Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ● अनंत पांगारकर शहर पोलीस ठाण्यापासून हाकेचा अंतरावरील भाग, नेहमी पोलिसांची वर्दळ, एका वृध्द महिलेला मारहाण करुन घरातील लोकांनी घराबाहेर काढले, गेल्या काही दिवसांपासून ही महिला घराबाहेर राहते, स्वत:च्या मालकीच्या घरातून घराबाहेर काढल्याने संबधीतांवर कारवाई करावी यासाठी ही महिला एकदा नव्हे तर पोलिसांकडे आर्त विनवणी करते. मात्र पोलिसांवर याचा कोणताही परिणाम होत नाही. संबधीतांवर भादवि १५४ नुसार गुन्हा दाखल करण्याऐवजी दोन्ही वेळीस एनसी दाखल करुन वेळ मारुन नेतात. परिणामी कोणाचाही चौकशी होत नाही, आणि वृध्द महिलेला न्यायदेखील मिळत नाही. ही स्थिती आहे राज्यात सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेर शहरातील. संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून कायदा व…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिवजयंती उत्सवानिमित्त शिवसेना शाखा क्रमांक ११ मेनरोडच्या वतीने आगळावेगळा उपक्रम राबवत दीडशे शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. माजी नगराध्यक्ष काँग्रेस नेते दिलीप पुंड, शिवसेनेचे पदाधिकारी अॅड दिलीप साळगट, जनार्दन आहेर आदींच्या हस्ते मेन रोडवरील जुन्या राजस्थान चित्र मंदिराच्या आवारात हा वह्या वाटपाचा कार्यक्रम गुरुवारी घेण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक आणि माजी नगरसेवक कैलास वाकचौरे यांनी शिवजयंती उत्सव आणि त्यानिमित्ताने राबविल्या जात असलेल्या या कार्यक्रमाची भूमिका विशद केली. दिलीप पुंड, दिलीप साळगट, जनार्दन आहेर आदींनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बाळासाहेब डावखरे, भैया तांबोळी, अमित पवार, दत्ता कोळपकर, समीर…
महाराष्ट्र संवाद न्यूज शब्दांचे आणि आकड्यांचे फुलोरे अर्थसंकल्पात फुलविण्यात आले आहे. ज्या गोष्टी सत्यात उतरूच शकत नाही अशा अनेक घोषणा करण्यात आल्या. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांची बेगमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न अर्थसंकल्पात केलेला दिसतोय. एकीकडे अवकाळी पाऊस आणि दुसरीकडे अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस, यामुळे महाराष्ट्रातील जनता हैराण असून पंचामृताचे नाव देऊन महाराष्ट्रातील जनतेसोबत आज धोका करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. निवडणुकीतील भाषणात करावयाचे अनेक मुद्दे अर्थसंकल्पात आलेले आहेत. सरकारचा मानस आहे, प्रस्तावित आहे, इच्छा आहे, भरीव तरतूद, आवश्यक निधी देण्यात येईल अशा गोष्टी अर्थसंकल्पाचा भाग होऊ शकत नाही. लोकप्रिय घोषणा करायच्या मात्र त्यासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज श्रीरामपूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा कवी श्रेष्ठ गीतकार ग दि माडगूळकर पुरस्कार श्रीरामपूर मधील कवी व चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांना जाहीर झाला आहे. मुंबईमध्ये मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने यंदा प्रथमच कवी श्रेष्ठ गीतकार ग दि माडगूळकर यांच्या नावाने सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मोरे यांनी या पुरस्काराची गुरुवारी मुंबईमध्ये घोषणा केली. कवी श्रेष्ठ माडगूळकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या पहिल्याच पुरस्कारासाठी श्रीरामपूर मधील गीतकार बाबासाहेब सौदागर यांची निवड करण्यात करण्यात आल्याने श्रीरामपूरच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज घुलेवाडीतील युनियन बँकेच्या समोरून दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतून 2 लाख 13 हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला आहे. यासंदर्भात शहर पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. शहर पोलीस ठाण्याचा पदभार नव्या निरीक्षकांनी हाती घेतला असतानाच गुन्हेगारांनी त्यांना सलामी दिली असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे संगमनेर तालुका पोलीस ठाण्यालगत बुधवारी दुपारी दीड वाजता ही घटना घडली. संगमनेरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या एका कंपनीतील कर्मचारी शरद रमेश गुजराती हे सव्वा पाच लाख रुपयांची रक्कम घेऊन समनापुर येथील एका स्टील व्यापाऱ्यास देण्यासाठी गेले होते. तेथे त्यांनी या व्यापाऱ्याला तीन…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर संगमनेर शहरातील कोष्टी गल्ली या ठिकाणी जागतिक महिला दिन व शिवजयंती निमित्त शुक्रवार दिनांक १० मार्च रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. जयहिंद लोकचळवळ अंतर्गत जयहिंद महिला मंच, मेडीकव्हर हॉस्पिटल, संगमनेर एसएमबीटी दंत रुग्णालय, अहमदनगर डिस्ट्रीक को. ऑप बँक, रोटरी क्लब, रोटरी आय केअरचे दर्शन रोटरी नेत्र रुग्णालय यांच्या सहकार्याने जागतिक महिला दिन व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने शुक्रवारी मोफत आरोग्य तपासणी शिबीर सकाळी ९ ते दुपारी १ वाजे पर्यंत कोष्टी गल्ली येथे आयोजित केले आहे. यामध्ये ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, ईसीजी (डॉ. सल्ल्यानुसार), हिमोग्लोबीन, कॅल्शियम, शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण,…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्यानंतर आता त्या पाठोपाठ युवा सेनेच्या पदांसाठीचा मुलाखतीचा कार्यक्रम निश्चित केल्याची माहिती युवा सेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख अमित चव्हाण यांनी दिली आहे. चव्हाण म्हणाले, नियुक्तांसंदर्भातील कार्यक्रम युवा सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर करण्यात आला आहे. अशी माहिती सचिव वरुण सरदेसाई यांनी पत्रकाद्वारे कळविली असून यासंदर्भातील कार्यक्रम दैनिक सामनामधून जाहीर करण्यात आला आहे. शिर्डी लोकसभेतील युवासेनेच्या पदांकरिता नेमणुका करण्यात येत असून, सर्व पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत. युवासेनेचा पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी युवासेनेचा सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे, असे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून सांगण्यात आले…
महाराष्ट्र संवाद न्यूज शुक्रवारी (१० मार्च) निघणाऱ्या शिवजयंती उत्सवाच्या पारंपारिक मिरवणुकीमध्ये संगमनेरकरांनी सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख अमर कतारी यांनी केले आहे. हिंदूहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संगमनेर शहर आणि संगमनेरकरांच्या वतीने शुक्रवारी तिथीप्रमाणे होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पारंपारिक मिरवणूक काढण्यात येणार आहे. संगमनेर नगरपरिषद पटांगणामधून सायंकाळी पाच वाजता ही मिरवणूक निघणार आहे. शहरातील विविध मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी रात्री मिरवणुकीचा समारोप होईल. पारंपारिक मिरवणुकीमध्ये प्रसिद्ध असलेले मोटमल बँड, शिवनेरी येथील ढोल ताशा पथक, निफाड येथील प्रसिद्ध बँड पथक, अहमदनगर येथील संगम बँड पथक, उंट-घोडे, विविध वेशभूषेतील…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : तडजोडीवरच स्त्रियांचे सर्व जीवन अवलंबून आहे. लग्न हा करार नाही तर संस्कार आहे, याकरता महिलांनी आत्मविश्वासाने स्वत:चा विकास करावा, असा संदेश शारदा शिक्षण संस्थेच्या सहसचिव ॲड. ज्योती मालपाणी यांनी दिला. सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालय व संगमनेर साहित्य परिषद यांच्यावतीने आयोजित जागतिक महिला दिन समारंभात त्या बोलत होत्या. याप्रसंगी सिद्धकला महाविद्यालयाच्या सेक्रेटरी डॉ. जयश्री सराफ, प्राचार्य डॉ. राधाकृष्ण शर्मा, प्रथम महिला शरीरसौष्ठवपटू सुप्रिया ईल्हे, संगमनेर साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष मेजर लक्ष्मण ढोले, महिला प्रतिनिधी अनघा खेडकर आदी उपस्थित होते. दीपप्रज्वलन व भगवान धन्वंतरींच्या पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी डॉ. जयश्री सराफ यांच्या हस्ते ज्योती मालपाणी व अनघा खेडकर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ठेकेदाराच्या बिलामध्ये त्रुटी न काढता बिल मंजुरीसाठी तब्बल पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी दोन लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारणाऱ्या महावितरणच्या व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापकाला लाच लूचपतच्या पथकाने पकडले आहे. अमर अशोक खोंडे (वय ४१, व्यवस्थापक वित्त व लेखा विभाग, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, धुळे (वर्ग – १), रा. प्लॉट नंबर १४ अशोकनगर, जमनागिरी रोड, धुळे) आणि मनोज अरुण पगार (वय 46, उप व्यवस्थापक वित्त व लेखा विभाग, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, धुळे (वर्ग – २), रा. विवेकानंद कॉलनी, करगाव रोड, चाळीसगाव) अशी दोघा लाचखोर अधिकाऱ्यांची नावे असून लाच लुचपत विभागाच्या धुळे युनिटने ही यशस्वी…
