Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या संदर्भात ग्रामदेवी पोलीस ठाणे अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. दरम्यान या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी शरद पवार यांना हा फोन आल्याचे समजते. फोनवरील अज्ञात व्यक्तीने त्यांना मुंबईतून देशी कट्ट्याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. विशेष म्हणजे या वर्षात अशा प्रकारचा फोन त्यांना दुसऱ्यांदा आला असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिल्याची माहिती मिळत आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज यश प्राप्ती आणि सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना ही कौशल्य आत्मसात करता येतील, यासाठी शिक्षकांनी योगदान देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट ३१३ च्या व्हाईस प्रेसिडेंट रचना मालपाणी यांनी केले. इनरव्हील क्लबच्या माध्यमातून संगमनेर नगरपालिका शाळांमधील ५३९ विद्यार्थ्यांना लेखन साहित्य म्हणून मालपाणी यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमनेर इनरव्हील क्लबच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग होत्या. व्यासपीठावर व्हॉइस प्रेसिडेंट डॉ. श्रद्धा वाणी, सेक्रेटरी ज्योती पलोड, वैशाली खैरनार, उपस्थित होत्या. वृषाली कडलग म्हणाल्या, गरजू, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी संगमनेर इनरव्हील क्लब मदतीसाठी नेहमीच तत्पर असतो. इनरव्हील क्लबने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक संगमनेर शहर मध्ये फरार आरोपीच्या शोधासाठी आले असताना पोलीस निरीक्षकांना मिळालेल्या माहितीवरून या पथकाने समनापुर शिवारामध्ये कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने बांधलेल्या चार जिवंत गोवंश जनावरांची मुक्तता केली. शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल रणजीत पोपट जाधव यांच्या तक्रारीवरून फरार आरोपी कासिम आसद कुरेशी याच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी बापूसाहेब फोलाने, विशाल दळवी, राहुल सोळुंके, रोहित येमुल, सागर ससाने, उमाकांत गावडे यांचे पथक शहर पोलीस…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार लोणी बुद्रूक येथील १२६ गटांच्या गाव नकाशाची दुरूस्ती करण्यात आली आहे‌. महसूल व भूमि अभिलेख विभागाने ही संयुक्त मोहीम राबवत ४० वर्षांपासून रखडलेले सदोष गाव नकाशे दुरूस्त करण्याचे उल्लेखनीय काम पूर्ण केले आहे‌‌. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. लोणी बुद्रूक येथील गाव नकाशात प्रत्यक्ष जागेवरील वस्तूस्थितीप्रमाणे गटांचे स्थान सदस्य पद्धतीने दर्शवण्यात आलेले होते. राहाता तालुका भूमि अभिलेख विभागाने ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाच्या मदतीने याबाबत ग्रामस्थांकडून दुरूस्ती साठी अर्ज मागविले होते. सदर गाव नकाशांची सातबारा उताऱ्यामध्ये दुरुस्ती झालेली होती. मात्र गाव नकाशामध्ये दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्यामुळे सदर नकाशे सदोष दिसून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ज्येष्ठ साहित्यिक, लेखक प्रा. रंगनाथ पठारे यांना अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा ‘साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. फाउंडेशनच्यावतीने या वर्षीच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. साहित्यातील सहा, समाजकार्यातील चार आणि नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कारांचा यात समावेश आहे. प्रा. रंगनाथ पठारे यांना दोन लाख रुपये आणि स्मृतिचिन्हाचा समावेश असलेला ‘साहित्य जीवन गौरव पुरस्कार’, राजन गवस यांना एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्हाचा समावेश असलेला ‘कथा आणि कादंबरीसाठी’, सोनाली नवांगुळ यांना एक लाख रुपये आणि स्मृतीचिन्हाचा समावेश असलेला ‘विशेष पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय अनिल साबळे यांना पन्नास हजार रुपये आणि स्मृतिचिन्हाचा समावेश असलेला पिवळा पिवळा पाचोरा कथासंग्रहासाठी ‘ग्रंथ पुरस्कार’ भुरा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी शपथ घेतली. पटेल यांच्यासह त्यांच्या नव्या मंत्रिमंडळात 16 नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे. पटेल गुजरातचे अठरावे मुख्यमंत्री आहेत. गांधीनगर सचिवालयाच्या हेलिपॅड मैदानावर सोमवारी दुपारी दोन वाजता राज्यपालांनी या सर्वांना पदाची शपथ दिली. पटेल यांच्या नव्या सरकारमध्ये आठ कॅबिनेट दोन स्वतंत्र प्रभार आणि सहा राज्यमंत्री असतील. पटेल यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ 16 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते. महाराष्ट्रातूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. याशिवाय देशभरातील भारतीय जनता पार्टीचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज दोन महिन्याच्या कालावधीतच राज्याच्या आरोग्य आयुक्त पदावरून तुकाराम मुंढे यांची अनपेक्षितरित्या बदली करण्यात आली. बदलीनंतर त्यांना अद्यापही नव्या नियुक्तीचे ठिकाण देण्यात आलेले नाही. मुंढे यांनी अल्पशा काळातच आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी पाऊले टाकली. राज्याच्या जनतेच्या माफक आणि सुदृढ आरोग्यासाठी मुंढे यांची पुन्हा त्याच पदावर नियुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर सोमवारी घंटानाद आंदोलन केले आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुकाराम मुंढे यांना आरोग्य खात्यात आयुक्तपदाची जबाबदारी दिली. मात्र अवघ्या दोन महिन्यातच त्यांची पुन्हा तेथून बदली करण्यात आली. तसेच नवीन नियुक्ती अद्याप देण्यात आली नाही.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयान दिलासा दिला आहे. सीबीआयनं दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर देशमुख यांचा जामीन मंजूर झाला असल्याने तब्बल तेरा महिन्याच्या कालावधीनंतर देशमुख यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सीबीआयच्या सत्र न्यायालयानं अनिल देशमुख यांचा जामीन फेटाळला होता. त्याला देशमुख यांच्यावतीने उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. न्यायालयासमोर याप्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती आणि न्यायालयाने सोमवारपर्यंत या संदर्भातील निकाल राखून ठेवला होता. सोमवारी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी निकाल देताना अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज गुजरात विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपाने 156 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यामुळे भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदी निवड निश्चित झाली असून सोमवारी ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. नुकतीच गुजरात विधानसभेची निवडणुक पार पडली आहे. या निवडणूकीमध्ये भाजपाने 156 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला या निवडणुकीत यश मिळू शकले नाही. गतवेळच्या तुलनेत काँग्रेसची या राज्यात मोठी पीछेहाट झाली आहे. भारतीय जनता पार्टीने सातव्यांदा गुजरात आपल्याकडे राखले. भूपेंद्र पटेल हे आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. भूपेंद्र पटेल यांचा आज शपथविधी सोहळा गांधीनगरमध्ये पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर निळवंडेच्या बंद पडलेल्या कामासाठी मोठा निधी मिळविला. कामाला गती देत ऑक्टोंबर २०२२ पर्यंत कालव्याद्वारे पाणी देण्याचे नियोजन होते. मात्र जूनमध्ये राज्यात सत्तांतर झाले आणि निळवंडे धरणाचे काम पुन्हा बंद पडले. कालव्याची कामे बंद पाडणे म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या अन्नामध्ये माती कालविण्यासारखे आहे, असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांचा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर सत्कार करण्यात आला. यावेळी थोरात बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बँकेचे माधवराव कानवडे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दूध…

Read More