Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: वर्षानुवर्षे मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत असलेल्या संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या कायापालटासाठी आमदार अमोल खताळ यांनी पुढाकार घेतला आहे. औद्योगिक वसाहतीमधील विविध कामांसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली असून, या प्रस्तावाला मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नुकत्याच झालेल्या अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यादरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी संगमनेर येथे आमदार अमोल खताळ यांच्या वाढदिवसाचे औचित साधित त्यांची भेट घेतली होती. या भेटीत आमदार खताळ यांनी वसाहतीमधील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण आणि पथदिवे यांसारख्या गंभीर समस्यांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. वसाहतीमध्ये सुरक्षा व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापनाचा अभाव असल्याने उद्योजक व…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून संगमनेर शहर व तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने भव्य व्यंगचित्र स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे व जिल्हाप्रमुख सचिनभाऊ कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात असून, उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वात वर्षभर चालणाऱ्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचा हा एक महत्त्वाचा भाग असल्याचे आयोजकांनी सांगितले. ही स्पर्धा येत्या रविवारी, (१७ मे २०२६) सकाळी ९:०० ते १०:३० या वेळेत संगमनेर बस स्थानकाजवळील…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. प्रलंबित कामे मार्गी लागल्यामुळे मानसिक समाधान लाभेल. नवीन कामाची संधी चालून येईल, ज्याचा भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ: आज तुम्हाला आर्थिक नियोजनावर भर द्यावा लागेल. अनावश्यक खर्च टाळल्यास तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यावसायिक क्षेत्रात काही आव्हाने उभी राहू शकतात, परंतु तुमच्या संयमामुळे तुम्ही त्यावर मात कराल. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील आणि जुन्या वादांवर पडदा पडेल. मिथुन: तुमच्यासाठी आजचा दिवस संमिश्र फळांचा राहील. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या कौतुकास पात्र ठराल, पण सहकाऱ्यांशी बोलताना शब्द जपून वापरा.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: निरोगी आणि सुदृढ समाज निर्मितीसाठी कटिबद्ध असलेल्या ‘जयहिंद लोकचळवळी’च्या वतीने अमृतवाहिनी मॉडेल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेले पाचदिवसीय निवासी युवा सर्वांगीण विकास शिबिर नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून भविष्यातील विज्ञाननिष्ठ विचारांची सुदृढ पिढी घडवली जाईल, असा दृढ विश्वास संस्थेचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला. शिबिराच्या समारोप प्रसंगी ते उपस्थित विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संवाद साधत होते. डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या भाषणात युवकांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. ते म्हणाले की, देशाच्या प्रगतीसाठी तरुणांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होणे ही काळाची गरज आहे. समाजातील आर्थिक विषमता जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत…
आजचे राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठांकडून शाबासकी मिळण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी हा काळ उत्तम आहे. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल, मात्र घाईघाईने कोणताही मोठा गुंतवणूक निर्णय घेऊ नका. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध दृढ होतील. वृषभ: आज तुम्हाला मानसिक शांततेची गरज भासेल. कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढल्यामुळे थोडा ताण येऊ शकतो, परंतु नियोजित पद्धतीने काम केल्यास यश नक्की मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. मिथुन: तुमच्या संवादकौशल्यामुळे आज…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर नगरपरिषदेच्या रक्षक दलाने पुन्हा एकदा आपली सतर्कता सिद्ध करत मध्यरात्री घडलेला एटीएम तोडफोडीचा प्रकार उघडकीस आणला. आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या व नगराध्यक्षा डॉ.मैथिली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या रक्षक दलाच्या तातडीच्या हालचालीमुळे हा प्रकार लगेच समोर आला असून पुढील तपासाला मदत झाली आहे. दि. 9 मे रोजी रात्री साधारण 1 वाजण्याच्या सुमारास रक्षक दलाची गाडी शहरात नियमित राऊंडवर होती. त्यावेळी नगरपालिका गेटसमोरील सेंट्रल बँक ऑफ इंडिया एटीएममध्ये एक संशयित व्यक्ती असल्याचा कॉल रक्षक दलाला प्राप्त झाला. विशेष म्हणजे एटीएमची लाईट बंद असल्याची शंका वर्तवण्यात आली. त्यामुळे प्रकार संशयास्पद वाटताच रक्षक दलाने…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवक कार्यकर्त्यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदारांचा सत्कार करत ५० डझन फुलस्केप वह्या भेट दिल्या. या वह्या गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी वापरल्या जाणार आहेत. आमदार अमोल खताळ पाटील यांचा आणि युवा कार्यकर्ते सुवेद इनामदार यांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याने उत्साहात भर पडली होती. स्वतःचा वाढदिवस असतानाही सुवेद इनामदार यांनी सामाजिक कार्याला प्राधान्य देत हा उपक्रम राबवला. ही बाब लक्षात घेत, आमदार अमोल खताळ पाटील यांनी सुवेद इनामदार यांचा विशेष सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सुवेद इनामदार,…
दोन बहिणींच्या छेडछाड प्रकरणी संगमनेरमध्ये एकावर गुन्हा; ‘BNS’ आणि ‘पोक्सो’ कलमान्वये कारवाई महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: दोन सख्या बहिणींचा वारंवार पाठलाग करून त्यांना मैत्रीसाठी आणि मोबाईल नंबरसाठी त्रास देणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (१० मे २०२६) मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास या गुन्ह्याची अधिकृत नोंद करण्यात आली असून मिळालेल्या माहितीनुसार, एका २४ वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला सध्या आपल्या माहेरी वास्तव्यास आहे. दि. ४ मे २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांची १४ वर्षीय लहान बहीण घराबाहेर फिरत…
ज्या लोकशाहीने भारताचा पाया भक्कम करून ठेवला त्याच लोकशाहीला खुलेआम दावणीला लावण्यात आलं आहे. हे आधी महाराष्ट्र, हरियाणात झालं ते आता पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळालं. चोरीच्या मार्गाने मिळालेल्या सत्तेला दोष देण्याऐवजी माध्यमं या सत्तेला भाजपचं एकवीसावं राज्य गणतात तेव्हा माध्यमांच्या एकूणच मानसिकतेचा विचार करावा लागतो. सार्याच यंत्रणा नीतीभ्रष्ट आणि लाचार झालेल्या पुन्हा एकदा पाहायला मिळाल्या. सत्ताधार्यांविरोधी केलेल्या एकाही तक्रारीची दखल घ्यायची नाही, सत्तेतल्या नेत्यांना स्वैर वागू द्यावं, अशी डोळेझाक यंत्रणांनी केल्याचा गैरफायदा या निवडणुकीत उघडपणे घेतला गेला. याची दखल घेण्याऐवजी सत्ता मिळाल्याचं कोण कौतुक माध्यमं करत आहेत. सर्वच क्षेत्रात भारत घसरत चालला असताना सत्तेला जाब विचारावं असं वाटायचं माध्यमांनी सोडून…
लोक विचारतात, तुला याच्यात नेमकं काय दिसतं? ठीक आहे, तर आज सांगतो, मला राहुलमध्ये काय दिसतं. हिंदुस्थानच्या इतिहासात ५००० वर्षात सर्वात जास्त खालच्या पातळीची टीका जर कुणावर झाली असेल तर तो राहुल गांधी आहे. एवढी टीका सहन करूनही तो जनसामान्यांच्या प्रश्नांपासून तसुभरही ढळलेला नाही. कित्येक वर्ष देशाच्या राजकारणात सत्तेत असणाऱ्या घराण्याचा तो वारसदार आहे. आणि तरीही तो ना हिटलर आहे, ना चंगेज खान, ना ईदी अमीन. त्याने कधी कोणते अमानवीय किंवा अक्षम्य कृत्य केलेले नाही. त्याची एकच चूक, तो एका विशिष्ट घराण्यात जन्माला आला. त्याला हटवण्यासाठी, हादरवण्यासाठी, खाली खेचण्यासाठी अनेक वर्षांपासून एक व्यवस्थित निधीपुरवठा केलेली, समन्वयित आणि संघटित मोहीम सुरू…
