Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे’च्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील विकासाला गती मिळणार आहे. रोजगार वाढणार आहे. जिल्हा लॉजिस्टिक कॅपीटल बनणार आहे. येत्या काळात जिल्ह्यात प्रस्तावित ३० हजार कोटींच्या कामांमुळे विकासाला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातुन बांधलेल्या नगरमधील ३ किलोमीटर लांबी असलेल्या चौपदरी उड्डाणपूलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, महापौर रोहीणी शेंडगे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखेपाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार राम शिंदे, आमदार संग्राम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सर्वसामान्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी यंत्रणांना जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून मागणीनूसार निधी दिला जातो. या निधीचा विनीयोग करतांना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कामे करण्याचे तसेच चालु आर्थिक वर्षात मंजूर असलेल्या निधीचे प्रस्ताव महिनाभराच्या आत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री तथा महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डीले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क वादग्रस्त विधानांसाठी प्रसिध्द असलेल्या महाराष्ट्राच्या राज्यपालांनी पून्हा एकदा वादग्रस्त विधान करत वाद ओढावून घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. केवळ एवढ्यावर थांबतील तर ते राज्यपाल कसले, त्यांनी त्याही पुढे जात छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचे सांगत, ‘शिवाजी तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है,’ असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्याने राज्यात नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क देशभरामध्ये शिक्षण क्षेत्रात जीवन कौशल्य संदर्भाने अमलबजावण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुरू आहेत त्या संदर्भात देशातील विविध राज्य सरकार व सामाजिक संघटनेच्या वतीने सुरू असणाऱ्या प्रयत्नांच्या संदर्भाने दिल्ली येथे राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्या चर्चासत्रात सहभाग घेण्यासाठी संदीप वाकचोरे यांची निवड करण्यात आली आहे. देशभरामध्ये सध्याच्या परिस्थितीत शालेय शिक्षणामध्ये जीवन कौशल्य समाविष्ट आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे व त्या संदर्भातील गरजा, परिणामकारकता, अभ्यासने यासंदर्भात वेगवेगळ्या राज्यांमध्ये विविध उपक्रम सुरू आहेत. त्यासाठी देशातील विविध उपक्रमा संदर्भात एकत्रित परिस्थिती जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्य सरकार व देशातील 18 हून अधिक जीवन कौशल्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटनांच्यावतीने चर्चास्तराचे आयोजन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क थोर समाजसुधारक आणि संतांनी दिलेल्या समतेचा विचार हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या रूपात आपल्या सर्वांना दिला आहे. मात्र सध्या लोकशाहीचे काही स्तंभ डळमळीत होत असून पुन्हा एकदा लोकशाही व समतेचा विचार अधिक बळकट करण्यासाठी खासदार राहुल गांधी यांची ही भारत जोडो यात्रा असल्याचे गौरवोद्गार भारत जोडो यात्रेचे समन्वयक व राज्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. शेगाव येथील भारत जोडो यात्रेच्या विराट सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार राहुल गांधी, प्रभारी एच. के. पाटील, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, दिग्विजय सिंह, खा.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अनाथ युवतीवर शिर्डीत सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. तर आणखी एकाला ताब्यात घेतले असून पोलीस त्याची अधिक चौकशी करीत आहेत. अनाथालयात राहत असलेली ही युवती रागाच्या भरात निघून गेली होती. त्यानंतर तिच्यावर शिर्डीत पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचं समोर आलं. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी व्यक्तिशः या प्रकरणात लक्ष घालत शिर्डीत भेट देत तपासासाठी सूचना केल्या होत्या. त्यानंतर पोलीस तपासाला गती आली. या युवतीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिने दिलेल्या जबाबावरून पाच जणांविरूध्द सामुहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनाथ युवतीवरील सामूहिक अत्याचारप्रकरणी दोघांना अटक केल्याची माहिती सहायक निरीक्षक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क  अचानकपणे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या शाळकरी मुलीला वाचविण्यासाठी कार चालकाने अचानक कारचा ब्रेक दाबल्याने कार पलटी झाली. या अपघातात कारमधील एकजण जागीच ठार झाला. तर मुलीसह आठजण गंभीर जखमी झाले आहेत. विजय शंकर डेरे (वय-६२, रा. नारायणगाव, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या कारमधील व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता नाशिक-पुणे महामार्गावरील डोळासने शिवारामध्ये बाबळेवाडी येथे हा अपघात झाला. अपघातात विजय शंकर डेरे यांचा मृत्यू झाला असून कारमधील रोहित विजय डेरे (वय-२३), उज्वला विजय डेरे (वय-४८), मोहित विजय डेरे (वय-३०), सविता अनिल शेटे (वय-४८), शैला दिलीप वारुळे (वय-५८), विनायक शिवाजी डेरे (वय-५०) (सर्व रा. नारायणगाव, पुणे),…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क लाखभर रुपयांच्या कर्जासाठी शेतकरी आत्महत्या करतात. शेतकऱ्यांचे लाखाचे कर्ज माफ होत नाही मात्र, उद्योगपतींना कोट्यावधी रुपये माफ केले जातात. देशाचे पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रेमाने जर शेतकऱ्यांचा आवाज ऐकला, त्यांना मदत केली तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. देशाच्या कानाकोपऱ्यात आज भाजपने हिंसा द्वेष आणि दहशत पसरविली आहे. या दहशत द्वेष आणि हिंसेविरोधात ही भारत जोडो यात्रा सुरू असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा आज शेगाव मध्ये आली. यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी के. सी. वेणुगोपाल, एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर महापालिकेचे तत्कालिन महापौर, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरुन पदाचा गैरवापर करत महापालिकेकडून कोट्यावधी रुपयांची थकबाकी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील या पिता-पुत्रांनी माफ करुन घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, तत्कालिन महापौर आणि दोन सूचक अनुमोदक नगरसेवकांवर गुन्हा दाखल करावा व त्यांना अपात्र ठरवावे, अशी तक्रार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव यांनी केली आहे. जाधव यांनी तक्रारीसोबत पुरावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठविले आहे. पदाचा दुरुपयोग करत कोट्यावधी रुपयांची थकबाकी माफ करुन समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तक्रार अर्जाच्या प्रती जाधव यांनी मुख्यमंत्री…

Read More

लोकांचा भाजपावर विश्वास वाढत असल्याने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळु सरकू लागलीय! महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासाठी जागेसह यापूर्वीच पालिकेने ५० लाखाचा निधी मंजूर केल्याचा आणि आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपतींचा अश्वारुढ पुतळा साकारणार असल्याचा माजी नगरसेवक सोमेश्वर दिवटे यांच्या विधानाचा माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार यांनी समाचार घेत सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. जहागिरदार यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे पालिकेतील कारभार कसा चालतो, याची माहिती देत दिवटेंना ‘माझ्याकडे ट्युशन लावा, म्हणजे पालिकेचा कारभार माहिती होईल’ अशा शब्दात त्यांच्या आरोपांना उत्तरे दिली आहे. ४० वर्षापासून आमदार बाळासाहेब थोरात शहर व तालुक्याचे नेतृत्व करतात. डॉ. सुधीर…

Read More