संवेदनशील असल्याने तलाठी व कृषी सहाय्यकांनी सक्रिय पंचनामे करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तलाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: जलजीवन मिशनची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. यामध्ये कुठेही शासनाची बदनामी होणार नाही याची दक्षता गावपातळीवरील कार्यकर्त्यांसह ठेकेदारांनी घेतली पाहीजे. शासनाच्या निधीतून काम करणाऱ्या ठेकेदारांनी आपण योजनेचे मालक असल्यासारखे वागू नका, अशा कडक शब्दात महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आढावा बैठकीत सुनावले. जलजीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संगमनेर-अकोले तालुक्यातील सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पाणी पुरवठा विभाग आणि जिल्हा परीषदेच्या कार्यकारी अभियंत्यांसह तहसिलदार, गटविकास अधिकारी, माजी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील पुणे – नाशिक महामार्गावर असणाऱ्या चंदनापुरी घाटापासून ते पठार भागातील साकुर आणि वरुडी फाट्यापर्यंत आज दुपारी जोरदार गारपीट झाली आहे. गारपीट आणि पाऊस यामुळे शेतीचे देखील नुकसान झाले आहे. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक या भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर अचानक पावसाबरोबर गाराही पडू लागल्या. या गारा इतक्या मोठ्या प्रमाणावर पडल्या की काही काळ महामार्गावर स्नो फॉल झाल्यानंतर रस्त्यावर जसे बर्फ असते तसेच स्वरूप आले होते. गारांचा सडा पुणे- नाशिक महामार्गावर पडला होता. काही काळ महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. या भागात टोमॅटो पिकाचे मोठे उत्पादन घेतले जाते. याच भागात ही प्रचंड गारपीट…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर वेळे अगोदर उसाचा गळीत हंगाम सुरू केल्याप्रकरणी आमदार रोहित पवार यांच्या इंदापूर तालुक्यातील शेटफळ येथील बारामती ॲग्रो कारखान्याच्या संचालकाविरोधात प्रादेशिक उपसंचालक (साखर) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आमदार शिंदे यांनी यासंदर्भात विधान परिषदेमध्ये लक्षवेधीच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केला होता. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत- जामखेड मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि याच मतदारसंघातील विधान परिषदेचे भाजप आमदार राम शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा पेटला असल्याचे दिसते. कर्जत जामखेड मतदार संघात गेल्या निवडणुकीत माजी मंत्री व भाजप उमेदवार राम शिंदे यांचा पराभव करून रोहित पवार आमदार झाले होते. तेव्हापासून या दोघांमध्ये संघर्षाचे वातावरण बघायला…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: कोल्हार घोटी राज्यमार्गावर संगमनेर शहरा नजीकच्या मंगळापुर शिवारातील बर्फ कारखान्याजवळ दोन दुचाकी आणि दुधाच्या टँकरच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये तिघा तरुण मित्रांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातातील तरुण चिखली गावचे असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात ऋषिकेश उमाजी हासे (वय २०), सुयोग बाळासाहेब हासे (वय २०), निलेश बाळासाहेब सिनारे (वय २६) या तिघा मित्रांचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या संदीप भाऊसाहेब केरे (वय ३२) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी रात्री साडेआठ पावणे नऊ वाजण्याच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला. दोन दुचाकीवरून ऋषिकेश उमाजी…
