Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज जिल्ह्यात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यात सर्वाधिक दुचाकी चोऱ्या आणि प्रवाशांना लुटण्याचे प्रकार संगमनेरमध्ये सर्रासपणे घडत आहेत. येथील बस स्थानकामधून आरोपींना कुठेही तातडीने निघून जाता येते, त्यामुळे संगमनेर शहर पोलिसांनी बसस्थानकामधील पोलीस चौकी पूर्ववत करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. शहरातून भर रस्त्यावर तसेच बस स्थानक परिसरात लावलेल्या दुचाकींच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात झाल्याचे आढळून आले आहे. दुचाकींचा चोऱ्या करणाऱ्यांचा शोध घेण्यास पोलिसांना अपयश आले असल्याचे दिसते. बस स्थानकाचा परिसर हा गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व जास्त प्रमाणात मुलींना शहरी भागातील टपोरी मुले नाहक त्रास देण्याचे काम करत असतात. मग ती मुलींची छेडछाड…

Read More

अहमदनगर | महाराष्ट्र संवाद न्यूज एकीकडे चेंबूर पोट निवडणुकीचा विषय राज्यभर चर्चिला जात आहे. तर दुसरीकडे येत्या १७ ऑक्टोबरला होणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यात या निवडणुकीसाठी सतरा मतदार पात्र असून त्यापैकी सर्वाधिक पाच मतदार संगमनेरमधील आहे. तब्बल २२ वर्षांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात चुरशीची लढत होत असून या निवडणुकीपासून गांधी परिवार प्रथमतः दूर राहिला आहे. अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार समजले जाणारे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी अचानकपणे निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने खर्गे आणि थरूर यांच्यात सरळ लढत होत आहे. यामुळे यावेळी काँग्रेसला बिगर गांधी घराण्याचा…

Read More

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज स्वामी समर्थ मंदिरापासून साई मंदिर, प्रवरा नदीवरील घाटाकडे जाणारा म्हाळुंगी नदीवरील पूल पाण्याच्या प्रवाहामुळे खचल्याने या पुलावरील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन तुटल्या आहेत. पालिका प्रशासनाने त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असले तरी शुक्रवारी शहरातील बहुतांशी भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. दरम्यान गुरुवारी दुपारी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे, या प्रभागाचे नगरसेवक राजेंद्र वाकचौरे व शैलेश कलंत्री, पाणीपुरवठा विभागाचे माजी सभापती सोमेश्वर दिवटे, नितीन पापडेजा आदींनी या पुलाची पाहणी केली आणि कामासंदर्भात पालिका प्रशासनाला सूचना केल्या. मात्र ज्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत या पुलाचे बांधकाम येते. त्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई महापालिकेने आपला राजीनामा स्वीकारावा, यासाठी न्यायालयात गेलेल्या शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार असलेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला शुक्रवारी सकाळी 11 वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारण्याच्या दिलेल्या आदेशामुळे लटके यांचा चेंबूर पोट निवडणुकीतील उमेदवारी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर होऊ घातलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दिवंगत लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र त्यांनी दिलेला नोकरीचा राजीनामा मुंबई महापालिकेकडून स्वीकारण्यात न आल्याने लटके यांनी या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिर प्रवरा नदीवरील गंगामाई घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील म्हाळुंगी नदीवर असलेला पूल खचला असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे हा पूल तातडीने वाहतुकीसाठी दोन्ही बाजूने बंद करण्यात आला आहे. शहरात प्रस्तावित असलेल्या एसटीपी प्लांटसाठी आवश्यक असणारी आणि नुकतीच बांधण्यात येत असलेली ड्रेनेजची लाईन देखील तुटली असल्याचे निदर्शनास आले. संगमनेर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याची पाईपलाईन या पुलावरून समांतर गेली आहे. आज दुपारच्या वेळी ही पाईपलाईन आणि त्याखालील पुलामध्ये मोठ्या प्रमाणात फट निर्माण झाले असल्याचे दिसून आले. तसेच पूल देखील काही ठिकाणी खचला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून म्हाळुंगी नदीला पाणी असल्याने पुलाच्या खाली असलेली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे यापुढे पारंपारिक शिक्षणाऐवजी कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य राहणार आहे. नव्या धोरणानुसार यापुढे पॉलिटेक्निकचे (तंत्रनिकेतन) शिक्षण मातृभाषेत दिले जाणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित लघु उद्योग भारतीच्यावतीने आयोजित इंजिनिअरिंग टॅलेंट सर्च स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाप्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. औद्योगिक क्षेत्रात संशोधन करणार्‍या शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक संस्थांना यावेळी गौरविण्यात आले. मंत्री पाटील म्हणाले, देशात आता औद्योगिक क्रांती घडू लागली आहे, या क्रांतीचा वेग वाढवायचा असेल तर संशोधनाला चालना देणे गरजेचे आहे. संशोधनवृत्ती वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी विज्ञान, वाणिज्य, कला शाखेचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नोकरी निमित्त बाहेरगावी असलेल्या पोलिसाच्या दोन दुचाकी जाळण्याची घटना शहरालगतच्या ढोलेवाडी परिसरात घडली. घराबाहेर उभ्या असलेल्या दोन दुचाकी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने दोन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. अज्ञातांकडून शहरात दुचाकी जाळण्याच्या काही घटना घडल्या आहेत. यातील अज्ञात आरोपींचा शोध लावण्यास पोलिसांना अपयश आलेले आहे. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या बहुतांश गुन्ह्यांची उकल पोलीस उपाधीक्षकांचे पथक करत असले तरी या पथकालाही दुचाकी जाळणाऱ्यांचा शोध घेता आलेला नाही. सध्या ठाण्याच्या पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या आणि भातसा धरणाच्या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून तैनात असलेल्या व संगमनेरच्या ढोलेवाडीमध्ये राहणाऱ्या पोलीस नाईक राजेश सावित्रा माळी यांच्या घरासमोर लावलेल्या दोन दुचाकी अज्ञात व्यक्तींनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर होऊ घातलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दिवंगत लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र त्यांनी दिलेला नोकरीचा राजीनामा मुंबई महापालिकेकडून स्वीकारण्यात न आल्याने लटके यांनी या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने तातडीने या संदर्भातील सुनावणी गुरुवारी निश्चित केली आहे.अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर येत्या 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे त्यासाठी ऋतुजा लटके यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. सुरुवातीला लटके यांनी निवडणुकीसाठी पालिकेकडे मुभा मागितली होती मात्र पालिकेने ती नाकारली. त्यामुळे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ठाण्यातून सुरु झालेल्या शिवसेनेच्या महा प्रबोधन यात्रेत पंतप्रधान मुख्यमंत्र्यांवरील टिका शिवसेनेच्या नेत्यांना अडचणीची ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल व मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, भास्कर जाधव, विनायक राऊत या तिघांसह पाच जणांविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते भास्कर जाधव, विनायक राऊत, सुषमा अंधारे आदी नेते उपस्थित होते. यावेळी अंधारे व जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली होती, तर राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषण केले होते. शिवसेना नेत्यांची ही कृती मुख्यमंत्री शिंदे यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पाण्यात वीज प्रवाहाचा धक्का लागून चार मुलांचा मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. बर्डे कुटूंबियांवर यामुळे दु:खाचा डोंगर कोसळला असून या कुटूंबाच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत. त्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे आश्वासन आमदार डॉ. सुधीर तांबे दिले. तालुक्यातील खंदरमाळवाडी येथील वांदरकडा येथे एका छोट्याश्या नाल्यात आंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांचा पाण्यात पडलेल्या वीज तारेमुळे शॉक बसून मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे येथे घटनास्थळी जात बर्डे कुटूंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, थोरात कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे,…

Read More