Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना पद्म पुरस्काराने गौरविले जाते. पद्म पुरस्कारांसाठी या नावांची शिफारस करण्याकरिता महाराष्ट्रात समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे सुधीर मुनगंटीवार यांची निवड करण्यात आली आहे. यांचाही आहे समितीत समावेश : मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीत दिलीप वळसे पाटील, दादा भुसे, चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे, उदय सामंत आणि राजशिष्टाचार विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांचा समावेश आहे. कधीपासून दिले जातात हे पुरस्कार : अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे वितरण 1954 पासून केंद्र सरकार करते. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – गुरुवारी (ता. 03 ऑगस्ट) संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या कांदा लिलावात एकुण 9577 गोण्या कांद्याची आवक झाली. लिलावात चांगल्या दर्जाच्या एक नंबर कांद्याला 1500 ते 1825 रुपये भाव मिळाला. याच लिलावात दोन नंबर कांद्याला 1200 ते 1400 रुपये, तीन नंबर कांद्याला 800 ते 1100 रुपये इतका भाव मिळाला तसेच गोल्टी कांदा 500 ते 700 रुपये भावाने विकला गेला. टोमॅटोलाही मिळाला असा भाव : तसेच टोमँटो या शेतमालाची एकुण 14700 क्रेटस आवक झाली. त्यास 1000 ते 2500 रुपयांचा भाव मिळाला. डाळींबाचीदेखील 1881 क्रेटस आवक झाली असून 1 नंबर डाळीबास 111 ते 135 रुपये प्रति किलो,…
महाराष्ट्र संवाद न्यूज आज 4 ऑगस्ट ज्येष्ठ तमाशा कलाकार कलाभूषण रघुवीर खेडकर यांचा वाढदिवस. रघुभाऊ माझे मानस बंधु… एक तरल मनाचा मनस्वी कलाकार, 1961 मध्ये आजच्या दिवशी मुंबईत जन्मलेल्या रघुभाऊचा तमाशा रंगभूमीवर पहिला प्रवेश झाला तो वयाच्या पाचव्या दिवशी. तमाशामहर्षि तुकाराम खेडकर आणि कान्ताबाई सातारकर यांच्या पोटी जन्मलेल्या रघुभाऊच्या रक्तातच तमाशा आहे. वयाच्या नवव्या वर्षापासुन स्टेज गाजवत हम भी कुछ कम नही हे भाऊने दाखवुन दिले. 1980 च्या दरम्यान भाऊने आई कांताबाईच्या तमाशाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. मागील 300-350 वर्षाच्या काळात तमाशाने अनेक संकटांशी सामना केला आहे. दर शतकात 2-3 वेळा तमाशात मोठमोठे बदल झाले. 80 चे दशकही असेच होते.…
महाराष्ट्र संवाद न्यूज प्रेमानंद रुपवते तथा बाबुजी यांचा आज पाचवा स्मृतिदिन. बाबूजी आपल्यातून जाऊन पाच वर्ष पुर्ण झाली आहेत यांवर विश्वासच बसत नाही, असे वाटते की बाबूजी आत्ता-आत्ता गेले, पण काळ कोणासाठी थांबत नाही. बाबुजींना कुशाग्र बुद्धिमत्तेची निसर्गदत्त देणगी होती. त्यांचे चौफेर वाचन होते. ते अभ्यासु आणि बहुश्रुत होते. राजकारणा बरोबरच संगीत, साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, विविध धर्म आणि संस्कृती याबाबत सखोल अभ्यास होता. बाबुजी समवेत खाजगीत गप्पा टप्पा मारणे म्हणजे एक प्रकारची मेजवानीच असे. निरनिराळया विषयांवर त्यांच्याकडे असलेला माहितीचा साठा खुला होत असे. शेर, शायरी, किस्से, विनोद, चुटकुले सहज सहज ऐकायला मिळत असे. बाबुजी उत्तम वक्ते होते, व्याख्याते होते…
असे काही घडले तरच महसूल सप्ताह खऱ्या अर्थाने साजरा होईल महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – बुधवारी (ता. 2 ऑगस्ट) रात्री अकरा वाजता अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मोबाईलची रिंग वाजते, मोबाईल उचलला जातो आणि समोरची व्यक्ती सावेडी परिसरातील आनंद नगर भागात राहत असलेल्या छबुबाई चित्रा कदम या 93 वर्षाच्या एकल महिलेला प्रशासनाकडून मदतीची गरज असल्याचे सांगते. मोबाईल फोन नंतर काय घडते : जिल्हाधिकारी देखील तातडीने अन्नधान्य वितरण अधिकारी अर्चना पगारे व संजय गांधी निराधार योजनेचे तहसीलदार विशाल नाईकवाडी यांना फोन करून तातडीने मदतीच्या सूचना देतात. प्रशासनातील हे दोन्ही अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेची अंमलबजावणी करत एकल महिलेची संपर्क साधून तिला पिवळी शिधापत्रिका…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – तृतीय पंथीय असल्याचे भासवत कोल्हार-घोटी मार्गावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला पकडल्यानंतर संगमनेरच्या जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने गुन्ह्यातील आरोपींची अटकेतून मुक्तता होणार आहे. या आरोपींना झाला जामीन मंजूर : संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 14 जुलैला गुन्हा रजिस्टर नंबर 577/2023 नुसार संजय मारुती शिंदे (वय 25 वर्षे रा. चिसखेड, ता. भोताळा, जि. बुलढाणा), ओंकार शंकर शेगर (वय 23 वर्षे रा. टाकळी तलाव, पो. ढोरपगाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा, सुनिल बाबुराव सावंत (वय 32 वर्षे रा. टाकळी तलाव, ता. खामगाव, जि. बुलढाणा, राजेश शंकर शेगर (वय 25 वर्षे…
‘अमृत महोत्सवी भारत’ या विषयावर ॲड. असीम सरोदे कॉम्रेड डॉ. अजित नवले मांडणार विचार महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महाराष्ट्रातील नामवंत विचारवंत वक्ते आणि सामाजिक कार्यकर्ते कालकतीत प्रेमानंद (बाबूजी) रूपवते यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त संगमनेरमध्ये अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, ॲड. संघराज रुपवते यांनी दिली आहे. आमदार बाळासाहेब थोरात असतील अध्यक्ष : शनिवारी (ता. 5 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता मालपाणी लॉन्स येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महसूल मंत्री काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहे. अमृत महोत्सवी भारत या विषयावर हे मांडणार विचार : अभिवादन कार्यक्रमादरम्यान बाबूजी यांच्या स्मृती…
लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोधात कठोर कायद्याच्या मागणीसाठी शनिवारी राहुरीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा
महाराष्ट्र संवाद न्यूज राहुरी – सातत्याने लव्ह जिहाद आणि धर्मांतरणाची प्रकरणे समोर येत आहे. राहुरी तालुक्यातील उंबरे येथून देखील असेच एक प्रकरण समोर आल्याने सरकारने लव्ह जिहाद आणि धर्मांतरण विरोधात कठोर कायदा करावा या मागणीसाठी शनिवारी (ता. 5 ऑगस्ट) सकाळी राहुरीच्या वायएमसीए ग्राउंडवरून भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. का काढला जातोय मोर्चा : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उंबरे गावात क्लासच्या नावाखाली धर्मांतराचं रॅकेट चालवल्याचं उघडकीस आल. येथे क्लासच्या नावाखाली अल्पवयीन हिंदु मुलींना लव्ह जिहादच्या चक्रव्युहात अडकवण्याचा प्रयत्न चालू होता. मुलींना धमकी का दिली जात होती : उंबरे गावातील एक मुस्लिम शिक्षिका कोचिंग क्लास घेते. मात्र ईदसारख्या सणांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज एक ऑगस्ट पासून राज्यात सर्वत्र महसूल सप्ताह सुरू आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी सुरू असलेल्या या उपक्रमातच निवासी नायब तहसीलदाराने शेतकऱ्याकडून तीन हजाराची लाच घेतल्याचे समोर आले आहे. लाचखोर नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला असून त्याला अटक करण्यात आले आहे. काय आहे महसूल सप्ताह : शासनाच्या आदेशाने राज्यात महसूल विभागामार्फत 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान सर्वत्र महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी हा सप्ताह यशस्वी व्हावा यासाठी महसूल मंत्री विखे पाटील यांनी महसूल विभागासह सर्व यंत्रणांना निर्देश दिलेले आहेत. या माध्यमातून…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई -राज्यात निर्माण झालेल्या वाळू प्रश्नाबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार बाळासाहेब थोरात यांनी दुपारच्या सत्रात सभागृहात गौण खनिजासंबंधी विविध प्रश्न उपस्थित करत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. काय म्हणाले आमदार थोरात : घरगुती उपयोगासाठी गौण खनिजाचा वापर करणाऱ्यांवर कारवाया करू नका. ज्यांचा उद्देश व्यापारी नाही त्यांच्यावर कसल्या कारवाया करता? मोठे धेंड सोडून सामान्य माणसाला का त्रास देता? अंगणात किंवा घरासमोर, दुकानासमोर, रस्त्यावर मुरूम टाकणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. जे व्यापारी उद्देशाने गौण खनिजाची चोरी करतात त्यांना हे सरकार मोकळे सोडते आणि सामान्य शेतकरी, कष्टकरी बांधवांना मात्र त्रास दिला जातो. जो शेतकरी आपल्या अंगणात मुरूम…
