Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – शासनाच्या जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेच्या तब्बल 43 लाख रुपयांच्या लोखंडी पाईपची चोरी करणारी आंतरराज्य टोळी उघडकीस आणण्यास अहमदनगरच्या गुन्हे शाखेला यश आले. गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशात जाऊन या टोळीचा छडा लावला. तसेच चोरी गेलेल्या पाइपापैकी सुमारे 35 लाख रुपये किमतीचे पाईप हस्तगत करण्यात यश मिळाले. काय होती घटना: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे व वीस गावांच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू होते. या कामावरील 43,05,523/- रुपये किमतीचे लोखंडी पाईप कोणीतरी चोरून नेले. या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात लक्ष्मी सिविल इंजीनियरिंग सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, कोल्हापूर यांच्यामार्फत आर. एम. कातोरे अँड कंपनीचे साईट इंजिनिअर…

Read More

अहमदनगर जिल्ह्यात 24 लाख लाभार्थी, राज्यातील १ कोटी ४० लाख लाभार्थ्यांना योजनेचा लाभ सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना आम्ही थांबविली राज्यातील सर्व शासकीय रूग्णालयात आता मोफत उपचार  महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शासकीय योजनांचा लाभ: शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथे गुरुवारी ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते‌. यांची उपस्थिती: यावेळी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज गणेशोत्सवात कायदा मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही. कायदा सर्वांना सारखाच आहे. त्याच पालन सर्वांनी करणे गरजेचे आहे. एक दिवस तुमचा तर उरलेले 364 दिवस आमचेच आहेत, असा सज्जड इशारा कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी साऊंड ऑपरेटर चालक-मालकांना दिला आहे. बैठक: गणेशोत्सव महिनाभरावर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील गणेश मंडळ तयारीला लागले असून त्याच अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आणि जिल्ह्यातील साऊंड मालक-चालक, ऑपरेटर यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी पंडित बोलत होते. सहकार्याचे आश्वासन: यावेळी कोल्हापूर जिल्हा साऊंड ऑपरेटर असोसिएशनच्या वतीने जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्यात येईल असे सांगण्यात आले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आपण राष्ट्राविषयी अभिमान बाळगून या भारतमातेची सेवा केली पाहिजे. राजमाता जिजाऊ या उत्कृष्ट प्रशासक, न्यायाधिश, शूरवीर, प्रखर राष्ट्रभक्त, संस्कृतीचा अभिमान असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या मातोश्री होत्या. त्यांचा आदर्श आजच्या तरूण मुली आणि महिलांनी अंगी बाळगणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रखर वक्ते सुनील देवधर यांनी केले. यांची होती उपस्थिती: ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने लायन्स क्लब संगमनेर सफायर आयोजित स्वातंत्र्योत्सव या कार्यक्रमामध्ये देवधर यांनी ‘राष्ट्रीयत्व आणि महिला सुरक्षा’ या विषयावर व्याख्यान दिले. व्याख्यानासाठी संगमनेरमधील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. व्यासपीठावर प्रकल्प प्रमुख गिरीश मालपाणी, श्रीनिवास भंडारी, सुदीप हासे, शिवबच्चन गौड, अतुल अभंग, महेश लाहोटी, राजेश लाहोटी, अजित माळी, सौरभ कश्यप,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – गुरुवारी शिर्डी मध्ये होत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी एसटी महामंडळाच्या संगमनेर डेपोतील तब्बल 62 एसटी बसेस या सरकारी कार्यक्रमाच्या दिमतीला देण्यात आल्या आहे. त्यामुळे या बसेसच्या फेऱ्या रद्द केल्याने गुरुवारी विद्यार्थी आणि प्रवाशांचे मोठे नुकसान होणार आहे. विद्यार्थी आणि प्रवाशांना वेठीस धरून होत असलेल्या या कार्यक्रमाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. 16, 17 ऑगस्टला होणार गैरसोय: दरम्यान संगमनेर डेपोतून 16 ऑगस्टला अन्य ठिकाणी मुक्कामी जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आले असून 17 ऑगस्टला देखील या बसेसच्या फेऱ्या आगार प्रमुखांनी रद्द केल्याचे जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांनी शाळा महाविद्यालयात जायचे नाही का: शासन आपल्या दारी या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर -संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्ड बुधवारी मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली. येथे झालेल्या लिलावात एक नंबर कांद्याला बुधवारी (ता. 16 ऑगस्ट) 2400 ते 2801 रुपये भाव मिळाला असल्याची माहिती देण्यात आली. असे मिळाले कांद्याला भाव: संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहे. बुधवारी बाजार समितीत कांदा आणि डाळिंबाला चांगला भाव मिळाला असून एक नंबर कांद्यास 2400 ते 2800 रुपये, दोन नंबर कांद्यास 1900 ते 2300 रुपये, तीन नंबर कांद्याला 1000 ते 1600 रुपये इतका भाव मिळाला. तसेच गोल्टी कांदा 175 ते…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – काकडी विमानतळाजवळील मैदानावर होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला अखेर मुहूर्त लाभला आहे. गुरुवारी होत असलेल्या या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवत जबाबदारीचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना संबंधित यंत्रणांना अहमदनगरचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या आहेत. नियोजन पूर्व बैठक: शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी 30 हजारापेक्षा जास्त लाभार्थी उपस्थित राहणार असल्याने पालकमंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी मंगळवारी नियोजन बैठक झाली. हे अधिकारी होते उपस्थित: यावेळी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पोलीस उपअधिक्षकांच्या पथकाने स्वातंत्र्यदिनी सुरु असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकत केलेल्या कारवाईत गोवंश जनावरांच्या गोमांसासह सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून कारवाई दरम्यान कत्तलखाना चालक आणि वाहन चालक पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान यातील तिघा आरोपींविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवंश हत्या बंदी कायद्याचे उल्लंघन: संगमनेरातील बेकायदा कत्तलखान्याचा प्रश्न सरकारपर्यत जावूनही कत्तलखान्याला विरोध करणाऱ्या सरकार आणि प्रशासनाला येथील कत्तलखाने बंद करण्यात आले आहे. येथील कत्तलखाने राजरोसपणे स्वातंत्र्यदिनाच्या दिवसासह धार्मिक सणाच्यादिवशीदेखील सुरुच असतात. त्यांच्यासाठीचा प्रशासनाचा बंदी आदेश कागदावरच असतो. कोणत्याही आदेशाला आणि कारवाईला न जुमानणाऱ्या कत्तलखाना चालकांकडून बंदी असलेल्या गोवंश…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सध्या सुरु आहे. यानिमीत्ताने देशभरात सरकारी विभागात विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या संकल्पनेतून शहर पोलीस ठाण्यात दंत चिकीत्सक डॉ. किशोर पाटील यांच्या माध्यमातून मोफत दंत तपासणी व एक्स रे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाण्यात राबविला उपक्रम: शहर पोलीस स्टेशन व हेल्पिंग हँण्डस् यूथ ऑर्गनायझेशनच्या सहकार्यातून स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पारशी नववर्षदिनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली – स्वातंत्र्य दिनापासून केंद्र सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. सरकारने नेहरू स्मारकाचे नाव बदलले असून यापुढे नेहरू स्मारकाला पंतप्रधान म्युझियम अँड लायब्ररी (पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी) म्हटले जाईल. आधीच्या नावातून नेहरूंचे नाव हटविण्यात आले आहे. जून महिन्यात झाला होता निर्णय: स्वातंत्र्यदिनी नाव बदलण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे. जून महिन्यात नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी सोसायटीच्या विशेष बैठकीत त्याचे नाव बदलून पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी (पंतप्रधान म्युझियम अँड लायब्ररी PMML) असे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नृपेंद मिश्रा हे पंतप्रधान म्युझियम आणि लायब्ररीच्या कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष आहेत. मिश्रा यापूर्वी पंतप्रधान मोदींचे मुख्य…

Read More