Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिकच्या शिंदे-पळसे टोल नाक्यावरील एसटी बसची थरारक दुर्घटना ताजी असतानाच शुक्रवारी सिन्नरच्या मोहदरी घाटात तीन वाहनांच्या विचित्र अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातातील मृतक महाविद्यालयीन विद्यार्थी असून ते नाशिकच्या नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत होते. मिळालेल्या माहितीनुसार आठ-नऊ विद्यार्थी स्विफ्ट कारने एका मित्राच्या विवाह सोहळ्यानिमित्त संगमनेरला आले होते. विवाह सोहळा आटोपून सायंकाळच्या वेळी ते पुन्हा नाशिकला परतत असताना सिन्नरच्या मोहदरी घाटामध्ये गणपती मंदिराजवळ त्यांच्या कारचा टायर अचानक फुटला. कार विरुद्ध दिशेला जात डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या लेनवर जाऊन समोरून येणाऱ्या इनोव्हा आणि स्विफ्ट जाऊन धडकली. त्यामुळे विचित्र पद्धतीने झालेल्या तीन वाहनांच्या अपघातात पाच जणांचा मृत्यू…

Read More

समृद्धी महामार्ग राज्याच्या समृद्धीची भाग्यरेषा महाराष्ट्र संवाद न्यूज महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे रविवारी (ता.११ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी घेतला. नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान मोदी मेट्रो ट्रेन आणि समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार आहेत. पंतप्रधानांच्या उपस्थित होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यात भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर मेट्रो टप्पा दोन आणि नाग नदी प्रदुषण नियंत्रण प्रकल्पाला मंजूरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यासाठीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज महाराष्ट्राच्या अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह राज्यातील महापुरुषांचा वारंवार अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केंद्र सरकारने तातडीने कार्यमुक्त करावे, या मागणीसाठी शुक्रवारी संगमनेर शहर व तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सह्यांची मोहीम उघडली आहे. बस स्थानक चौकात एका भल्या मोठ्या फ्लेक्स बोर्डवर ही सह्यांची मोहीम सुरू आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महापुरुषांविषयी वारंवार अवमानकारक वक्तव्य करत आहे. राज्य त्यांच्या विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झालेले असताना केंद्र सरकारकडून त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. राज्यातील सत्ताधारी देखील त्यांची पाठराखण होईल अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत. विरोधी पक्षाने देखील त्यांना केंद्र सरकारने परत बोलावून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पहाटेच्या सुमारास घरात घुसलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ८० वर्षीय वयोवृद्ध गंभीर जखमी झाला. उपचारासाठी या वयोवृद्ध व्यक्तीला नाशिकला हलविण्यात आले आहे. अकोले तालुक्यातील निंब्रळ येथील तिटमे वस्ती शिवारात ही घटना घडली. निवृत्ती सयाजी उघडे असे या वृद्धाचे नाव असून त्यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या उजव्या कांद्याजवळ दंडाला बिबट्याने चावा घेतला. गुरुवारी रात्री निवृत्ती उघडे हे नेहमीप्रमाणे आपल्या घरातील उंबरठ्यावर झोपलेले होते. त्यांच्या घराला दरवाजा नाही. घरालगत बकऱ्या आणि शेळ्या बांधण्यात आलेल्या होत्या. त्या बंदिस्त होत्या. त्यांच्या घरालगत ऊसाचे शेत आहे. शुक्रवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास या शेतातून आलेला बिबट्या थेट उघडे यांच्या घरात घुसला. उंबरठ्यात झोपलेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज गेल्या तीन दिवसापासून शहर व परिसरात सातत्याने अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळत आहेत. शुक्रवारी सकाळीही शहरानजीकच्या संगमनेर-सुकेवाडी रस्त्यावरील नाल्यात आढळला तरुणाचा मृतदेह आढळून आला मृत व्यक्तीच्या शरीरावर जखमा असल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय वर्तविला जात असून त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. सुकेवाडीकडे जाणार्‍या पुनर्वसन वसाहतीच्या काही अंतरावरील नाटकीनाल्यात एका तरुणाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी संगमनेर पालिकेच्या कुटीर रुग्णालयात आणला आहे. अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याने सर्वप्रथम त्याची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. दरम्यान नाल्यात आढळलेल्या शरीरावर मारहाणी सदृश्य जखमा आढळून आल्याने या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने एसटी बस तीन चार वाहनांवर आदळल्यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला. या विचित्र अपघातामध्ये आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातातील मृत आणि जखमींची आतापर्यंत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. नासिक-पुणे महामार्गावर शिंदे पळसे येथील टोल नाक्यावर गुरुवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली असल्याची माहिती मिळते. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर आजाराची ही एसटी बस असून अपघातानंतर बसला लागलेल्या आगीमध्ये ती पूर्णतः जळून खाक झाली आहे. माहिती मिळतात घटनास्थळी तातडीने मदत पथके पोहोचले असून मदत कार्य सुरू झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जवळील शिंदे पळसे टोल नाक्यावर कारचालक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मोठ्या शहरातील वेश्याव्यवसायाचे लोन संगमनेरच्या ग्रामीण भागात पोहोचले आहे. श्रीरामपूरचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने याप्रकरणी एका महिलेला ताब्यात घेतले असून दोन पीडित मुलींची सुटका केली. ग्रामीण भागात पोलिसांनी केलेल्या कारवांमुळे खळबळ उडाली आहे. लॉजेससह अन्य काही ठिकाणी चालणारे अनैतिक धंदे सर्वश्रुत असले तरी ग्रामीण भागातही आता अशा प्रकारचे व्यवसाय सुरू झाले असल्याचे या कारवाईमुळे स्पष्ट झाले. नासिक पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटालगत पोखरी बाळेश्वर शिवारामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती श्रीराम पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. त्यानंतर मिटके यांनी आपल्या पथकाला कारवाईसाठी पाठविले होते. गुरुवारी पहाटेच्या वेळी पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी बनावट ग्राहकाला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज उज्वल यशाची परंपरा असलेल्या बाल शिक्षण मंडळाच्या दिगंबर गणेश सराफ विद्यालयाचा बायोडिग्रेडेबल पॉट हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर निवडला गेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातून निवडला गेलेला हा एकमेव प्रकल्प असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य कारभारी वाकचौरे यांनी दिली. राष्ट्रीय पातळीवर प्रकल्पाचे सादरीकरण अहमदाबादच्या सायन्स सेंटरमध्ये 27 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांच्या हस्ते केले जाते. देशभरातील नामवंत शास्त्रज्ञ या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात. याशिवाय भारतातील प्रत्येक राज्यातून विद्यार्थ्यांचा देखील यात सहभाग असतो. रोपवाटिकेमधील रोपांसाठी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर केला त्यामुळे पर्यावरणास हानी पोहोचते, यावर उपाययोजना म्हणून दिगंबर गणेश सराफ विद्यालयातील नववी इयत्तेमध्ये…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशातील सहकारासाठी मापदंड ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव उर्फ बाबा ओहोळ यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या सभागृहात ही बिनविरोध निवड झाली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित दादा पवार, विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष पी. आर. पाटील यांच्यासह नूतन संचालक, राज्यातील सहकार क्षेत्रातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अवैध गौण खनीज उत्‍खनन आणि वाळू माफीयांवर संपूर्ण राज्‍यात कारवाई सुरु आहे. त्‍याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. ही कारवाई कोणा एका व्‍यक्ति आणि पक्षाविरोधात नाही. सरकारने सुरु केलेल्‍या कारवाईच्‍या विरोधात अनेकजण आता पत्रकबाजी आणि आंदोलनाचा स्‍टंट करीत आहेत. ते नेमके कोणाचे समर्थन करीत आहेत, असा सवाल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. अवैध गौण खनिज आणि बेकायदेशीर वाळू उत्खननाविरोधात सरकारने भूमिका घेतली आहे. त्यामुळे अवैध गौण खनीज आणि बेकायदेशिर वाळू उत्‍खननावर कारवाई सुरूच राहील असा स्पष्ट इशारा देत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, अवैध धंद्यांविरोधात कारवाई व्‍हावी ही सामान्‍य  माणसाचीच इच्‍छा होती. अवैध गौण…

Read More