Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. तसेच ते माझे नेते आहेत. त्यामुळे मी त्यांना कोणताही आदेश देऊ शकत नाही. मात्र त्यांच्याशी झालेल्या संभाषणानुसार ते पक्षासोबत आहेत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. नाशिक पदवीधर मतदार संघातील सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बाळासाहेब थोरात यांची भूमिका काय आहे याबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांना अद्यापही भाजपने पाठिंबा जाहीर केलेला नसताना काँग्रेसकडूनही थोरात यांची भूमिका अशा पद्धतीने स्पष्ट करण्यात आली आहे. प्रत्यक्षात थोरात यांनी मात्र अद्याप नाशिक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : बोली भाषेचा वापर कमी होऊ लागल्याने गेल्या काही वर्षात बोलीभाषा लोप पावत चालल्या आहेत. अशावेळी भाषेचा विचार मनामनात आणि घराघरात रुजविण्याची आवश्यकता असून मराठी भाषा संवर्धनासाठी आणि मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. असल्याचे प्रतिपादन राज्य अभ्यासक्रम व पुनर्रचना समितीचे सदस्य संदीप वाकचौरे यांनी केले. संगमनेर तालुका वकील संघ आणि तालुका विधी समितीच्या वतीने संगमनेर न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या भाषा संवर्धन दिनी वाकचौरे बोलत होते. अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. एच. आमेठा होते. यावेळी व्यासपीठावर न्यायाधीश वाय. पी. मनाठकर, न्यायाधीश डी. आर. देशपांडे, न्यायाधीश एम. एम. शेख, न्यायाधीश एस. एस. बुद्रुक,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुंबई : शिवसेनेत मोठे बंड करत ४० आमदारांना सोबत घेत भारतीय जनता पक्षाच्या साथीने एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांना अद्याप लोकप्रियता लाभल्याचे या सर्वेक्षणातून दिसत नाही. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. मात्र देशातील टॉप टेन मुख्यमंत्र्यांच्या यादीत यावेळी महाराष्ट्राचा नंबर घसरला आहे. तसेच, राज्यात आता लोकसभेची निवडणूक झाल्यास युपीएला ३४ जागांवर विजय मिळेल, असे इंडिया टुडे सी वोटरने (India Today-C Voter) केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे. इंडिया टुडे सी वोटरने केलेल्या ‘मूड ऑफ नेशन’ या सर्वेक्षणात देशातील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार, उत्तर प्रदेशचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : नासिक-पुणे महामार्गालगत बस स्थानकाजवळ गुरुवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांच्या सशस्त्र टोळीने धुमाकूळ घालत पिस्तूलचा धाक दाखवून व्यापाऱ्याच्या घरातील व्यक्तींना मारहाण करत सुमारे अडीच लाखाच्या रोकड रकमेसह साडेनऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला आहे. शहरातून जाणारा नासिक-पुणे महामार्ग प्रचंड वर्दळीचा असून बस स्थानकापासून काही अंतरावर सह्याद्री विद्यालया शेजारी असलेल्या व्यापारी केदारनाथ भंडारी यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने धुमाकूळ घातला. महामार्गापासून अवघ्या पन्नास मीटर अंतरावर पडत असलेल्या या दरोड्याची चाहूल देखील कोणाला लागली नाही. सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने भंडारी यांच्या निवासस्थानी प्रवेश केला. यावेळी घरामध्ये भंडारी यांच्या पत्नी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नेवासा : साहेब, वरखेड गावात खून झालाय. ११२ नंबरवर आलेल्या या गंभीर प्रकाराची दखल पोलीस यंत्रणेने लगेचच घेतली. आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले. मात्र कोणाचाही खून झालेला नसून आपल्याला मिळालेली माहिती चुकीचे असल्याची पथकाची खात्री पटली. आणि चुकीचा फोन करणारा थेट तुरुंगात पोहोचला. प्रजासत्ताक दिनाची धामधूम सुरू असताना सकाळीच नियंत्रण कक्षाच्या ११२ क्रमांकावर ७ वाजून ४९ मिनिटांनी फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने नेवासा तालुक्यातील वरखेड गावामध्ये खून झाला असल्याची माहिती पोलिसांना दिली. खुनाचा गंभीर प्रकार असल्याने तातडीने नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी पोलीस उपनिरीक्षक मोंढे, पोलीस नाईक संजय माने,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राहाता : कोंबड्यांची शिकार करण्यासाठी कोंबड्याच्या जाळीमध्ये शिरलेल्या बिबट्याने कोंबड्यांसोबतच शेतकऱ्यावर हल्ला करण्याचा प्रकार राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथे समोर आला आहे. जखमी शेतकऱ्यावर शिर्डीच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी अहमदनगरला हलविण्यात आले आहे. बबन बाजीराव ढगे (वय ६५ वर्ष) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बुधवारी रात्री ढगे नेहमीप्रमाणे झोपलेले होते. रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान घराजवळ असलेल्या कोंबड्यांच्या जाळीतील कोंबड्या जास्त आवाज करू लागल्याने त्यांनी कोंबड्यांच्या जाळीकडे धाव घेतली. जाळी जवळ गेल्यानंतर त्यांना कोंबड्यांच्या जाळीमध्ये बिबट्या शिरला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तातडीने जाळीचा दरवाजा उघडला. मात्र बिबट्याने लगेचच त्यांच्यावर हल्ला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पुणे / अहमदनगर : आठवडाभराच्या अंतरात दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदी पात्रात सात मृतदेह आढळून आढळून आल्याने राज्यभरात खळबळ माजली होती. प्राथमिक तपासात सामूहिक आत्महत्येचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर दुसरीकडे पोलीस यंत्रणेने आपला तपास देखील सुरूच ठेवला होता. आता मात्र या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून या सातही जणांची आत्महत्या नसून त्यांचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. कुटुंबातील नातेवाईकांनीच हे भीषण कृत्य केले असून चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीपात्रात टप्प्याटप्प्याने आठवडाभरात तीन बालकांसह सात जणांचे मृतदेह आढळले होते. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात असलेल्या निघोजमध्ये…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघातील बंडखोर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा दर्शविणाऱ्या अहमदनगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सत्यजित तांबे यांच्यावर अन्याय झाला असून या अन्यायामुळे आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. साळुंखे हे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक असल्यामुळे राजकीय वर्तुळात या राजीनाम्याबद्दल चर्चा सुरू आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर साळुंखे यांनी काही दिवसांपूर्वी आपण तांबे यांचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर पक्षाकडून साळुंखे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : कोरोना साथ रोगामध्ये एसटी महामंडळाने संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक ठिकाणच्या बस सेवा बंद केल्या आहेत. कोरोनानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली असली तरी, अद्यापही एसटी महामंडळाने या सेवा पूर्ववत केल्या नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वारंवार आंदोलने करूनदेखील दखल घेतली जात नसल्याने आता थेट आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा विद्यार्थ्यांच्या छात्रभारती संघटनेने दिला आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामीण भागातील एसटी बस सेवा पुन्हा पूर्ववत सुरू कराव्यात या मागणीसाठी छात्रभारती संघटनेने आगार व्यवस्थापकांना वारंवार निवेदने दिली, आंदोलने केली, सातत्याने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र एसटी महामंडळाकडून वारंवार उडवा उडवीची उत्तरे दिली. गेली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : पदव्युत्तर परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास दिली जाणारी तीन सुवर्णपदके एकाचवेळी मिळवत संगमनेर महाविद्यालयातील विद्यार्थी गोपाल सानप याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहासात नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. सानप याच्या यशामुळे संगमनेर महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी पदव्युत्तर परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास दिले जाणारे कै. प्रमिला दत्तात्रय आलेगावकर सुवर्णपदक, जेष्ठ समीक्षक म. ना. अदवंत स्मृती सुवर्णपदक आणि नामदेव श्रीपती रानवडे स्मृती सुवर्णपदक एकाच वेळी सानप या विद्यार्थ्याने मिळविले आहे. सानप संगमनेर महाविद्यालयातील मराठी विभागाचा विद्यार्थी असून महाविद्यालयाच्या मराठी संशोधन केंद्रामध्ये प्रा. डॉ. अशोक लिंबेकर यांच्या…

Read More