Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज अवैध गौण खनीज उत्‍खनन आणि वाळू माफीयांवर संपूर्ण राज्‍यात कारवाई सुरु आहे. त्‍याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. ही कारवाई कोणा एका व्‍यक्ति आणि पक्षाविरोधात नाही. सरकारने सुरु केलेल्‍या कारवाईच्‍या विरोधात अनेकजण आता पत्रकबाजी आणि आंदोलनाचा स्‍टंट करीत आहेत. ते नेमके कोणाचे समर्थन करीत आहेत, असा सवाल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. अवैध गौण खनिज आणि बेकायदेशीर वाळू उत्खननाविरोधात सरकारने भूमिका घेतली आहे. त्यामुळे अवैध गौण खनीज आणि बेकायदेशिर वाळू उत्‍खननावर कारवाई सुरूच राहील असा स्पष्ट इशारा देत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, अवैध धंद्यांविरोधात कारवाई व्‍हावी ही सामान्‍य  माणसाचीच इच्‍छा होती. अवैध गौण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज महाराष्ट्र शासनाच्या वतीने सन २०२१ चे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात संगमनेर येथील नाट्य लेखक डॉ. सोमनाथ मुटकूळे यांना बाल वाड्मय नाटक व एकांकिका क्षेत्रासाठीचा भा. रा. भागवत पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य शासनाने २०२१ चे साहित्य व वाडंमयीन प्रकारातले वेगवेगळ्या विषयासाठीचे पुरस्कार नुकतेच जाहीर केले आहेत. डॉ. मुटकुळे यांनी संत तुकारामांच्या जीवन चरित्र व तत्त्वज्ञानाची आधुनिक परिभाषित केलेली मांडणी खेळ मांडलेला या नाटकाच्या द्वारे रसिकांसमोर आणली आहे. सनय प्रकाशन नारायणगाव यांच्या वतीने या पुस्तकाचे मागील वर्षी प्रकाशन करण्यात आले होते. या पुस्तकाला ५० हजार रुपये रोख सन्मानचिन्ह देऊन राज्य सरकारच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऐरवी जातवैधता प्रमाणपत्र बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले जाते.‌ मात्र नगरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने याही पुढे जात अकरावीमध्ये शिकणाऱ्या २४७ विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र वाटप करण्याचा नावीन्यपूर्ण, स्तुत्य असा उपक्रम सुरू केला आहे. एक वर्षाआधी, ते पण एका दिवसातच हे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे विद्यार्थी व पालकांना सुखद धक्का बसला. अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती त्यांच्या लोकाभिमुख व जलद कामकाजामुळे राज्यात अव्वल क्रमांकावर आहे. सेवा पंधरवड्यात सर्वाधिक प्रमाणपत्र वाटप करून समिती राज्यात पहिल्या क्रमांकावर राहिली. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सामाजिक न्याय भवनाच्या उद्घाटन भाषणात जिल्हा समितीच्या कामकाजाचे कौतूक केले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील ‘मंडणगड पॅटर्न’ची राज्यात प्रथम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या तपासणी नाक्यावर पालघरच्या तलासरी पोलिसांनी मेड इन युएसए असा शिक्का असलेले परदेशी मार्क असलेले पिस्टल आणि काडतुसे घेऊन फिरणाऱ्या संगमनेर मधील तिघा जणांना अटक केली आहे. या तिघांकडून पोलिसांनी पिकअप जीप, पिस्टल आणि काडतुसे असा आठ लाख वीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. इरफान युनुस शेख (वय- २५ वर्षे, धंदा-व्यापार, रा. कुरण रोड, ता. संगमनेर जि. अहमदनगर), मुसा हारुण शेख (वय- २८ वर्षे, व्यवसाय शेती, रा. कुरण रोड, ता. संगमनेर जि. अहमदनगर), समित लाजरस खरात (वय ३० वर्षे, व्यवसाय चालक, रा. कुरण रोड, महादेव वस्ती ता. संगमनेर जि. अहमदनगर) अशी पकडलेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज, अकोले अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथील रहिवासी रोहिदास गवराम पांडे यांच्या अकस्मात मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना पांडे यांनी काढलेल्या ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेचा धनादेश नुकताच प्रदान करण्यात आला. श्रीरामपूर डाक विभागाचे अधीक्षक हेमंत खडकेकर यांच्या हस्ते पांडे यांच्या पत्नी निर्मला पांडे यांना प्रदान करण्यात आला. रोहिदास पांडे यांनी कुंभेफळ (ता. अकोले) येथील पोस्टमध्ये ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयाची विमा पॉलिसी घेतली होती. दुर्दैवाने काही महिन्यांपूर्वी त्यांचा अकस्मात मृत्यू झाला. या विमा पॉलिसीचा लाभ मिळण्यासाठी पांडे यांच्या वारसांनी आवश्यक ती कागदपत्रे टपाल विभागाकडे दाखल केली होती. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर त्यांचा दावा मंजूर करण्यात आला. नुकताच पांडे यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज, मुंबई मराठी पत्रकार परिषदेच्या उत्तर नगर जिल्हा अध्यक्षपदी अकोलेतील दैनिक सार्वमतचे प्रतिनिधी प्रा. अमोल वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्याचा मोठा विस्तार लक्षात घेत मराठी पत्रकार परिषदेने उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग केले असून दोन्हीकडे परिषदेच्या स्वातंत्र्य शाखा स्थापन केल्या जाणार आहेत. या अनुषंगाने उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी वैद्य यांची निवड करण्यात आली. परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी वैद्यांच्या नियुक्तीची घोषणा केली. वैद्य परिषदेचे विद्यमान जिल्हा प्रसिध्दी प्रमुख असून ही जबाबदारी अन्य पत्रकारावर सोपविण्यात येत आहे. वैद्य यांनी दोन दिवसात आपली कार्यकारिणी निवडून त्यास परिषदेची मान्यता घ्यावी अशी सूचना त्यांना करण्यात आली आहे. उत्तर नगरमधील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज, संगमनेर गौण खनिज उत्खनन आणि वाळू उपशावर कारवाईच्या नावाखाली नगर जिल्ह्यात राजकारण सुरू असून दहशत आणि दडपशाहीच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात राजकारणाची नवी पद्धत रूढ झाली आहे. खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. मंजूर झालेली विकास कामे काही मंडळींच्या व्यक्तिगत हट्टापायी थांबविली जात असल्याचा गंभीर आरोप राज्याचे माजी महसूल मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या सरकारला अहमदनगर जिल्ह्याचा एवढा राग का आहे असा प्रश्न उपस्थित करत थोरात म्हणाले, सत्तेत असूनही जिल्ह्याच्या हिताच्या आड येणारी ही मंडळी जिल्ह्याचे खरे विरोधक आहे. नवे सरकार सत्तेत येण्यापूर्वी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये कोट्यावधी रुपयांची विकास कामे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वारंवार अवमानकारक वक्तव्य सुरू आहेत, कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रद्रोही विधान करत आहेत, या विरोधात राज्य सरकारची नेभळट भूमिका, राज्यातील उद्योगधंदे गुजरातमध्ये नेण्याचे कट कारस्थान, वाढती बेरोजगारी आणि महागाईच्या प्रश्नावर राज्य सरकारचा निषेध करत महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे येत्या १७ डिसेंबरला सकाळी ११ वाजता मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा अतिविराट महामोर्चा काढण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हा मोर्चाचा पहिला टप्पा आहे. यानंतरही सरकार ऐकणार नसेल तर टप्प्याटप्प्याने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज गेल्या अनेक दिवसापासून न्यायालयात प्रलंबित असलेली राज्यातील सत्ता संघर्षाची लढाई नव्या वर्षातही सुरूच राहणार असल्याचे दिसते. न्यायालयाने सत्तासंघर्षाची सुनावणी आता एकत्रित घेतली जाईल, असं स्पष्ट करत पुढील तारखेची घोषणा केल्याने आता १३ जानेवारी २०२३ चा मुहूर्त मिळाला आहे. शिवसेनेतील सर्वात मोठ्या बंडखोरी नंतर राज्यात सत्तापालट झाला. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. या सर्व याचिकांवर पुढील महिन्यात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याबरोबर न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा असतील. नव्या वर्षात संक्रांतीच्या अगोदर दोन दिवस होत असलेल्या या सुनावणी दरम्यान…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमधील बेकायदेशीर कत्तलखाने नेस्तनाबूत करण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे येथील बेकायदेशीर कत्तलखाने आणि गोमांस वाहतुकीच्या टीप आता वरिष्ठांना दिल्या जाऊ लागल्या आहे. अशाच एका टीप वरून नगरच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाई एक हजार किलो गोमांसासह साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल पथकाच्या हाती लागला आहे. शंकर चौधरी, संतोष लोंढे, भाऊसाहेब साळुंखे, विनायक चव्हाण व बबन बेरड या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत असताना गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना संगमनेरमधून जनावराच्या मांसाची वाहतूक होणार असल्याची टीप मिळाली होती. त्यांनी ही माहिती वस्तीवरील पथकाला देत कारवाई करण्याचे…

Read More