Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले भंडारदरा धरणाला शंभर वर्षे पूर्ण होत असताना, राज्य सरकारने हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, धरणासाठी विस्थापित झालेल्या आदिवासी बांधवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने अखिल भारतीय किसान सभेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विस्थापितांना न्याय मिळेपर्यंत आणि जमिनींचे प्रश्न मार्गी लागेपर्यंत शताब्दी कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा किसान सभेने दिला आहे. धरणामुळे विस्थापित झालेल्या आदिवासींच्या विस्थापनालाही शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रदीर्घ काळातही या बांधवांना हक्काचे पाणी मिळालेले नाही. पिण्यासाठी आणि सिंचनासाठी भंडारदरा धरणाचे पाणी मिळत नसल्याने या भागातील आदिवासी आजही पाण्यापासून वंचित आहेत. याशिवाय, विस्थापितांना मोबदला म्हणून दिलेल्या जमिनी अद्यापही त्यांच्या…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील वीटभट्टी व्यावसायिकांवर सध्या दुहेरी संकट ओढवले असून, माती, राख, कोळसा आणि भुसा यांच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ यामुळे हा व्यवसाय आधीच आर्थिक तोट्यात गेला आहे. तर दुसरीकडे ऐन हंगामात झालेल्या अवकाळी पावसाने भट्टीधारकांचे कंबरडे मोडले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या परिस्थितीत शासनाने तातडीने नुकसानग्रस्त वीटभट्ट्यांचे पंचनामे करून व्यावसायिकांना भरपाई द्यावी, अशी मागणी वीट उत्पादक संघ, संगमनेर-अकोले यांच्या वतीने करण्यात आली आहे. वीटभट्टी व्यवसायाला अद्याप कोणतीही विमा योजना लागू नाही. या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक वर्षांपासून सरकार दरबारी पाठपुरावा करूनही अद्याप कोणत्याही सरकारने या मागणीची दखल घेतलेली नाही. विमा कंपन्यांकडे दाद मागितली असता,…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, तर संगमनेरमध्ये महायुतीचे आमदार आहेत. असे असतानाही, संगमनेरमध्ये भारतीय जनता पक्षाची झालेली वाताहात सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. एकेकाळी विधानसभा निवडणुकीपर्यंत तालुक्यात प्रभावी असलेला हा पक्ष आज स्वतःच्याच अस्तित्वासाठी धडपडत असल्याचे नगरपालिका निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. पूर्वी सत्तेत नसतानाही प्रभावी कामगिरी करणारा हा पक्ष, आता सत्तेच्या केंद्रस्थानी असूनही पालिका निवडणुकीमध्ये भोपळाही फोडू न शकल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काय होणार अशा विवंचनेत पक्षाचे काही निष्ठावंत पदाधिकारी सापडले आहे. संगमनेरमधील भाजपच्या या घसरणीला पक्षांतर्गत गटबाजी आणि महायुतीतील समन्वयाचा अभाव…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- सहा वर्षांपूर्वी दाखल असलेल्या पोक्सोच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अजिंक्य दामोदर मालुंजकर याची संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, कोरोना लॉकडाऊन च्या काळामध्ये १६ एप्रिल २०२० रोजी दुपारी चारच्या सुमारास अकोले तालुक्यातील खानापूर शिवार परिसरात बारा वर्षांची अल्पवयीन पीडित मुलगी तिच्या आजी आणि फिर्यादीसोबत शेतात चारा आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या आरोपीने त्यांना हटकले आणि लॉकडाऊन व संचारबंदीचे उल्लंघन केल्याचे कारण सांगून दमदाटी केली. पीडित मुलीच्या आजी आणि फिर्यादीने मुलीला घरी पाठवले, मात्र आरोपीने तिला वाटेत गाठले. तिला घरी सोडण्याचे आमिष दाखवून तो मुलीला मोटारसायकलवर बसवून एका निर्जन…

Read More

अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी संगमनेर १३२ केव्ही सबस्टेशन ते धांदरफळ दरम्यान टाकण्यात आलेली ३३ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनी अत्यंत धोकादायक आणि बेकायदेशीर असल्याची तक्रार करत, बाधित गावकऱ्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. ही वाहिनी तातडीने सुरक्षित ठिकाणी न हलवल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा राम अरगडे, सतीश खताळ, अरुण चव्हाण आणि योगेश सातपुते यांच्यासह बाधित गावकऱ्यांनी दिला आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, गेल्या दीड वर्षांपासून संगमनेर शहर, गुंजाळवाडी, राजापूर, मंगळापूर, चिखली आणि धांदरफळ या गावातील नागरिक या अन्यायाविरुद्ध संघर्ष करत आहेत. महावितरणने सुरुवातीला ही वाहिनी संगमनेर ते वाडापूर सबस्टेशनला जोडली जाणार असल्याचे सांगून दिशाभूल केली, मात्र प्रत्यक्षात ती चिखलीकडून धांदरफळच्या दिशेने खाजगी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर शहरात हनुमान जयंतीचा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रथ मिरवणुकीत शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत हनुमानाचा रथ ओढण्याची वर्षांनुवर्षांची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात जपली. सकाळी आठ वाजता शहर पोलीस स्थानकापासून पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी आपल्या पोलीस पथकासह मानाचा भगवा ध्वज हाती घेत जयघोषात चंद्रशेखर चौकात हनुमान रथापाशी आणला. तेथे सजवलेल्या रथावर विधीवत ध्वज फडकवण्यात आला. आमदार अमोल खताळ तसेच पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या हस्ते पवनपुत्र हनुमानरायाची महाआरती करण्यात आली. यानंतर रथाचा दोर हातात धरत नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि आर्थिक शिस्त लावण्यासाठी संगमनेर नगरपालिकेने राबविलेल्या आक्रमक कर वसुली मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पालिकेच्या प्रभावी नियोजनामुळे मालमत्ता कर आणि पाणीपट्टीच्या वसुलीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तीन कोटी रुपयांची लक्षणीय वाढ झाली असून, चालू आर्थिक वर्षात पालिकेने तब्बल १८ कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. नगरपालिकेकडून शहरात विविध पायाभूत सुविधा पुरविल्या जातात. या सुविधांचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी ही महसुलाची प्रमुख साधने आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली थकबाकी आणि कोरोना काळातील आर्थिक अडचणींमुळे वसुलीचे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर होते. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी दयानंद…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी-  संगमनेर तालुक्यातील पठार भागात दुचाकीला कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या दिवंगत विठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशा फडातील कलावंतांवर जमावाने हल्ला केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या भीषण प्रकारात महिला कलावंतांनाही मारहाण करून त्यांचा विनयभंग करण्यात आला असून, कलावंतांची रोकडही लुटण्यात आली आहे. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील वरुडी पठार शिवारात ही घटना घडली. संबंधित तमाशा फड पोखरी बाळेश्वर (ता. संगमनेर) येथील कार्यक्रम आटोपून माळेगाव पठार येथे पुढील कार्यक्रमासाठी वाहनांतून जात होता. वाटेत वरुडी पठार येथील एका पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहने थांबली असताना, एका दुचाकीस्वाराने तमाशाच्या वाहनाला कट मारला. यावरून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले.…

Read More

जालना: समृद्धी महामार्गावर बुधवारी सायंकाळी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. नागपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव वाहनाने कामगारांच्या उभ्या वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सात महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य १० ते १२ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये निधोना येथील अलकाबाई दादाराव आदमाने, मीना परमेश्वर आदमाने, कांचनबाई प्रकाश आदमाने, लक्ष्मीबाई संतोष मदन, सुमनबाई कचरू आदमाने आणि केळीगव्हाण येथील कडुबाई रामदास मदन व ताराबाई गहेनाजी चौधरी यांचा समावेश आहे. अपघातानंतर महामार्गावर रक्ताचा सडा पडला होता आणि मृतदेहांचा खच पडला होता, हे दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील कडवंचीनजीक हे सर्व मजूर समृद्धी महामार्गावर…

Read More

अहिल्यानगर, विशेष प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील कोल्हार-घोटी मार्गावरील वडगाव पान येथे इयत्ता सहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या भीषण ॲसिड हल्ल्याच्या घटनेला आता १५ दिवस उलटून गेले आहेत. मात्र, एवढा काळ लोटूनही पोलीस प्रशासनाला या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घेण्यात यश आलेले नाही. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट असून पोलिसांच्या तपास यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आता अहिल्यानगर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने आरोपीची ओळख पटवणाऱ्या किंवा माहिती देणाऱ्या व्यक्तीस २ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. ही दुर्दैवी घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली होती. पीडित मुलगी दुपारी शाळेतून घरी परतत होती. ती एकटीच…

Read More