Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची सहकार क्षेत्रात लौकिकास्पद वाटचाल सुरू आहे. गतवर्षी कारखान्याने 15 लाख 53 हजार मेट्रिक टन विक्रमी गाळप करत चांगला भाव दिला होता. यावर्षी देखील कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना 176 रुपये प्रोत्साहन पर अनुदान दिले जाणार आहे. कारखान्याच्या माध्यमातून दिले जाणारे ऊस उत्पादक व कामगारांसाठीचे 26 कोटी रुपये बाजारात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते. तर व्यासपीठावर पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) मध्ये पोट निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवार देऊ नये येथून ‘ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं’ अशा आशयाचं पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे दिवंगत आमदार लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भारतीय जनता पक्षाने मुरजी पटेल यांना लटके यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना…

Read More

रविवार विशेष महाराष्ट्रातील राजकारणाने घेतलेली निचत्तम पातळी ही राज्यातल्या राजकारण्यांना, त्यांच्या राजकीय पक्षांना आणि पक्षाच्या नेत्यांची लाज रस्त्यावर आणणारी ठरू लागली आहे. राज्याच्या इतिहासात राजकारणाचा स्तर इतका खाली गेल्याचं ऐकायलाही मिळत नाही. देशात प्रगल्भ राजकारणाचं केंद्र म्हणून एककाळी बोलबाला असलेल्या महाराष्ट्राविषयीची देशभरात होणारी चर्चा खूपच चिंता व्यक्त करणारी आहे. एका राजकीय पक्षाला राजकारणाच्या पटलावरून हद्दपार करण्याइतका निर्दयीपणा आजवरच्या चढ उतारात दिसला नाही. तोही शिवसेनेसारख्या कडवट हिंदुत्ववादी पक्षाबाबत होऊ लागल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावणं स्वाभाविक आहे. ५६ वर्षांच्या कालखंडात सेनेला असंख्य धक्के बसले. अनेक बडे नेते या पक्षाला सोडून गेले. शिवसेना कमजोर झाली पण संपली नाही. गणेश नाईक तर सत्ता असताना बाहेर…

Read More

वाचन प्रेरणा दिन विशेष प्रशासकीय कामांच्या रहाटगाड्यात अनेक अधिकारी वेळात वेळ काढून आपला वाचन छंद जोपासत आहेत. “शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम करण्याची आवश्यकता आहे. मनाला स्थिर, सजग ठेवण्यासाठी वाचनाचा छंद जोपासणंही गरजेचं आहे. वाचनाने जीवनाप्रती सजगता येऊन कामात सकारात्मकता येते. दैंनदिन कामात ऊर्जा येते. निर्णय प्रक्रियेत गतिमानता येते”, अशा प्रतिक्रिया जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर जन्मदिन राज्यभरात “वाचन प्रेरणा दिवस” म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जिल्ह्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी आजपर्यंत केलेले वाचन, सध्या वाचन असलेले पुस्तक व एकूण वाचन संस्कृतीविषयी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्याचा शिर्डी माहिती कार्यालयाचे माहिती अधिकारी…

Read More

रविवार विशेष :- २०२०-२०२१ या आर्थिक वर्षांची देशासह जगाकरिता अतिशय अडचणीचे वर्ष म्हणून इतिहास नोंद घेईल, नव्हे तर या शतकातील सर्वात अडचणीचे वर्ष म्हणून संबोधले जाईल चर्चा होती. केवळ ‘करोना’ या गंभीर आजाराच्या साथीबाबत एका बाजूला असे चित्र निर्माण झाले की जणू काही आता जगाचे विकासाचे चाक थांबणार मात्र हेच वर्ष संगमनेर तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरले आहे. या काळात करोनाची तीव्र लाट असतानाही पुणे-नाशिक या सेमी हायस्पीड रेल्वेची घोषणा करीत त्यासाठी लागणाऱ्या निधीची महाराष्ट्र सरकारने तरतूद केली. हा प्रकल्प सुमारे सोळा हजार कोटींचा असून तो २२० किलोमीटर लांबीचा असून हा रेल्वेचा मार्ग पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून जात आहे यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पठार भागातील खंदरमाळवाडी येथील वांदरकडा येथील मृत झालेल्या चार भावडांच्या कुटूंबियांचे काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी त्यांच्या घरी जाऊन भेट घेत या कुटूंबियांचे सांत्वन केले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून शासनाच्यावतीने त्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या वांदरकडा येथे विजेचा धक्का बसून चार भावडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरात येताच बर्डे कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या समवेत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, जि. प. सभापती मीरा शेटे, जि. प. सदस्य अजय फटांगरे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज स्वामी समर्थ मंदीर ते साई मंदिरादरम्यान म्हाळुंगी नदीवरील खचलेल्या पुलाची कॉग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने पुल दुरुस्त करण्यासंदर्भात संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. भोजापुर धरण भरल्यानंतर म्हाळूंगी नदीला सातत्याने पाणी आहे. साईनगर, घोडेकरमळा या दोन भागांना जोडणारे म्हाळुंगी नदीवरील दोन्ही रस्ते बंद झाल्याने या भागातील नागरिकांना दुरच्या रस्त्याचा शहरात येण्यासाठी वापर करावा लागत आहे. म्हाळुंगीला असलेल्या पाण्यामुळे दोन दिवसांपूर्वी हा पूल खचला. पुलावर असणाऱ्या आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनदेखील तुटल्याने नगरपरिषदेने त्याची दुरुस्ती तातडीने केली. मात्र खचलेल्या पुलाच्या दुरुस्तीला वेळ लागणार असल्याने हा पुल पादचाऱ्यांसह सर्वच…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज “भुजबळ साहेबांना शिवसेनेतून फोडले होते तो अश्वमेध यज्ञ होता. आता एकनाथ शिंदे स्वतःहून बाहेर पडले तर ते भाजपचे पाप ?. जंतराव….निदान न कळणारी लबाडी तरी करा” अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटद्वारे माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात सत्ताबदल झाला पण त्यानंतरही सत्ताधारी आणि विरोधी यांची एकमेकांवर टोलेबाजी सुरूच आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिंदे–फडणवीस यांचे सरकार आले एवढ्या मोठया सत्ता बदलानंतर आता अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ‘हिंदुत्वाची मतं फुटतील आणि आपल्याला महाराष्ट्रात कधीच सत्तेवर येता येणार नाही, या भीतीने भाजपाला ग्रासले असल्यामुळे शिवसेना फोडण्याचे पाप…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज बहुचर्चित ठरलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे तातडीने डिसेंबर अखेर पूर्ण करून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत निळवंडे कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. बैठकीसाठी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांनी निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम ८५ टक्के तर उजव्या कालव्याचे काम ७२ टक्के पूर्ण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज सहकाराला दिशादर्शक ठरलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी १६ ऑक्टोबरला काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आमदार बाळासाहेब थोरात त्यांच्या पत्नी कांचनताई यांच्या हस्ते होत आहे. नासिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, तर अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दिवंगत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेला हा कारखाना आज राज्यात आणि देशभरात सहकारी चळवळीचा मापदंड ठरला आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या या कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव देणारा कारखाना म्हणून ओळख निर्माण केली आहे. दिवंगत भाऊसाहेब…

Read More