Author: अनंत पांगारकर
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) – गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे शैक्षणिक हब बनलेल्या संगमनेर तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत महत्त्वाच्या यूपीएससी परीक्षेत मिळवलेले यश हे संगमनेरकरांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे, असे गौरवोद्गार माजी शिक्षण व महसूल मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. परीक्षेत सुकेवाडी येथील सर्वसामान्य कुटुंबातील मंगेश खिलारी, मांची येथील स्वप्निल राजाराम डोंगरे आणि पिंपारणे येथील राजश्री शांताराम देशमुख या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. संगमनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांनी अत्यंत जिद्द आणि आत्मविश्वासातून मिळवलेले हे यश संगमनेर तालुक्यातील सर्व विद्यार्थी…
संगमनेर: अनंत पांगारकर (महाराष्ट्र संवाद न्यूज) सूर्य डोक्यावर आग ओकत असताना निळवंडेचे पाणी देखील तापले आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहिले असून यात पंतप्रधानांची वेळ मिळाल्यावर सवडीने निळवंडे धरण व कालव्याचे उद्घाटन करा, आधी कालव्यांद्वारे दुष्काळी भागातील जनतेला पाणी द्या. अशी मागणी केली आहे. थोरात यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, दहा टीएमसी पाण्याची उपलब्धता असताना, दुष्काळी भागाला हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवू नका, जनतेच्या मनात सरकार बद्दल प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. जनतेच्या उद्रेकाची वाट पाहू नका. त्यांना त्यांच्या हक्काचे पाणी देण्याचे पुण्यकर्म सरकारने पार पाडावे. विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. संगमनेर नगर परिषदेच्यावतीने देखील हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमांतर्गत शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत नागरिकांना आवश्यक असणाऱ्या विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण केले जाते. याच उपक्रमांतर्गत महसूल विभागाच्यावतीने राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील सन 2020 ते 2023 या तीन वर्षात 18 ते 59 वयोगटातील मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी आवश्यक असलेले मृत्यूचे दाखले नगर परिषदेमार्फत मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. इयत्ता पहिलीच्या…
मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्यात नवे सरकार स्थानापन्न झाल्यापासून सरकारमधील मतभेदांमुळे रखडलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना अखेर सोमवारी रात्री उशिराने शिंदे-फडणवीस सरकारने पदोन्नती देत याबाबतचे आदेश रात्री उशिराने काढले आहेत. यात राज्यातील 143 पोलीस निरीक्षकांचा समावेश असून सरकारने त्यांना नव्या नियुक्तीची ठिकाणे देखील दिली आहेत. यात नासिक येथून अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूरच्या पोलीस उपाधीक्षकपदी आनंदा वाघ बदलून येत आहेत. राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांचे पदोन्नती आणि बदली संदर्भात सरकारने काढलेले आदेश… याशिवाय आणखी वीस पोलीस उपाधीक्षकांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांची यादी खालील प्रमाणे:-
मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्याच्या गृह विभागाने सोमवारी रात्री उशिराने राज्यातील पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त या संवर्गातील तब्बल 119 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामुळे दीर्घ काळापासून रिक्त असलेल्या संगमनेरच्या पोलीस उपनिरीक्षक पदावर सोमनाथ वाघचौरे यांची नियुक्ती झाल्याने अखेरीस संगमनेरला नवे डीवायएसपी मिळाले आहे. वाकचौरे यांनी काही काळ श्रीरामपूर विभागात देखील काम बघितले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जिल्ह्यातील पाच डीवायएसपीच्या बदल्या झाल्या असून त्यातील दोघांना पुन्हा नगर जिल्ह्यातच नव्याने नियुक्ती मिळाली आहे. तर तिघे जिल्ह्याबाहेर बदलून गेले आहे. त्यांच्या जागेवर जिल्ह्याबाहेरून तीन नवे डीवायएसपी जिल्ह्यात आले आहेत. अण्णासाहेब मारुती जाधव यांची कर्जत वरून सांगली शहर येथे, अहमदनगर ग्रामीणचे डीवायएसपी अजित भगवान…
नाशिक (महाराष्ट्र संवाद न्यूज) महत्त्वकांक्षी ठरलेल्या नागपूर ते मुंबई या ७०१ किलोमीटर लांबीच्या बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी असा पहिला टप्पा खुला झाल्यानंतर त्या पाठोपाठ आता २६ मे पासून शिर्डी ते नाशिक हा दुसरा टप्पा सुरू होत आहे. दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. नासिकपर्यंत हा महामार्ग खुला होत असल्याने आता नागपूर ते नाशिक प्रवासासाठी सहा तास लागणार असून नव्याने सुरू होत समृद्धी महामार्गाचे शिर्डी ते भरवीर हे अंतर अवघ्या ४० ते ४५ मिनिटात पार करता येणार आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी अंतराचा आहे. त्यापैकी नागपूर…
श्रीरामपूर (महाराष्ट्र संवाद न्यूज) श्रीरामपूर पोलिसांनी गोवंश जनावरांचे कत्तल करून त्यांच्या मांसाची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत सुमारे पावणे पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सोमवारी (ता. २२ मे) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर पोलिसांनी धनगर वस्ती, वार्ड नंबर दोन येथे ही कारवाई केली. कारवाई दरम्यान पोलिसांना मुजाहिद मुस्ताक कुरेशी हा त्याच्याकडील पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा कंपनीच्या कार नंबर एम. एच. २३ वाय ६०९९ मध्ये गोवंश जनावरांची कत्तल करून ६३००० रुपये किमतीचे साडेचारशे किलो मांस विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आला पोलिसांनी कारवाईदरम्यान ६३ हजार रुपये किमतीचे मांस व चार लाख रुपये किमतीची कार ताब्यात घेतली. श्रीरामपूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी मुजाहिद…
राहाता (महाराष्ट्र संवाद न्यूज) उच्चशिक्षित प्रेयसीला फसवत दुसऱ्या मुलीशी विवाह करणे नवरदेवाला चांगलेच महागात पडले आहे. नव्या वधू सोबत बोलल्यावर चढण्यासाठी नवरदेवाची निघालेली मिरवणूक लग्न मंडपाऐवजी थेट पोलीस ठाण्यात पोहोचण्याचा प्रकार राहाता तालुक्यात समोर आला आहे. लग्नाचे अमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची तक्रार घेऊन प्रेयसी पोलीस ठाण्यात पोहोचली आणि नवरदेवाचा हिरमोड झाला. लग्न तर मोडलेच परंतु नवरदेवावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. नगर जिल्ह्यात या विवाहाची चर्चा सुरू आहे. एकीकडे वर आकाशात सूर्यनारायण तळपत असताना दुसरीकडे विवाह समारंभ जोरात सुरू आहे. रविवारी (ता. 21 मे 2023) अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथील सावता महाराज मंगल कार्यालयामध्ये देवळाली ता. नाशिक येथील पंकज कदम याचा…
आश्वी (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कोल्हार-घोटी महामार्गावरील लगतच्या दोन गावांमधून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञातांनी पळून नेल्याचा प्रकार घडला. या संदर्भात दोन्ही मुलींच्या पालकांनी आश्वी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिल्या घटनेत 16 मे रोजी 14 वर्षे 10 महिने वयाची अल्पवयीन मुलगी गावातील दुकानामध्ये मॅगी आणण्यासाठी गेली होती. बराच वेळ झाला तरी ती घरी परतली नाही. त्यामुळे घरातील व्यक्तींनी दुकानदाराकडे जाऊन चौकशी केली असता संबंधित मुलगी दुकानात मॅगी घेण्यासाठी आली नसल्याची माहिती त्यांना मिळाली. आजूबाजूला तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही, त्यामुळे तिच्या घरच्या व्यक्तींनी दिलेल्या…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) रात्रीच्या वेळी मोबाईल टॉवरवर आराम करण्यासाठी बसलेल्या विविध प्रकारच्या पक्षांना पकडण्यासाठी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तो मोबाईल टॉवरवर चढला. मध्यरात्रीच्यावेळी टॉवरवर चढलेल्या या युवकाला टॉवरच्या उंचीचा अंदाज आला नाही. पक्षी पकडण्याच्या नादात टॉवरवरून तोल जाऊन खाली पडताना तो जीव गमावून बसला. संगमनेर तालुक्यातील अंभोरे या गावी रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. गणेश भास्कर गवळी (वय अंदाजे 27 वर्ष) असे या मृत झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. गवळी हा लहानपणापासून आणि लग्नानंतरदेखील पत्नी आणि दोन मुलींसह आपला मेव्हणा काळू बर्डे यांच्याकडे राहावयास होता. रविवारी गावात कार्यक्रम असल्याने गणेश गवळी याने मद्य प्राशन केल्याची माहिती…
