Author: अनंत पांगारकर
संगमनेर – प्रतिनिधी शेंडेवाडी, साकूर आणि पिंपळगाव देपा येथील कारवाईत अटक करण्यात आलेले ॲट्रॉसिटी, बालमजूर कायदा आणि वेठबिगार कामगार कायद्यांतर्गतच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुभाष राठोड आणि मधुकर दळवी यांना संगमनेर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी २५,००० रुपयांच्या जामिनावर त्यांना मुक्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. आरोपींच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. हृषीकेश वाणी यांनी न्यायालयासमोर महत्त्वाचे मुद्दे मांडले. फिर्याद दाखल करण्यास तब्बल १० वर्षांचा उशीर झाला असून, फिर्यादीत नमूद केलेले गुन्हे आरोपींविरुद्ध लागू होत नाहीत, असा युक्तिवाद त्यांनी केला. तसेच, आरोपींनी कोणताही गुन्हा केलेला नसून, त्यांना या प्रकरणात फसवण्यात आल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. ॲड. हृषीकेश वाणी यांच्यासोबत ॲड. प्रशांत…
संगमनेर, दि. २४ मे जम्मू-काश्मीरमधील तिसवाड सेक्टर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र, जवान संदीप पांडुरंग गायकर (वय ३२) यांच्यावर आज त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत साश्रुनयनांनी या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यात आला. जलसंपदामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शहीद गायकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. लष्कराच्या १५ मराठा लाईट इन्फंट्रीमधील १७ राष्ट्रीय रायफल्समध्ये सैनिक पदावर कार्यरत असलेले संदीप गायकर यांना २२ मे रोजी तिसवाड सेक्टर येथे कर्तव्य बजावताना वीरमरण आले होते. आज सकाळी त्यांचे पार्थिव ब्राह्मणवाडा येथे आणण्यात आले. भारतीय लष्कराच्या पथकांनी हवेत…
संगमनेर – प्रतिनिधी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी गुरुवारी (२२ मे) दुपारी साकूर येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली. सध्या काही अडचणींचा सामना करत असले तरी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सेवेची त्यांनी प्रशंसा केली. या रुग्णालयाची स्थापना आपल्या जिल्हा परिषद सदस्यपदाच्या कार्यकाळात झाली असल्याने ही वास्तू आपल्या जिव्हाळ्याचा विषय असल्याचेही तांबे यांनी सांगितले. रुग्णालयाच्या सद्यस्थितीबद्दल माहिती मिळाल्यानंतर आमदार तांबे यांनी तातडीने रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रल्हाद बांबळे आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून अडचणींचा आढावा घेतला. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना…
अहिल्यानगर – अहिल्यानगरमधील एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब गोविंद काळे यांच्या विरोधात लाच मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलिस स्टेशनमधील एका गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी त्यांनी ७०,००० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका ३० वर्षीय व्यक्तीने अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), अहमदनगर येथे तक्रार दाखल केली होती. त्यांच्या भावाने चोरीचे सोने विकत घेतल्याच्या आरोपाखाली तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये गु.र.क्र. ५६९/२४, भा.द.वी. कलम ३९४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तक्रारदाराच्या भावाला आरोपी न करण्यासाठी, सहायक पोलिस उपनिरीक्षक काळे यांनी त्यांच्याकडे ७०,००० रुपयांची मागणी केली होती. तक्रारीची शहानिशा करण्यासाठी ९…
संगमनेर, प्रतिनिधी संगमनेर शहर आणि तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा, वारंवार होणारे व्होल्टेजचे चढ-उतार आणि विजेचे झटके यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या प्रकारांमुळे त्रस्त झालेल्या संगमनेरच्या संभाजी ब्रिगेडने तात्काळ वीजपुरवठ्यात सुधारणा करण्याची आणि कायद्यानुसार नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात संभाजी ब्रिगेडने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही संगमनेर येथील सर्व नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून हे निवेदन सादर करत आहोत. गेल्या काही महिन्यांपासून वीज पुरवठ्यात वारंवार येणाऱ्या अडचणींमुळे, विशेषतः फेज जाणे, कमी किंवा जास्त व्होल्टेज यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, वृद्धांचे आरोग्य, व्यापाऱ्यांचे व्यवहार आणि…
संगमनेर – प्रतिनिधी संगमनेर शहरातील महिला, सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांनी ‘ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या माध्यमातून घडलेल्या प्रकरणावर आरोग्य विभागाचे लक्ष वेधल्यानंतर व ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ वेब पोर्टलने बेकायदेशीर गर्भपात प्रकरणांबाबत प्रकाशित केलेल्या दोन भागांच्या विशेष वृत्तांकनानंतर आरोग्य विभागाने संगमनेरमधील काही डॉक्टरांना रडारवर घेतले आहे. या वृत्तांकनामुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून, आता हे डॉक्टर आरोग्य विभागाच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. मुलींचा घटता लिंगदर आणि वाढते बेकायदेशीर गर्भपात यामुळे समाजात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. काय आहे प्रकरण… महाराष्ट्र संवाद न्यूजने आपल्या वृत्तांकनात संगमनेर शहर व तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर गर्भपात…
अहिल्यानगर / संगमनेर – प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील पिंप्रीलौकी येथील एका कृषी सेवा केंद्रात झालेल्या धाडसी घरफोडीचा अखेर उलगडा झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकाने अत्यंत गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या घरफोडीतील तीन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्या ताब्यातून सुमारे ८.५७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पिंप्रीलौकी येथील व्यापारी संदीप पोपट गिते यांच्या कृषी सेवा केंद्राचे पत्रे उचकटून चोरट्यांनी दुकानातील शेती उपयोगी साहित्य आणि रसायने चोरून नेली होती. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आश्वी पोलीस या प्रकरणी तपास करत होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप…
संगमनेर – प्रतिनिधी संगमनेरला सध्या अनियमित वीजपुरवठ्याच्या समस्येने ग्रासले आहे. मागील काही दिवसांपासून महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असून ती कधीही येते आणि कधीही जाते, अशी परिस्थिती उद्भवल्याने याचाच परिणाम म्हणून आज (गुरुवारी) काँग्रेससह शहरात नागरिकांनी महावितरण कार्यालयाला घेराव घालून निवेदन दिले. यावेळी आठ दिवसात सुधारणा करा अन्यथा आंदोलन करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. विजेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचा महावितरणवर संताप, यांनी दिले निवेदन… संगमनेर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी सोमेश्वर दिवटे, गजेंद्र अभंग, किशोर टोकसे, नूरमोहम्मद शेख, नितीन अभंग, संतोष मुर्तडक, जावेद पठाण, सुषमा भालेराव, वैशाली बर्गे, रामदास सोनवणे, तुषार अरगडे, श्रावणी…
मुंबई – विशेष प्रतिनिधी राज्य सरकारकडून राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच आहे. गुरुवारी गृह विभागाने राज्याच्या पोलिस दलात मोठे फेरबदल केले असून २२ पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्या करण्यात आलेल्या अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचा समावेश असून त्यांच्या रिक्त जागेवर रायगड येथून सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे घार्गे आता अहिल्यानगर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक असतील. बदल्या करण्यात आलेल्या २२ अधिकाऱ्यांपैकी २१ अधिकाऱ्यांना नव्या नियुक्तीचे ठिकाण देण्यात आले असून संजय वाघ यांना अद्याप नियुक्तीचे नवे ठिकाण देण्यात आलेले नाही. या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या….
संगमनेर- संगमनेर शहरालगतच्या घुलेवाडी येथील अनिल गंगाधर राऊत यांच्या घराजवळ लावलेली टेम्पो ट्रॅव्हलर आणि टाटा विंगर अशी सुमारे १० लाख रुपये किमतीची दोन चारचाकी वाहने अज्ञात व्यक्तींनी जाळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २०) मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल गंगाधर राऊत (वय ४६, रा. घुलेवाडी) यांचा ट्रॅव्हलचा व्यवसाय आहे. त्यांच्या मालकीची टाटा विंगर (क्र. एमएच ०८ आर ८८०४, किंमत २ लाख ९८ हजार रुपये) आणि टेम्पो ट्रॅव्हलर (क्र. एमएच ०४ जीपी ३३३२, किंमत ६ लाख ९५ हजार रुपये) ही दोन वाहने त्यांनी नेहमीप्रमाणे रात्री घरासमोर पार्क केली होती. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात…
