Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज भारतीय जनता पक्षाच्या सरकारने सार्वजनिक उद्योग विक्रीस काढले आहे. कामगार विरोधी धोरण राबवत असताना सरकारच्या भांडवलदारधार्जिने धोरणामुळे कामगारांनी यापुढील काळात संघर्ष आणि त्यागाची तयारी ठेवली पाहिजेत, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड डॉ. भालचंद्र कांगो यांनी केले. संगमनेर तालुका तंबाखू कामगार युनियन व भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यावतीने संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे कामगार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर १० व ११ डिसेंबरला पार पडले. कांगो यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. कामगार व शेतकरी यांचे प्रतिक असलेल्या लाल झेंड्याचे ध्वजारोहण करत मानवंदना देण्यात आली. तसेच कॉ. सहाणे मास्तर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत दिप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.…
जलद व आरामदायी प्रवास झाल्याची प्रवाशांची भावना महाराष्ट्र संवाद न्यूज हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर शुक्रवारी नागपूर-शिर्डी दरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस धावली. जलद व आरामदायी प्रवासाचा २० प्रवाश्यानी आनंद घेतला. नागपूरच्या गणेशपेठ आगारातून १५ डिसेंबरला रात्री ९ वाजता निघालेली बस (एमएच ०९ एफ.एल. ०२४८) शिर्डी बसस्थानकावर १६ डिसेंबरला पहाटे ५ वाजता पोहचली. ताशी ८० किलोमीटरच्या वेगाने निघालेल्या बसला गणेशपेठ आगार (नागपूर) ते शिर्डी दरम्यानचे ५४० किलोमीटर अंतर कापण्यास सात तास लागले. आज हीच बस रात्री ९ वाजता शिर्डीहून नागपूरकडे प्रस्थान करणार आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर रोजी समृध्दी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी…
महाराष्ट्र संवाद न्यूज पंतप्रधान किसान सन्मान निधीची (पीएम किसान) नगर जिल्ह्यामध्ये ९० हजार ११३ लाभार्थ्यांची बँक खाते आधार संलग्न करणे प्रलंबित आहे. केंद्र शासनाकडून या योजनेचा १३ वा हप्ता वितरण करण्यापूर्वी ही बँक खाती आधार संलग्न असणे अनिवार्य आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधार संलग्न करून घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे. आधार संलग्न असलेल्या बँक खात्यांवरच लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी आपली खाती आधार संलग्न करण्याची आवश्यकता आहे. लाभार्थ्यांची बँक खाती आधार संलग्न असतील तर त्यांना लाभ मिळण्याची शक्यता नाही. आधार संलग्न केलेल्याच बँक खात्यांमध्ये यापुढील…
शिवसेनेच्या आंदोलनाला मोठे यश आंदोलकांपुढे झुकले महावितरणचे अधिकारी महाराष्ट्र संवाद न्यूज विविध कारणांमुळे महावितरण विरोधात संगमनेरकरांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. महावितरणच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी संगमनेर शहर शिवसेना आणि संलग्न संघटनांनी (ठाकरे गट) महावितरणच्या कार्यालयावर हातात ‘दंडुके’ घेत हल्लाबोल करण्याचा इशारा देतात नरमलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आपल्या तलवारी म्यान करत आंदोलकांच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य केल्याने होऊ घातलेले आंदोलन थांबले आहे. विज बिलासंदर्भात तक्रार असलेल्या कोणत्याही ग्राहकाची वीज जोडणी आता तोडली जाणार नाही, हे शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळालेले मोठे यश असल्याचे म्हटले जात आहे. आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य करत झालेल्या चर्चेदरम्यान यासंदर्भात आंदोलकांना लेखी पत्र देण्यात आले आहे. संगमनेर शहर…
महाराष्ट्र संवाद न्यूज समाजामध्ये लव जिहादचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत असून मराठा समाजातील मुली त्याचे बळी ठरत असल्याने समाजाने यासाठी जागरूक राहिले पाहिजे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केले आहे. संगमनेर येथील विश्रामगृह येथे आयोजित नगर जिल्हा कार्यकर्ता आढावा बैठकीत कोंढरे बोलत होते. यावेळी दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवाजी डौले, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष लालूशेठ दळवी, जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे पाटील, राहुरी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब वराळ, राहता तालुकाध्यक्ष प्रकाश निर्मळ, अजय हासे, साहेबराव दातखिळे आदी उपस्थित होते. कोंढरे म्हणाले, अखिल भारतीय मराठा महासंघाचा माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून युवकाना कर्ज मिळवून देण्याबरोबर व्यवसायिक मार्गदर्शन केले पाहिजे. सारथीची…
महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यात मागील आठवडाभरापासून सुरु असलेल्या राज्य साहित्य पुरस्काराच्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. संतोष खेडलेकर यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा शासनाच्या भाषा विभागाचे सचिव आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांना पाठवला आहे. आपल्या राजीनामा पत्रात डॉ. खेडलेकर यांनी म्हटले आहे की, सध्या राज्यात यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कारावरून राज्यभर मोठी चर्चा सुरु आहे. ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाच्या अनुवादाला जाहीर झालेला पुरस्कार विद्यमान शासनाने रद्द केला आणि तसे परिपत्रक जारी केले. याचबरोबर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने नियुक्त केलेली पुरस्कार निवड समिती बरखास्त केली. या दोन्ही गोष्टी मंडळाचा सदस्य म्हणून मला चुकीच्या वाटल्या.…
महाराष्ट्र संवाद न्यूज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने मंगळवारी संगमनेरमध्ये तहसीलदारांना निवेदन देत मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध नोंदविला आहे. निवेदनात म्हटले आहे की, राजकीय फायद्यासाठी महापुरुषांविषयी बेताल आणि अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजकाल कोणीही उठतो आणि स्वतःच्या अर्धवट इतिहासाच्या माहितीवर आधारित वाटेल तशी क्रिया, प्रतिक्रिया, वक्तव्य, विधाने महापुरुषांबद्दल करत असतो. खरंतर आज पर्यंत असं बोलण्याची कोणाचीही मिजास नव्हती. परंतु आता मात्र स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महापुरुषांना वारंवार टार्गेट केले जात आहे. थोर महापुरुषांचा वारंवार अपमान या राज्यात केला जातोय. महापुरुषांचा अवमान, अपमान करणाऱ्या अशा नेत्यांना व राजकारण्यांना रोखले…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण महसुली क्षेत्रात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी २८ डिसेंबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७(१) अनमोल लागू केलेले हे आदेश २८ डिसेंबरच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत लागू असतील. या आदेशानुसार कोणत्याही नागरिकास पुढील कृत्य करण्यास मनाई करण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांना आपल्याजवळ शस्त्र, तलवारी, भाले, दंडुके, बंदूका, सुरे, लाठ्या-काठ्या किंवा शारीरिक इजा होऊ शकेल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगता येणार नाही. कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, क्षेपणास्त्र सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे, साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा…
महाराष्ट्र संवाद न्यूज अनघा लेले यांनी अनुवादित केलेल्या आणि कोबाड गांधी यांनी लिहिलेल्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाला देण्यात आलेला पुरस्कार सरकारने तडकाफडकी रद्द केला. एवढेच नव्हे तर सरकारने पुरस्कार निवड समितीदेखील रद्द केली. या पार्श्वभूमीवर साहित्य क्षेत्रात खळबळ उडाली असतानाच आता या समितीमधील एक सदस्य परीक्षक हेरंब कुलकर्णी यांनी साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षांना पत्र देऊन याबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त केली असून पुरस्कार रद्द करणे हा निवड समितीचा अवमान असल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी आपल्या भावना प्रकट करणारे एक पत्र समाज माध्यमावर प्रसिद्ध केले आहे. प्रसिद्ध केलेल्या या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, आपल्या विनंतीवरून मी यावर्षीच्या यशवंतराव…
महाराष्ट्र संवाद न्यूज सिन्नरच्या मोहदरी घाटात झालेल्या अपघातामध्ये पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. सुरुवातीला हे सर्व विद्यार्थी संगमनेरमध्ये एका लग्न समारंभासाठी आल्याचे समोर आले होते. हे विद्यार्थी कोणत्या लग्नासमारंभासाठी आले होते, याची माहिती पोलीस घेत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातातील सर्व विद्यार्थी आई-वडिलांना अंधारात ठेवून सहलीसाठी गेल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. नासिक पुणे महामार्गावर सिन्नर जवळील मोहदरी घाटामध्ये शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात हर्ष दीपक बोडके, मयुरी अनिल पाटील, शुभम ताडगे, प्रतीक्षा दगू घुले व सायली अशोक पाटील या पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर…
